Menu

सनातन धर्म : धर्मापेक्षाही जात श्रेष्ठ

सर्व हिंदूंना ‘सनातनी’ म्हणणाऱ्या संकल्पनेला डॉ. आंबेडकरांच्या लिखाणात समर्थन नाही.

डॉ. आंबेडकरांच्या दृष्टीकोनातून, सनातन धर्माची संज्ञा हि केवळ वैदिक आणि ब्राह्मणी परंपरा मानणारी विचारधारा आहे आणि ह्या विश्लेषणाची उत्पत्ती वेदांना सनातनी मानण्यात आहे.

तामिळनाडूचे मंत्री उदय निधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माच्या विचारांचे  “निर्मूलन” करण्याचे आवाहन केल्याने हा मुद्दा राष्ट्रीय राजकीय पटलावर धडकला. उदय निधी यांच्या मते सनातन धर्म समाजात विभाजन करून फूट पाडतो. म्हणून त्याचे निर्मुलन झाले पाहिजे. उदय निधीच्या या आवाहनाचा अर्थ अनेकांनी भारतातील सनातन धर्म मानत असलेल्या ८० %  लोकसंख्येचा वंशसंहार आहे, असा आरोप केला आहे. सदर आरोप उदयनिधी यांनी फेटाळला आहे.

लेखकांनी दोन इतिहासकारांबरोबर चर्चा केली ज्यांनी डॉ. आंबेडकर आणि उदय निधी यांच्या भूमिकेची पुष्टता केली की, सनातन धर्म हा मुळात कोणत्याही विशेष धार्मिक विचारांना निर्देशित करीत नाही, परंतु तो विचार प्रत्येकाने त्याच्या जीवनात जातीप्रमाणे पाळल्या जाणारी कर्तव्ये व नैतिक तत्व यांचा पुरस्कार करावा असे मानतो. हे ही खरे आहे की दीड शतकापूर्वी या शब्दाला धार्मिक अर्थ प्राप्त झाला, व त्याचे निरुपण ब्राह्मणवादी परंपरा आणि प्रथांपुरते मर्यादित झाले. 

आपल्या ‘रिडल्स इन हिंदुइझम’ या पुस्तकांत डॉ. आंबेडकरांनी मनुस्मृतीवरील कल्लुका भट यांच्या भाष्यातून उद्धृत केले की, “सनातन’’ हा शब्द सुरुवातीला वेदांचे “शाश्वत” पूर्वअस्तित्व आणि त्यात असलेल्या ज्ञानाचे आणि धारणांचे न बदलणारे स्वरूप सांगण्यासाठी वापरला गेला. ब्राह्मणी विव्दानांनी पुढे हिंदू संस्कृती दर्शविण्यासाठी हा शब्द वापरला. याचा अर्थ हा की सनातन धर्म हा चिरकाल व त्याचे मूळ; वैदिक विचारसरणीमध्ये आहे. डॉ. आंबेडकर म्हणतात, जर हा प्रश्न ब्राह्मणाला विचारला तर हेच म्हणतील की वेद हे सनातन आहेत. 

एनसीईआरटीच्या इयत्ता १० वीच्या इतिहासाच्या पुस्तकातील “भारतातील राष्ट्रीयीकरण” हा धडा, भारत आणि समकालीन जग-II असहकार आणि सविनय कायदेभंग चळवळीच्या संदर्भात म्हणतो: “सर्व सामाजिक गट स्वराज्याच्या अमूर्त संकल्पनेने प्रभावित झाले नाहीत. असाच एक गट म्हणजे ‘अस्पृश्य’, ज्यांनी १९३० च्या सुमारास स्वतःवरच्या अमानवी अत्याचाराला मांडायला सुरुवात केली. कॉंग्रेसने सनातनी, रुढीवादी, उच्च जातीय  हिंदू, नाराज होण्याच्या भीतीने, दलितांवरील अत्याचाराकडे दीर्घकाळ दुर्लक्ष केले.” एक इतिहासाचे प्राध्यापक म्हणतात, “सनातनी धर्माचा मूळ अर्थ नैतिक तत्वाचा एक समुच्चय होता, तो पुढे धार्मिक विश्वास आणि  प्रथांशी जोडला जाऊ लागला.” ‘सनातन संकल्पनेचे’ धर्मीकरण हे साधारणत जेव्हा स्वामी दयानंद सरस्वती यांनी १८७५ मध्ये आर्य समाजाची स्थापना केली व त्या संघटनेचा माध्यमाने कर्मकांड विधींना मानणारी ब्राह्मणवादी परंपरा, बालविवाह, अस्पृश्यता यांना विरोध करण्यात आला व तेव्हापासून स्त्री शिक्षणाचा अधिकाराचा मागणीला सुरुवात झाली. ‘त्याचवेळेस काही लोकांनी ज्यामध्ये प्रामुख्याने ब्राह्मणाचा समावेश होतो त्यांनी ह्या सुधारांना विरोध केला, कारण त्यांच्या मते ह्या सुधारणा सनातनी धर्माचा विरोधात होत्या.’ ह्यावरून स्पष्ट होते की, सनातन वाद/ धर्म हि ब्राह्मणवादाची संकल्पना आहे. म्हणून ह्या संदर्भात काही प्रज्ञावंत असे म्हणतात की, ‘उदय निधी यांनी सनातन धर्मावर जो शाब्दिक हल्ला केला तो हल्ला ब्राह्मणवादी विचारावर व कृतीवर आहे.’ 

