Menu

थोडक्यात महत्वाचे

राज्यातील १४ हजार ७८३ शाळा गोत्यात व १ लाख ८५ हजार विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीवर संकुल आणि क्लस्टरच्या माध्यमातून दहा किलोमीटर अंतरावर एक शाळासंकुल उभारण्याच्या सरकारच्या भूमिकेमुळे गावातील शाळा बंद होण्याची भीती असून राज्यभरातील १४ हजार ७८३ शाळा समायोजित (बंद) होण्याची शक्यता आहे. या निर्णयाचा परिणाम १ लाख ८५ हजार विद्यार्थी आणि ३० हजार शिक्षकांवरही होणार …

संत गाडगे बाबा आणि डॉ.आंबेडकर यांच्या तील ऋणानुबंध

विसाव्या शतकातील सामाजिक सुधारणेच्या कार्यात/आंदोलनात ज्या महापुरुषांचा उल्लेखनिय व महत्वपूर्ण असा सहभाग होता त्यात लोकसंत, कर्मयोगी, वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा आणि युगपुरुष डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रामुख्याने समावेश करावा लागेल. दिन-दलित, पिडित, वंचित आणि दुःखीताच्या कल्याणासाठी या दोन्ही बाबांचे महत्त्वपूर्ण असे योगदान आहे.त्यासाठी त्यांनी प्रबोधन केले,लढे दिले,आंदोलने केलीत. बळकट असलेली चातुर्वर्ण्य व्यवस्था मोडीत काढणे आणि सामाजिक व …

निघू दे दिवस मंगल तो, बघाया भारता ! तुजला !…. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

२६ जानेवारी १९५० ला भारताचे संविधान लागू झाले. जगातल्या एका मोठ्या लोकशाहीचा लोककल्याणाचा मार्ग मतपेटीतून निवडून येणा-या लोकप्रतिनिधींच्याद्वारे सुरू झाला. आज या लोकशाहीने आपल्या वयाची पंचाहत्तरी कठिण परिस्थितीतून गाठली. कारण हा देश विविध जाती, पोटजाती, धर्म, पंथ, संप्रदाय, भाषा अशा विविधतेत विखुरलेला आहे. भारतीय जनजीवनाला माणूस म्हणून जगण्याचा स्वाभिमान भारतीय संविधानाने बहाल केला. संविधान निर्मितीत …

समाजसुधारक: संत गाडगे महाराज

‘शिक्षणासाठी ताटे विका पण शाळा शिका, कारण ताटाशिवाय खाता येईल. परंतु, शिक्षणाशिवाय संपूर्ण आयुष्य अर्धवट आहे, असे विचार समाजमनावर बिंबवताना आपल्या किर्तनातून स्वच्छता, अहिंसा दारूबंदी अंधश्रद्धा, निर्मुलन, अस्पृश्यता निवारण आदी विषयांबाबत समाजाचे प्रबोधन करणारे समाजसुधारक डेबूजी झिंगराजी उर्फ गाडगे महाराज यांचा जन्म विदर्भातील कोते या खेडेगावी दि. २३ फेब्रुवारी रोजी झाला. गाडगे महाराजांनी वयाच्या आठव्या …

उच्च शिक्षण संस्थेमधील जातीय भेदभावाविषयी सुप्रीम कोर्टाचा आदेश

-प्रा . सुखदेव थोरात विद्यापीठांमध्ये परिसरात होणाऱ्या जातीभेदाच्या प्रश्नाविषयी रोहित वेमूला आणि पायल तडवी यांच्या आईंनी सर्वोच्च न्यायालयामध्ये युजीसीच्या विरोधात तक्रार केली. यूजीसीने 2012 ला तयार केलेल्या समानता नियमांचे दहा वर्ष लोटल्यानंतर आजपावतो विद्यापीठ, महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्थांनी पालन केले नाही. ही तक्रार सर्वोच्च न्यायालयाकडे केली. 2012 चा समता नियम हे लागू करावे असा …

करुणेचा अखंड प्रवाह सावित्रीमाई फुले

–डॉ. संजय सु. ग. शेंडे, (नागपूर) पेशवाई समाप्तीचा तह 1817-1818 साली होतो. 1827 साली म. फुले यांचा जन्म होतो. पुढे सावित्रीमाईचा जन्म 3 जानेवारी, 1831 ला सातारा जिल्हयातील खंडाळा तालुक्यातील नायगाव या गावी होतो. कालांतराने 1840 साली जोतीराव फुले यांच्यासोबत सावित्रीमाईच्या विवाह होतो आणि सावित्रीमाईच्या जीवनात 1841 साली ज्ञानपर्व सुरू होते. ही घटना शेतकरी कष्टकरी …

२०१४ ते२०२४ या काळातील महाराष्ट्राच्या अनुसूचित जाती विशेष घटक योजनेचे विश्लेषण : तरतुदी व अंमलबजावणी द्वारे सक्षमीकरण शक्य

अनुसूचित जाती समुदायांसाठी सामाजिक व आर्थिक उत्थानाच्या उद्देशाने एक महत्त्वाचा उपक्रम म्हणून ही योजना आहे: ही विशेष घटक योजना समाजातील असमानता दूर करण्यासाठी आणि सर्वसामावेशक वाढीला चालना देण्यासाठी शेती, सामाजिक सेवा. ग्रामीण विकास यासह विविध क्षेत्रात लक्षणीय निधींचे वाटप करते. या निधीचा कल ओळखणे आवश्यक आहे. राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनांमधील अंमलबजावणीतील ताकद ओळखणे आवश्यक आहे. …

मनुस्मृतीविरुद्ध भारतीय लोकशाहीप्रणीत राज्यघटनेच्या संघर्षाचा गाभा

प्रा.सचिन गरुड, सातारा भारतीय लोकशाही मूल्यांचा उद्गम व विकास हा प्राचीन वैदिक परंपरेत असल्याचे ऐतिहासिक कथन ब्रिटीश वासाहतिक काळात पाश्चात्त्य प्राच्यविद्यातज्ञ आणि राष्ट्रवादी भारतीय अभिजन अभ्यासकांनी रचले आहे. पण त्यातील वर्ण-जात आणि लिंगभाव यांच्या विषमतेच्या वैदिक गाभ्याला दुर्लक्षित केले. आर्य वैदिक परंपरा ही लोकशाही व भारतीय राष्ट्रीय ता यांच्या विरोधी असून ती वर्चस्वाची व शोषण, …

अमेरिकेतील Anti-Caste चळवळ

मिलिंद अवसरमोलसंचालक, आंबेडकर इंटरनेशनल मिशन (AIM USA) शंभर हुन अधिक वर्षांपुर्वी, डॅा. बाबासाहेब आंबेडकरांनी कोलंबिया विद्यापिठातील आपल्या व्याख्यानामध्ये डॅा. केतकरांच्या विधानाचा उल्लेख केला होता जेव्हा हिंदु भारता बाहेर प्रयाण करतील, तेव्हा जातीयवादाची समस्या भारतापुरती सिमित न राहता, ती एक वैश्विकसमस्या बनेल! आजच्या युगात मोठ्या संख्येने भारतीय परदेशांमध्ये स्थलांतरीत झालेत आणि त्यांनी उपरोक्त भविष्यवाणीस खरे ठरविले …

युगप्रवर्तक बंडखोर नायिका: सावित्रीबाईं फुले

डॉ. विद्या चौरपगार  ( असिस्टंट प्रोफेसर, राज्यशास्त्र विभाग, डॉ. आंबेडकर कॉलेज दीक्षाभूमी, नागपूर ) सावित्रीबाई फुले पहिल्या स्त्री शिक्षिका म्हणून सर्वश्रुत आहेतच, याबद्दल दुमत नाही. परंतु एक निस्वार्थी समाज सुधारक, स्त्री मुक्ती चळवळीच्या प्रणेत्या आणि फुल्यांच्या मृत्यूनंतर सत्यशोधक समाजाचे नेतृत्व करणा-या महान नेत्या होत्या. जातीधर्मपितृसत्ताक व्यवस्थेच्या परंपरावादाला छेद देणा-या 19 व्या शतकातील बंडखोर नायिका म्हणूनही …

