२४० कोटी पॅकेजचा प्रस्तावही धूळखात
नागपूर : वर्धा नदीवरील दिंडोडा बॅरेज प्रकल्पाचे मंजुरीच्या २५ वर्षांनंतर २०१७ साली काम सुरू झाले. मात्र, या प्रकल्पासाठी २५ वर्षांपूर्वी भूसंपादन करून त्यानुसार शेतकऱ्यांना मोबदला देण्यात आला होता. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांना नव्या कायद्यानुसार वाढीव मोबदला देण्यात यावा, या मागणीसाठी चंद्रपूर जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांनी जलसंपदा विभागात मुख्य अभियंत्याच्या कक्षासमोर ठिय्या आंदोलन केले. दिंडोडा प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे मार्गदर्शक विलास …
