डॉ. आंबेडकरांचा भावनात्मक एकात्मतेचा राष्ट्रवादी विचार
विद्या चौरपगार नुकताच पार पडलेला महिला क्रिकेट सामना दोन अर्थाने वैशिष्टपूर्ण व आगळावेगळा ठरला. पहिले म्हणजे या सामन्यातून स्त्रियांनी क्रिकेट जगताला नवीन ओळख दिली आणि दुसरे महत्वाचे वैशिष्ट असे की, या सामन्यातून धर्म, प्रांत,पंथ भाषा, जात हा भेद बाजूला सारत मानवी समूहजीवनातील एकत्वाची व आपलेपणाची भावना प्रकर्षाने जाणवली. मोगा, रोहतक, बोकाखात (आसाम), घुवारा (उत्तर प्रदेश), …