Menu

सेंगोल हे आदर्श प्रतिक नाही

द्रविड़ मुन्नेत्र कड़गम या पक्षाची स्थापना करणारे माजी मुख्यमंत्री सी.एन. अन्नादुराई यांनी द्रविडनाडू या वर्तमानपत्रात दि. २४/९/१९४७ मध्ये सेंगोल बद्दल विचार मांडले आहेत. त्यांच्या या प्रहसनात लेखक, मित्र, ब्राम्हण व आदिनाम यांच्यातील काल्पनिक संवाद आहे. पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना सेंगोल सुपूर्द करण्याबाबत सी.एन.अन्नादुराई आश्चर्य  व्यक्त करतात. या निबंधातील काही स्वैर अनुवाद येथे देत आहे.

तिरुवदुथराई आदिनाम यांनी पं. नेहरूना सेंगोल सुपूर्द केले आहे. त्यांनी असे कां केले? ही भेट आहे की प्रस्ताव आहे? की परवाना शुल्क आहे? हे निश्चितच अनपेक्षित व अनावश्यक होते. जर अनावश्यक आहे हे मान्य केले तर या बाबीकडे दुर्लक्ष करण्यास हरकत नाही. परंतु या भेटीमागे काही गहन अर्थ आहे काय? असेल तर तो धोक्याचा ईषारा देत असल्याचे वारंवार स्पष्ट होत आहे. पं. नेहरूंना याबाबत काय वाटते? किंवा तिरुवदुथराई आदिनाम यांनी त्याबाबत काय माहिती दिली हे आम्हाला माहित नाही परंतू पं. नेहरूंना आमचे सांगणे आहे. “तुम्हाला देशाचा इतिहास माहित आहे. अनभिषिक्त राजा आपल्या सरदार सैनीकांच्या उदरनिर्वाहासाठी आपल्या प्रजेकडून श्रमाद्वारे उत्पादन करवून घेतो त्याच्या सुवर्णमहालाच्या सिमेअंतर्गत फिरण्याचे स्वातंत्र फार कमी लोकांना असते ज्यांच्याकडे धर्माचे भांडवल असते. जर लोकांचे राज्य टिकवायचे असेल तर अशा लोकांचे विशेषाधिकार काढून घेतले पाहिजे तुम्हाला हे माहित आहे. आदिनामवाल्यांना ही चिंता सतावते की तुम्ही काही कृतिकार्यक्रम तर घेणार नाही ? ते तुम्हाला सोन्याचा नव्हे तर नवरत्नांनी मढवलेला राजदंड देवू करतील कारण त्यांना त्यांच्या स्वार्थाचे रक्षण करायचे आहे.

ईश्वराची कृपा व्हावी म्हणून भजन गावून ईश्वराला प्रसन्न करायचे अशा लोकांनी आणलेला हा राजदंड नव्हे ही भेट मजूरांच्या काबाडकष्टाच्या घामाने भीजलेली आहे. रात्रंदिवस मजूरी करून उपाशी राहणारे अशा मजूरांच्या पोटावर पाय देवून वाममार्गाने कमावलेल्या पैशातून हे सोने विकत घेतले आहे. (ज्यापासून सेंगोल तयार केला आहे.) ईश्वराची फसवणूक व स्वत:चे पाप लपविण्यासाठी ही भेट दिली आहे. गरीब लोकांचे शारिरीक व मानसिक शोषण करणाऱ्या लोकांकडून हा राजदंड मिळत असेल तर हे निश्चितच ठीक नाही.

संवाद : ब्राह्मण व आदिनाम मधील काल्पनिक संवाद

ब्राम्हण : “नविन सरकारच्या प्रति असलेले तुमचे निखळ प्रेम आदर व काळजीपोटी तुम्ही शुभमुहूर्तावर हा सेंगोल पाठवाल तर बडोदा, जयपुर, उदयपुर व म्हैसूरचे राजपुत्र तुमची प्रशंसा करतील, एखाद-दोन मिनीट सेंगोलचा संदर्भ असेल परंतु प्रत्यक्षात दिवसभर तुमचेच गुणगाण होईल.”

आदिनाम : सेंगोल पाठवणे चांगली कल्पना होती नां ? 

ब्राम्हण : सेंगोल म्हणजे राजाचे हातात असतो तो राजदंड सरकारला कुणी दिला ?

आदिनाम: एकप्रकारे नविन सरकारला काम सुरु करण्यासाठी आर्शिवाद दिला अशी चर्चा सर्वत्र होणार आहे. भविष्यात सुद्धा हि चर्चा रंगणार आहे. 

सेंगोल कडे पाहा तो सुंदर आहे, पवित्र वृषभकडे पाहा, तुम्ही या हजारो एकर जमीनीकडे पण पाहू शकता. शेतकऱ्यांनी, मजूरांनी काबाडकष्ट करून ही शेते फुलवली आहेत. परंतू त्यांचे जिणे मात्र नरकाचे जिणे झाले आहे तुम्ही त्याची झोपडी पाहू शकता, दारिद्रयाशिवाय तिथे दुसरे काहीही दिसत नाही. ज्यावर या राजदंडाची अधिसत्ता आहे. तुम्ही मिरासदारला सुद्धा पाहू शकता, त्याचा सुंदर बंगला आहे. सोन्याच्या ताटात तो जेवतो आणि तिकडे ते थकलेले देह, अश्रूंनी भरले डोळे, तुम्ही तो मठ सुद्धा पाहू शकता, तो भयंकर जटावाला साधू, त्याच्या गळ्यातले मनी, कानातले सोन्याच्या बाळ्या पायातली सोन्याची जड़ावा पण तुम्हास दृष्टीस पडतील.

हा सेंगोल जो पं. नेहरूंना पाठविला आहे. ती भेट नव्हे, प्रस्ताव नाही, प्रेमाचे प्रतिक पण नाही. देशभक्ती सुद्धा नाही. तर भारताच्या शासकांना ती विनंती आहे की आदिनामचे माहात्म, वैभव हिरावून घेवू नका, ही मैत्रीची याचना आहे, जेणेकरून त्यांचे वर्चस्व लयाला जावू नये. सेंगोलसाठी लागलेले सोने त्यांच्या दृष्टीने अत्यंत शुल्लक आहे. जर त्याच्या मठातील सोने जप्त केले व जनतेच्या कल्याणासाठी खर्च केले तर हा राजदंड केवळ शोभेची वस्तू न राहता जनतेच्या उद्धाराचे प्रतिक होईल. 

-सी. एन. अन्नादुराई

वी. गीता अभ्यासक व अनुवादक