Menu

Category «लोकशाही»

युजीसी २०२६ नियमावली- पूर्वग्रह आणि अज्ञानावर आधारित

सुखदेव थोरात, माजी अध्यक्ष, यूजीसी      उच्च शिक्षणातील समानतेच्या प्रोत्साहनासाठी यूपीए–२ सरकारने अकरा वर्षांपूर्वी तयार केलेल्या यूजीसी नियमावली २०१२ सुधारित स्वरुपात जानेवारी २०२६ मध्ये आणली. मात्र, नियमावली जाहीर होताच विद्यार्थ्यांच्या एका गटाने त्यातील काही तरतुदींना विरोध दर्शविला. या विरोधकांच्या युक्तिवादांना अनुकूल प्रतिसाद देत, सर्वोच्च न्यायालयाने २०२६ ची नियमावली तात्पुरती स्थगित ठेवली व तिच्या पुनरावलोकनाचे आदेश …

UGC नियमावली 2026: सामाजिक न्यायाच्या तत्त्वांना आव्हान

डॉ. गौतम कांबळे, किशोर खांडेकर AIIMS मध्ये 2008 साली तसेच त्यानंतर इतर शैक्षणिक संस्थांमध्ये अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याच्या दुर्दैवी व गंभीर जातीय भेदभावाच्या घटनांची दखल घेत, शिक्षण मंत्रालयाने विद्यापीठ अनुदान आयोगाला भेदभावविरोधी नियमावली तयार करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार युजीसी ने 2012 साली “Promoting of Equity in Educational Institutions Regulations, 2012” ही …

महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुक 2026- एक विश्लेषण

डॉ. विद्या चौरपगार महाराष्ट्र राज्यात नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुका या शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पातळीवर झालेला एक महत्त्वाचा राजकीय टप्पा ठरतात. ५ जानेवारी २०२६ रोजी महाराष्ट्रातील २९ नगरपालिका व महानगरपालिकांसाठी निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांमधून सुमारे २,३०० लोकप्रतिनिधी निवडले गेले, तर अंदाजे सव्वा तीन कोटी मतदार या प्रक्रियेत सहभागी होण्यास पात्र होते. या निवडणुका …

नवीन शैक्षणिक धोरण 2020- भारतातील वैज्ञानिक विचारसरणीवरील आघात

(गौर रझा former chief scientist, CSIR, NISCAIR यांच्या SFI मंचावरील भाषणाच्या आधारे विश्लेषण) वैज्ञानिक तर्कशुद्धता (Scientific Temper) ही आधुनिक लोकशाही समाजाची मूलभूत अट आहे. प्रश्न विचारण्याची क्षमता, पुराव्यावर आधारित विचार आणि विवेकवादी दृष्टिकोन हे समाजाच्या प्रगतीसाठी अनिवार्य घटक मानले जातात. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 51(A)(h) मध्ये नागरिकांचे मूलभूत कर्तव्य म्हणून वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवतावाद आणि ज्ञानार्जनाची वृत्ती …

सम्राट आशाेकाची सर्वसमावेशक शिक्षण व्यवस्था भि.म. काैसल

भाैतिक आणि आध्यात्मिक जीवनाचे निर्माण आणि वैयक्तिक व सामाजिक जीवनातील विभिन्न जबाबदा-या यशस्वीरितीने पार पाडण्यासाठी शिक्षणाची नितांत आवश्यकता असते. मनुष्य जीवनात शिक्षणाला फार महत्त्व आहे. शिक्षणाशिवाय मनुष्यजीवन फारच संकुचित हाेते. ज्या व्यक्तिकडे ज्ञान किंवा शिक्षण नाही त्याचे जीवन अंधकारमय असते. विद्या किंवा ज्ञानाला मनुष्याचा तिसरा डाेळा मानण्यात येते. शिक्षण जीवनातील सर्व प्रश्नांना मूळापासून समजून घेण्यास …

