“ग्यारा साल बेमिसाल, मगर विदर्भ की जनता बेहाल”
विदर्भ राज्य आंदोलन समितीचा निषेध नुकतेच नागपूरचे खासदार आणि देशाचे भूतल परिवहन मंत्री यांच्या वतीने त्यांची अकरा वर्षाची मंत्रिपदाची कारकीर्द व केंद्रातील मोदी सरकारची अकरा वर्ष याबाबत गुणगान करणारा सार्वजनिक कार्यक्रम नागपुरात झाला. परंतु दुर्दैवाने म्हणावे लागते की, गेल्या ११ वर्षांत विदर्भातील शेतकऱ्यांच्या कर्जापाई होणाऱ्या आत्महत्यांचे सत्र सातत्याने सुरूच आहे. कुपोषणामुळे सतत सुरू असलेले गर्भार …