Menu

सचोटी आणि प्रामाणिकतेबरोबर विवेकी भूमिका, हेच यशाचे गमक

मुलाखतकारः डॉ. संजय शेंडे व किशोर खांडेकर

अमनजी कांबळे, व्यवस्थापकीय संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी (Awaz India TV)

प्रक्षः आयास इंडिया’चा प्रवास गेली दीड दशक अव्याहतपणे सुरू आहे. आपले मनःपूर्वक अभिनंदन. आपली जडण-घडण कशी झाली, आपले मूळ गाव, शिक्षण, याविषयी थोडक्यात सांगा.

उत्तर (अमन कांबळे): माझे मूळ गाय पेंडकापार, नागपूर तालुका, घरची परिस्थिती सामान्य परंतु आई-वडील दोघेही शिक्षक असल्यामुळे नागपूर येथे पदवीपर्यंत शिक्षण झाले. घरात लहानपणापासूनच पुरोगामी विचारांचे वातावरण होते. प्रश्न विचारण्याचे,

चिकित्सा करण्याचे स्वातंत्र्य आई-वडिलांनी दिल्यामुळे महाविद्यालयीन जीवनातच दोन महान सुधारकांच्या एका मासिकासाठी मुलाखत घेण्याची संधी मिळाली. ते व्यक्तिमत्य म्हणजे आदरणीय नानकचंद रत्तू आणि

मान्यवर कांशीरामजी. या दोघांचा प्रभाव इतका पहला की, समताधिष्ठित समाज घडविण्यासाठी आयुष्यभर झटायचे हा निर्धार पक्का झाला.

प्रश्रः लोकशाहीच्या नावावर गेल्या दशकाभरापासून हुकूमशाही सदृश परिस्थिती आहे असे दिसते. आपण व आपली टीम Awaz India’ च्या माध्यमातून हे आव्हान कसे पेलता याविषयी आपली भूमिका?

उत्तरः लॉर्ड बुद्धा टी.व्ही. चा अनुभव पाठीशी होता, प्रिंट मीडिया सोबतच साधारणतः ६-७ वर्षे ETV मराठीमध्ये तसेच आयबीएन लोकमतमध्ये अत्यंत समृद्ध असा अनुभव मिळाला. त्याच जोरावर साधारणतः २५-३० सहकाऱ्यांच्या

मदतीने ‘आवाज इंडिया मदतीने आज ऊभे झाले आहे. ज्या हातांनी तन-मन-धनाने मदत केली

त्या सर्वांचेच आम्ही ऋणी आहोत. ते सर्व पाठीशी राहिल्याने आज चार प्रदेशात साधारणतः ७०-७५ लाख ग्राहक आहेत, १ कोटीपर्यंत लोक ‘आवाज इंडिया टीव्ही बघतात. तसेच आजचा युवा वर्ग

युट्धूव य इन्स्टाग्रामचा वापर जास्त प्रमाणात करतात म्हणून आम्ही दोन्ही ठिकाणी कार्यरत आहोत युट्धूवला जवळपास २५ लाख सब्सक्राईबर आहेत. आपण सर्व माय-बाप जनतेच्या हृदयात आहोत. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय व धर्मनिरपेक्षता ही मूल्ये आमच्यासाठी प्राण आहेत. त्या शक्तीच्या

जोरावर आम्ही कोणतेही आव्हान स्वीकारतो. प्रत्रः आपल्याला अनेक प्रलोभने आली असतील, त्याला आपण कसा सामोरे गेलात?

उत्तरः होय, नक्कीच अनेक प्रलोभने येतात तथापि आपण जर स्वतःशी प्रामाणिक राहिलो, मूल्यांशी तडजोड केली नाही तर आम्हाला वाटते जगातील कोणतीही अशी शक्ती नाही जी तुम्हाला याकयू शकते. प्रामाणिकपणा, चारित्र्य, जिद ही मूल्ये आम्ही तथागत बुद्ध, म. जोतीराय फुले, राजर्षी शाहू

महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीमाई फुले, फातिमा शेख, संत कबीर, गुरु नानक, गुरु रविदास, संत तुकाराम, संत गाडगेबाबा यांच्याकडून घेतलेली आहेत. समाजातील शेवटच्या माणसाला न्याय मिळवून देण्याचा आमचा सतत प्रयत्न असतो त्यासाठी प्रसंगी दोन हात करण्याची वेळ आली तरी आम्ही माघार घेणार नाही, घेत नाही.