आरक्षण विषयी समज गैरसमज

क्रिमीलेयरचा सल्ला पुराव्याविना अपुरा डॉ. संदीप उमप, डॉ. सुखदेव थोरात आर्थिकदृष्ट्या तुलनेने प्रगत झालेल्या अनुसूचित जातींच्या व्यक्तींना नोकरीतील आरक्षणातून वगळावे, हा युक्तिवाद न्यायपालिकेतील उच्च पदस्थ व्यक्तींनी वारंवार पुढे रेटला आहे. जर हा प्रश्न केवळ कायदेशीर अर्थ लावण्यापुरताच मर्यादित असता, तर त्यास प्रतिसाद देण्याची गरजच भासली नसती. मात्र, अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणासंदर्भातील अलीकडील निर्णय तसेच अनुसूचित जातींसाठी …

शासकीय नोकऱ्यांतील सहभाग निश्चित करणारे घटक

डॉ. नितीन तागडे, प्राध्यापक, हैदराबाद सेंट्रल युनिव्हर्सिटी, हैदराबाद अनुसूचित जातींसाठी शासकीय नोकऱ्यांमधील आरक्षण धोरण हे अनुसूचित जाती आणि उच्चवर्णीय समाज यांच्यातील दरी कमी करण्याच्या उद्देशाने विकसित करण्यात आले आहे. शासकीय नोकऱ्यांमधील सहभागाच्या दृष्टीने आंतरजातीय समानतेबाबत चिंता व्यक्त केली जाते. अलीकडेच अनुसूचित जातींच्या विविध उपजातींमध्ये शासकीय नोकऱ्यांतील असमान सहभागाचा मुद्दा न्यायालयाच्या विचाराधीन आहे.अनुसूचित जातींतील विविध उपजातींमध्ये …

शैक्षणिक क्षेत्रातील आरक्षणाची स्थिती व प्रश्न

डॉ. गौतम कांबळे माजी प्राध्यापक डॉ. आंबेडकर महाविद्यालय दीक्षाभूमी नागपूर आरक्षण धोरणाची चर्चा आज देशभर नव्याने होत आहे. ही चर्चा देशातील सर्व स्तरातील जनमानसामध्ये झिरपण्याची शक्यता आहे. म्हणून या धोरणासंबंधीचे वास्तव जनतेमध्ये पोहोचण्यासाठी त्याचा विमर्श होणे आवश्यक आहे. सायमन कमिशन पासून देशातील आरक्षण धोरणाचा आधार हा सामाजिक भेदभावच असल्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आग्रहाने मांडत आले …

उपजातींमधील आरक्षणाच्या लाभांतील विषमतेचे स्वरूप

मोहन कांबळे भारतीय संविधानाने स्वीकारलेले आरक्षण हे एखाद्या विशिष्ट समाजघटकाला दिलेले सवलतीचे साधन नसून, शतकानुशतके चालत आलेल्या सामाजिक अन्यायाविरुद्ध दिलेले एक घटनात्मक उत्तर आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक न्यायाच्या संकल्पनेत समता, स्वातंत्र्य आणि बंधुता हे तीन मूलभूत स्तंभ आहेत. आरक्षण ही याच तत्त्वांना व्यवहारात उतरवणारी यंत्रणा आहे. “Political democracy cannot last unless there lies at …

बातम्या

.“नोकरी लागणार नाही तर जगायचं तरी कशासाठी” असं म्हणत चार मित्रांनी रेल्वेखाली उडी घेतली, तिघांचा मृत्यू” “नोकरी लागणार नाही तर जगायचं तरी कशासाठी,” असे म्हणत चार तरुण मित्रांनी रेल्वेखाली उडी घेतल्याची हृदयद्रावक घटना घडली. या घटनेत तिघांचा जागीच मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. नोकरी न मिळाल्याने आलेले नैराश्य आणि भवितव्याबाबतची असुरक्षितता हे …

महात्मा ज्योतिबा फुले: विचार, सामाजिक चळवळ आणि त्याचे समकालीन महत्व

डॉ. सुखदेव थोरात ज्योतिबा फुले हे महात्मा होते, एक महान पुरुष होते. आपण त्यांना ‘महात्मा’ हा मान  का दिला? याबाबत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पुण्यातील एका भाषणात महान व्यक्तीच्या तीन गुणांचा उल्लेख केला आहे, पहिला गुण म्हणजे वास्तव ओळखण्याची बुद्धी दुसरा गुण  स्वार्थाशिवाय सत्य सांगण्याचे धैर्य आणि तिसरा गुण म्हणजे  दुर्बलांच्या उन्नतीसाठी बुद्धी आणि प्रामाणिकपणाचा वापर …

बिहार निवडणुका: दलितांनी कसे मतदान केले?

एस.आर. दरापुरी, राष्ट्रीय अध्यक्ष, ऑल इंडिया पीपल्स फ्रंट 2025 च्या बिहार विधानसभेच्या निवडणुकांमध्ये (६ आणि ११ नोव्हेंबर, निकाल १४ नोव्हेंबर) दलित मतदारांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए – भाजपा + जेडीयू) कडे मोठ्या प्रमाणात झुकाव दाखवला. यामुळे एनडीएला प्रचंड विजय मिळाला—२४३ पैकी २०२ जागा आणि एकूण सुमारे ४६.६ टक्के मते. विरोधी महागठबंधन (एमजीबी – राजद आघाडी) …

भाषा शिक्षणातील प्रभूत्वाचे राजकारण

रमेश बिजेकर             शिक्षण ही स्वंयभू राजकीय कृती असल्यामुळे सत्ताधारी, स्व प्रभूत्वशाली शिक्षण रचना उभी करतात. त्यातही भाषा, इतिहास, सामाजिक शास्त्रे व मूल्यशिक्षण यात प्रभूत्वशाली राजकीय दृष्टी  प्रभावीपणे काम करत असते. जनतेची विचारसरणी व संस्कृती सत्तेच्या समर्थनात घडवण्यासाठी सत्ताधारी शिक्षणाचा साधन म्हणून वापर करत असतात. सत्ताधा-यांचे धोरण अमान्य करुन पर्यायी विचार समांतरपणे त्याचवेळी मांडल्या जात …

महार वतनाच्या जमिनीची सध्यस्थिती

सयाजी वाघमारे , अध्यक्ष भीमबाणा संघटना, मुंबई आपल्या देशात प्रदीर्घ काळ मोगलांची राजवट होती. त्यांच्या सैन्यामध्ये मोठ्या संख्येने  महार सैनिक होते. युद्धात आघाडीवर राहून त्यांनी शौर्य गाजवले होते. महार सैनिकांच्या पराक्रमाचा गौरव करण्यासाठी म्हणून  इ.स. १५३० साली बिदरच्या बादशाहाने आणि इ.स. १६१५ साली हैदराबादच्या निजामाने महार सैनिकांना इनाम म्हणून जमिनी कसायला दिल्याचा इतिहास आहे. लढाई …

डॉ. आंबेडकरांचा भावनात्मक एकात्मतेचा  राष्ट्रवादी विचार

विद्या चौरपगार नुकताच पार पडलेला महिला क्रिकेट सामना दोन अर्थाने वैशिष्टपूर्ण व आगळावेगळा ठरला.  पहिले म्हणजे या सामन्यातून स्त्रियांनी क्रिकेट जगताला नवीन ओळख दिली आणि  दुसरे  महत्वाचे वैशिष्ट असे की, या सामन्यातून धर्म, प्रांत,पंथ भाषा, जात हा भेद बाजूला सारत मानवी समूहजीवनातील एकत्वाची व आपलेपणाची भावना प्रकर्षाने जाणवली. मोगा, रोहतक, बोकाखात (आसाम), घुवारा (उत्तर प्रदेश), …