उदय निधी यांनी दहावीच्या पुस्तकाचा आधार घेतला व त्या मधील प्रथांचा उल्लेख करून द्विटरवर स्पष्टीकरण दिले. त्यांनी सनातनी धर्माचे पालन करणाऱ्या लोकांच्या नरसंहारासाठी कधीही आवाहन केले नाही, मात्र सनातन धर्म हे एक असे तत्व आहे, जे जाती आणि धर्माच्या नावावर लोकांना विभाजित करते, हे त्यांना निश्चितपणे सांगायचे आहे.

प्रा. पंकज झा, लेडी श्रीराम कॉलेजमधील इतिहासाचे प्राध्यापक म्हणतात की, ‘८ व्या शतकातील कवी भवभूती यांनी लिहिलेले उत्तमरामचरित्र आणि ७ व्या शतकातील कवी भट्ट यांचे भक्ती काव्य यात, धर्म हा अपरिवर्तनीय व निश्चित असतो, असे म्हटले आहे. यासाठी “सनातन” हा शब्द वापरला आहे.’ दोन्ही ग्रंथांमध्ये, “धर्म म्हणजे कर्तव्यांचा एक समूह आहे. एकेकाळी सामाजिक स्थान, स्थिती आणि जीवनातील स्थानावर अवलंबून असलेले धर्म व्यक्तिपरत्वे भिन्न असू शकतात: म्हणून पूत्रधर्म (पुत्राची कर्तव्ये), गुरु धर्म (गुरुची कर्तव्ये), राज धर्म इत्यादि भिन्न अवस्थेप्रमाणे भिन्न शब्दांचा वापर केला आहे.” 

वैदिक परंपरेने धर्माची व्याख्या धार्मिकता अशी केली आहे. धर्म म्हणजे सामाजिक जीवन आणि समाजव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठीची योग्य कृती. “जर तुम्ही धर्म हा सनातन आहे असे म्हणाल, तर त्याचा अर्थ असा आहे की धार्मिकता अपरिवर्तित म्हणजे न बदलणारी आहे.” तथापि, प्रा. झा म्हणतात, ‘संस्कृत साहित्यातील परंपरा शब्दश: एकवचनी नाही आणि काही दाखले धर्माकडे पाहण्याचे इतर दृष्टीकोन प्रदान करतात.’ “उदाहरणार्थ, युग धर्माची संपूर्ण कल्पना असे गृहित धरते की धर्म बदलणारा असून तो कुंठित किंवा थिजलेला नाही.”

सनातन धर्म या शब्दाचा अर्थ हिंदू धर्म असा वापरणे ही अलीकडील घटना आहे, कदाचित ती दिडशे वर्षांहून जुनी नाही. १९ व्या आणि २० व्या शतकाच्या उत्तरार्धात हिंदू धर्माच्या केवळ एका विशिष्ट रुढीवादी श्रृंखलेलाच (परंपरा) सनातन धर्म म्हणून संबोधले जात असे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. प्रा. झा यांनी हिंदू प्रथांमधील विस्तृत धार्मिक भिन्नता आणि हिंदू धर्माच्या बहुविध आणि गतिशील इतिहासाचा उल्लेख करून “सनातन” या संकल्पनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ते म्हणतात “सर्व धर्माप्रमाणे, हा धर्म देखील कालातित असल्याचा दावा करतो आणि सर्व धर्मांप्रमाणेच त्याचीही सुरुवात, प्रसार आणि विकास कालांतराने होत आहे.”

प्रा. झा पुढे म्हणाले, “उदय निधीचे विधान सनातन धर्मापासून हिंदू धर्माचे संबंध वेगळे करण्याचा प्रयत्न करते.” त्यांची टिप्पणी वक्तृत्वपूर्ण दिसते. तरीही, जर तुम्ही “सनातन धर्म” त्याच्या मूळ अर्थाने वाचलात तर त्यांनी हिंदू धर्म नष्ट करण्याचे आवाहन केले नाही, हे लक्षात येते. “लक्षात ठेवा, वर्णाश्रम धर्म, एखाद्या वर्णासाठी योग्य असलेले कर्तव्य, हे सनातन धर्माचा गाभा म्हणून पाहिले गेले आणि वर्ण हे मुख्य तत्व आहे ज्यात जातिभेद निर्मित आहे. त्यामुळे ‘सनातन धर्म’ नष्ट करण्याचे आवाहन म्हणजे जातिव्यवस्थेचा आधार नष्ट करण्याची हाक म्हणूनही पाहिले जाऊ शकते.”

डॉ. आंबेडकर म्हणतात ब्राह्मणी किंवा सनातन धर्म बंधुभावाची शिकवण देत नाही तर तो समाजाचे विभाजन करतो. “हिंदू समाजव्यवस्था ही अपघाताने नव्हे तर ती मुळात अलोकतांत्रिकच असावी अशीच रचनाबद्ध केलेली आहे. म्हणून ती अलोकतांत्रिक’ ठरविण्यात आली आहे, तिच्यात वर्णाची आणि जातींची आणि बहिष्कृतांमधील विभागणी आहे आणि केवळ सिद्धांतच नाही तर आदेश आहेत.”

आंबेडकरांनी हिंदू प्रथांच्या “अनंतकाळ”च्या दाव्याचा प्रतिकार केला आहे आणि कालांतराने ते कसे बदलले, ते अधोरेखित केले आहे. यासाठी त्यांनी तंत्र उपासनेचा उल्लेख केला. तंत्र उपासनेने मनुने जे मद्य आणि माँस ह्यावर बंधने आणले होते त्याला धार्मिक विश्वासामध्ये परिवर्तीत केले.

– बसंतकुमार मोहंती, नवी दिल्ली.
हे द-टेलिग्राफ मध्ये उपसंपादक आहेत.