प्रश्नः आपल्या चॅनलचे वैशिष्ट्य असे आहे की, आपण ओबीसी, शेतकरी, कष्टकरी, भटके-विमुक्त, अल्पसंख्याक या सर्व बहुजन समाजाचे प्रश्न मांडून न्याय देण्याचा प्रयत्न करता, यामागची नेमकी

भूमिका काय आहे?

उत्तरः भारतीय संविधानानुसार आपण वर्ष भारतीय आहोत. ‘प्रथमतः भारतीय, अंतिमतः भारतीय ही आयाज इंडियाची पहिल्यापासून भूमिका राहिलेली आहे. त्यामुळे ओवीमींसाठी असलेल्या मंडल आयोगाची अंमलबजावणी, ओबीसी जनगणना, स्कॉलरशिप, शेतकऱ्यांचे प्रत्र, अन्याय-अत्याचाराविरुद्ध आवाज, महिलांचे हम अधिकार, भटक्यांचे प्रत्र आणि सर्व विषयांना आम्ही चर्चासत्र, मुलाखती, पत्रकार परिषदा, परिसंवाद वाद्वारे सकारात्मक आंदोलनाच्या वेळेसही नेहमीच सहकार्य करीत असतो. यामध्ये प्रत्येक व्यक्तीला एक व्यक्ती, एक मत, एक मूल्य’ या संविधानिक अधिकारानुसार सन्मानाने जगण्याची संधी मिळावी हाच आमचा प्रामाणिक हेतू आहे.

प्रत्रः २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत आपल्या माध्यमातून फेडरेशन ऑफ ऑर्गनायझेशन फॉर सोशल जस्टिस, सेक्युलरिट्रझम अँड डेमॉक्रसी या संघटनेमार्फत संपूर्ण महाराष्ट्रात ८० संघटनांना जोडून संविधान वाचवा मोहीम राबविली, त्याबाबत हे कसे काय साधले?

उत्तरः ज्येष्ठ अर्थशास्त्रज्ञ डॉ. सुखदेव थोरात सर यांच्या श्रार्गदर्शनाखाली…

विविध सामाजिक संघटनांच्या किमान मुद्द्यांवर एकत्रित आणले. त्यासाठी ओबीसी, मुस्लिम, शीख, इसाई, भटके-विमुक्त आणि बुद्धिस्ट यांची मोट बांधली. प्रजासत्ताक रॅली, महिला परिषद, युवा परिषद, CAA/NRC च्या वेळेस ही अनेक ठिकाणी रचनात्म क आंदोलने करण्यात आली. याचा परिणाम महाराष्ट्रात लोकसभेमध्ये पुरोगामी प्रतिपाद‌नांना रोखण्यात यशस्वी झाले. यामध्ये मराठा सेवा संघ, ओबीसी संघटना, बुद्धिस्ट आंबेडकरी संघटना, राष्ट्रीय मुस्लिम ओबीसी परिषद, जिजाऊ ब्रिगेड,

संभाजी ब्रिगेड, अंधश्रद्धा निर्मूलन समिती आदि संघटनांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य होऊ शकले त्याचे श्रेय त्यांना द्यावे लागेल.

प्रश्नः सध्या संविधानिक संस्था धोक्यात आल्या आहेत अशावेळी या लोकशाहीचा आधारस्तंभअसलेल्या मीडियाकडून आपण कोणती अपेक्षा करतो आणि अपेक्षा आहे? आणि देशात या आगामी काळात परिवर्तन शक्य आहे काय ?

उत्तरः आवाज इंडिया सोबतच सोशल मीडिया मार्फत युट्युबर्स कडून लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी प्रत्येक व्यक्ती प्रयत्न करीत आहे. मुख्य मीडियाकडून आपण अपेक्षा करू शकत नाही कारण त्यांचे हितसंबंध सत्ताधारी पक्षासोबत जुळलेले आहेत. म. फुले आणि डॉ. बाबासाहेब

आंबेडकर यांनी कठीण परिस्थितीत संघर्ष करून आपल्याला संविधानिक हक्क-अधिकार मिळवून दिले आहेत. त्यामुळे आम्ही अजिबात निराश नाही, शेवटच्या वासापर्यंत प्रयत्न करू, लवकरच आगामी काळात परिवर्तन होईल त्या दिशेने आम ची वाटचाल सुरु आहे. सर्वसामान्य जनताच लोकशाही जिवंत ठेवेल याचा आम्हाला ठाम विश्वास आहे.

मुलाखतीनंतर अमनजी कांबळे यांना वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ देऊन मंगलकामना देण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *