जातीय जनगणना देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आवश्यक
एड. भगवान दास भारतात पहिली जनगणना १८४७पासून सुरू झाली. मात्र ती पंजाबच्या एका भागापर्यंतच मर्यादित होती. १८७१ ला पहिली जनगणना झाली. त्यात राजांची संस्थाने समाविष्ट नव्हती. खऱ्या अर्थाने जनगणना १८८१ ला झाली. जनगणनेत फक्त गणनाच होत नाही तर सरकारला जी आवश्यक माहिती पाहिजे असते, ती सुद्धा गोळा केली जाते. भारतीय समाज असंख्य जातीत वाटला गेला …