खऱ्या खोट्याची चिकित्सा करणे म्हणजे शिक्षण:

शिक्षणमहर्षी डॉ. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांचे तत्वज्ञान –डाॅ. संजय शेंडे,ओबीसी चळवळीचे अभ्यासक नागपूर पुराेगामी महाराष्ट्रा शिक्षणाची व्याख्या करणारे कर्ते, सुधारक म्हणून महात्मा ज्याेतिराव फुले, राजश्री शाहू महाराज, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांचा परिचय आपण सर्वांना आहे. त्याचबराेबर सत्यशाेधक समाजाची धुरा सांभाळणारे महात्मा फुलेंचा वारसा ख-या अर्थाने विदर्भात पुढे नेणारे नेतृत्व म्हणजे डाॅ. भाऊसाहेब …

दलितांवरील अन्याय व हिंसा केव्हा थांबणार ?

-प्रा. सुखदेव थोरात सर्व राज्यांमध्ये जाती व अस्पृश्यतेविरुद्धच्या चळवळीमध्ये पुढे असलेल्या पुराेगामी महाराष्ट्रात दलितांवरील अन्याय व हिंसा थांबण्याचे काहीही चिन्ह दिसत नाही. बदलत्या राजकीय, सामाजिक व धार्मिक वातावरणामध्ये दलितांबराेबरची वागणूक प्रवाहाच्या उलट दिशेने वाहतांना दिसत आहे. 2001 ते 2015 ह्या काळात महाराष्ट्रात अत्याचारग्रस्त दलितांकडून एकूण 22253 गुन्हे दाखल करण्यात आले. त्याची वार्षिक सरासरी 1060 केसेस …

परभणी दंगल: पोलिसांच्या मारहाणीने आंबेडकरी तरुण सोमनाथ सुर्यावंशीचा मृत्यू

– अ‍ॅड. डॉ.भीमराव हाटकर,नांदेड ‘मी येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन !‘ असे म्हणत 5 डिसेंबर 2024 राेजी भारताच्या संविधानाला बांधिल असल्याची आणि राज्यातील काेणत्याही घटकाबाबत दुजाभाव न करता निःपक्ष आणि निष्पक्षपणे राज्यशकट हाकण्याची शपथ घेऊन देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या राजगादीवर विराजमान झाले. यानंतर अवघ्या पाच दिवसानंतर 10 डिसेंबर राेजी परभणी शहरात अगदी जिल्हाधिकारी …

भारतातील मागासवर्गीय समुदायांच्या वैद्यकीय शिक्षणावर NEET परीक्षेच्या होणा-या परिणामांचा अभ्यास

–प्रा. अवनीकुमार पाटील, समता सैनिक दल, नागपूर अनुवादक: डॉ. अस्मिता पाटील प्रस्तुत लेखात भारतातील वैद्यकीय शिक्षणाच्या समस्या अधोरेखीत केल्या आहेत. या लेखात न्यायमूर्ती राजन समिती (तामिळनाडू) अहवालातील माहितीचे विश्लेषण करून असे स्पष्ट केले आहे की, NEET सारख्या केंद्रीकृत परीक्षा सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या समुदायातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणापासुन पूर्णपणे बाहेर ठेवण्यासाठी कशा कारणीभूत ठरतात. NEET च्या …

आजकालच्या घडामोडी

– शालिन मारीया लॉरेंस (अमेरीका) मार्टिन लूथर किंग, मैल्कम एक्स, इमैनुअल सेकरन जैसे नेता और दाभोलकर, गौरी लंकेश जैसे तर्कवादी इसलिए नहीं मारे गए क्योंकि वे हिंसक थे, बल्की इसलिए क्योंकि वे बहुत प्रभावशाली थे और उत्पीड़न की व्यवस्था पर सवाल उठाते थे। दलित पंचायत नेता मेलवू मुरुगेसन की हत्या इसलिए की गई क्योंकि उन्होंने …