भारताच्या अठराव्या लाेकसभा निवडणूक निकालाने जगभरातल्या लाेकशाही प्रेमींच्या चेह-यावर समाधानाचे स्मितहास्य झळकले असेल. इतका सुजाण, समजुतीचा व संतुलित निकाल जगातल्या सर्वांत माेठ्या लाेकशाही राष्टतून येणे हे
त्या समाधानाचे कारण आहे. शेतकरी, तरुणवर्ग, महिलांच्या मानवीय प्रश्नांकडे कानाडाेळा झाला. शेतक-यांनी अभूतपूर्व
आंदाेलन उभारले तर त्यांना दहशतवादी ठरविले गेले. ते संसदेपर्यंत पाेहाेचू नयेत म्हणून राजधानीच्या सीमा चाकचाैबंद
केल्या गेल्या. नाेकरीसाठी आक्राेश करणा-या तरुणांच्या पदरात पेपरुटीच्या घटना पडल्या आणि लैंगिक छळाच्या
विराेधात रस्त्यावर उतरलेल्या ऑलिम्पिक विजेत्या, महिला कुस्तीपटूंच्या वाट्चाला पाेलिसांच्या लाठ्या व रस्त्यावर फरपट
आली. त्यांच्या शाेषकांचे दरबारातील वजन मात्र कायम राहिले. मणिपूरसारखे सीमेवरचे राज्य वर्षभर हिंसाचारात उद्ध्वस्त
हाेत असताना आपदग्रस्तांना दिलासा देण्याचे कर्तव्य सरकार विसरले. सरकारला प्रश्न विचारणा-या विराेधकांची काेंडी
करण्यात आली. केंद्रीय तपास यंत्रणा त्यांच्या मागे लावण्यात आल्या. कारवाईच्या भीतीने त्यापैकी जे सत्तापक्षाच्या
वळचणीला आले त्यांना राजाश्रय मिळाला. या सगळ्या घटनांकडे सामान्य मतदार कसा पाहत हाेता आणि त्यावर त्याची
प्रतिक्रिया काय, हे निवडणुकीच्या निकालातून स्पष्ट झाले आहे. एकाच वेळी काेट्यवधी मतदारांनी एकसारखा विचार
करणे, त्यापुढे जाऊन लाेकशाहीला अभिप्रेत असलेली कृती करणे, हा चमत्कार आहे आणि भारतरत्न डाॅ. बाबासाहेब
आंबेडकर यांनी सांगिल्याप्रमाणे लाेकशाहीची मूल्ये खाेलवर रुजलेल्या समुदायामध्येच हा चमत्कार शक्य आहे.
मतदानाच्या सात टप्प्यांची निवडणूक, कानठळ्या बसाव्यात असा प्रचाराचा गाेंगाट, परस्परविराेधी नेत्यांचे हल्ले-प्रतिहल्ले,
सार्वजनिक सभ्यता गुंडाळून केले गेलेले आराेप-प्रत्याराेप, या सगळ्या गदाराेळातही लाेकशाहीदत्त मताधिकाराच्या साधनाचे
भान मतदारांनी ठेवले आणि सत्ताधा-यांना उतू नका, मातू नका, असा संदेश दिला. देशात प्रवळ विराेधी पक्ष हवाच,
हा काेट्यवधी जनतेचा काैल आहे. हा देश सर्वधर्मसमभाव जपणारा, जगभर बहुसंख्याकांचा बाेलबाला असताना
अल्पसंख्याकांची काळजी वाहणारा, दुबळ्यांना आधार देणारा, अंत्याेदयाचा विचार कृतीत आणणारा आहे. हीच देशाची खरी
प्रकृती, आयडिया ऑ\ इंडिया आहे. राष्ट—ाच्या रूपातील त्या संकल्पनेचा बहुरंगी झेंडा उंच उंच \डकावणा-या भारतीयांच्या
सामूहिक शहाणपणाला कृतज्ञतापूर्वक सलाम!
-अग्रलेख- लाेकमत