Menu

बोधगया विशेषांक : महाबोधी विहाराचा प्रश्न इतिहासाची पुनरावृत्ती

सुखदेव थोरात

बोधगयामधील आंदोलनाला आता सुमारे ऐंशी दिवस झाले आहेत. हे आंदोलन आता जगातील अनेक देशांमध्ये पसरले आहे. काही निवडक देशांतील संस्था या मागणीला पाठिंबा देत आहेत. केंद्र सरकार आणि बिहार सरकारने बौद्धांच्या मागणीबाबत अजूनही कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. बौद्ध संघटनांची साधी मागणी आहे. बोधगया विहार हे केवळ राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय दृष्टिकोना तून महत्त्वाचे बौद्ध स्थळ आहे, त्यामुळे त्याचे व्यवस्थापन बौद्धांकडे असावे. सध्या त्याच्या व्यवस्थापनात बौद्ध व हिंदू दोघेही सामील आहेत, पण बहुसंख्या हिंदूंची आहे. बौद्ध विहारात ब्राह्मणवाद चोरपावलांनी शिरत आहे. बोधगयाच्या बौद्ध विहारात ब्राह्मणवाद का समाविष्ट केला जात आहे? याचे उत्तर आपल्याला इतिहासात पाहिल्यास मिळते. इतिहास आपल्याला सांगतो की, ज्या पद्धतीने आज गयाविहारात ब्राह्मणवाद आणला जात आहे, तीच पद्धत ब्राह्मणवाद्यांनी प्राचीन आणि मध्ययुगीन भारतात अनेक बौद्ध विहारांवर अतिक्रमण करण्यासाठी वापरली होती, विशेषतः अशोकाच्या काळानंतर (इ.स.पू.२३०), बौद्ध धर्माचा नाश करण्यासाठी ब्राह्मणवाद्यांनी बौद्ध विहारांचे विध्वंस. अतिक्रमण आणि विटंबनाचा उपयोग केला होता. बौद्ध विहारांच्या जागेवर हिंदू मंदिरे बांधणे ही त्यापैकी एक प्रमुख पद्धत होती. ब्राह्मणवाद्यांची ही रणनीती समजून घेण्यासाठी बौद्ध धर्म आणि ब्राह्मणवाद यांच्यातील ऐति हासिक संघर्ष समजून घेणे आवश्यक आहे. विध्वंस, अतिक्रमण आणि विटंबनाच्या पद्धती-अनेक अभ्यासकांनी हिंदू राजे व ब्राह्मण्यग्रस्त धार्मिक नेत्यांनी बौद्ध विहारांचा केलेला विध्वंस, अतिक्रमण व विटंबनेचे पुरावे दिले आहेत. येथे आपण केवळ दोन प्रख्यात अभ्यासकांचे दृष्टिकोन मांडतो. डॉ. डी. एन. झा आणि डॉ. लालमणी जोशी. डॉ. झा हे एक ख्यातनाम इतिहासकार आहेत तर डॉ. जोशी हे धर्माच्या तत्त्वज्ञानाचे तज्ज्ञ आहेत.

डॉ. डी. एन. झा:

डॉ. झा यांनी बौद्ध स्तूप, विहारे आणि इतर स्थापत्यांचे ब्राह्मणवादी शक्तींनी केलेल्या विटंबना व विध्वंस हस्तगत करण्याचे पुरावे एकत्रित केले आहेत. त्यांच्या मते, बौद्ध धर्मावरील हल्ले अशोकाच्या मृत्यूनंतर लगेचच सुरू झाले, पण इ.स.पू. १८५ नंतरच्या मौर्यकालोत्तर काळात ते अधिक योजनाबद्ध पद्धतीने सुरू झाले. ब्राह्मणवंशीय राजा पुष्यमित्र शुंग (इ.स.पू.१८५-१४९) याने बौद्ध धर्मीयांवर प्रचंड अत्याचार केले, त्याने स्तूपे उद्ध्वस्त केली, विहारे जाळ ली, भिक्षुंना ठार मारले व सियालकोटपर्यंत त्यांचा पाठलाग केला. त्याने प्रत्येक श्रमणाचे शिर कलम करणाऱ्यास शंभर सुबर्ण मोहरा बक्षीस जाहीर केले होते. पतंजली (इ.स.पू. १५०), शुंग राजवंशातील समकालीन, यांनी ‘महाभाष्य’मध्ये ब्राह्मण व बौद्ध है साप व मुंगूसासारखे शाश्वत शत्रू असल्याचे म्हटले आहे. डॉ. झा यांच्या मते, पुष्यमित्र शुंगाने पाटली पुत्रातील अशोक स्तंभ, सभा आणि कुकुटाराम विहाराचा विध्वंस केला.

मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमधील पुरावेः

मध्य प्रदेशः रायसेन जिल्ह्यातील सांची हे अशोकाच्या काळापासून महत्त्वाचे बौद्ध स्थळ होते, ज्याचा शुंग काळात विध्वंस करण्यात आला. रेवा जिल्ह्यातील कटनी परिसरातही हेच झाले. अहमदपूर येथे पाचव्या शतकात एका स्तूपाच्या जागेवर मंदिर बांधले गेले. विदिशाच्या आस पासच्या भागांतील अनेक बौद्ध विहार आठव्या शतकात शैव उपासनेच्या स्थळांत परिवर्तित करण्यात आले. विदि शाच्या ईशान्येकडील खजुराहो परिसरात एक बौद्ध संस्थान होते, जे दहाव्या शतकापासून हिंदू मंदिर संकुलात रूपांतरित झाले. घटाई मंदिर हे नवव्या दहाव्या शतकात एका बौद्ध स्मारकाच्या अवशेषांवर बांधले गेले.

उत्तर प्रदेशः येथेही मौर्योत्तर काळात बौद्ध स्थळांचा विध्वंस व हस्तगत झाल्याचे अनेक पुरावे आहेत. मथुरा येथील भूतेश्वर व गोकर्णेश्वर अशी सध्याची काही ब्राह्मण मंदिरे प्राचीन काळी बौद्ध स्थळे होती. कुशाण काळातील बौद्ध केंद्र असले ली ‘कत्रा टेकडी’ पुढे हिंदू धार्मिक स्थळात बदलली गेली. प्रयागाजवळील कौशांबी येथे ‘घोसिताराम विहार’ कदाचित पुष्यमित्रानेच उद्धवस्त करून जाळून टाकले. सारनाथ, जिथे बुद्धांनी आपले पहिले धर्मचक्रप्रवर्तन केले, हेही ब्राह्मण वाद्यांच्या हल्ल्याचे लक्ष्य ठरले. तेथेही एक हिंदू मंदिर, अशोक स्तूपाच्या अवशेषांवर बांधले गेले. बुद्धाशी संबंधित इतर अनेक शहरांचा विध्वंस करण्यात आला किंवा ब्राह्मणवादी धर्मात विलीन करण्यात आला. चिनी प्रवासी फा-हियान यांनी लिहिले आहे की, श्रावस्ती येथे ब्राह्मणांनी कुशाणकालीन बौद्ध स्थळाचा ताबा घेतला आणि तेथे गुप्तकाळात रामायण-आधारित मंदिर उभारले. सुलतानपूर जिल्ह्यात चक्क ४९ बौद्ध स्थळे ब्राह्मण शक्तींनी आग लावून नष्ट केली गेल्याचे पुरावे आहेत.

बिहारः उत्तर बिहारमधील वैशाली हे बुद्धाशी संबंधित एक महत्त्वाचे शहर होते, तेथेही विध्वंस घडून आला. झी सेंगझाई (इ. २६५-४२०) या चिनी यात्रेकरूच्या ‘वायगुओ शी’ या प्रवासवर्णनात म्हटले आहे की वैशालीतील विमलकीर्ती यांचे घर उद्धवस्त करण्यात आले होते.

ख्रिस्तपूर्व ६३१ ते ६४५ या काळात भारतात प्रवास केलेल्या चिनी बौद्ध भिक्षु आणि प्रवासी ह्यूएन त्सांग यांनी लिहिलेलं आहे की, शिवभक्त असलेल्या हूण राजाने मिहिरकुल (५०२-५३०ई.) सुमारे १६०० बौद्ध स्तूप व विहारे उद्धवस्त केली आणि हजारो बौद्ध भिक्षू व सामान्य बौद्धांची हत्या केली. त्यानुसार गांधारमधील १००० संघाराम पूर्णपणे ओसाड व भग्नावस्थेत होते, तर उहियानमधील १४०० संघाराम निरव शांततेत व नष्टप्राय अवस्थेत होते. मिहिरकुलचे ‘दैत्याचा अवतार आणि मृत्यूसमान विध्वंसक’ असे वर्णन करण्यात आले आहे.

काश्मीरः काश्मीरमधील काही राजांनी तर धोरणात्मक पातळीवर बौद्ध विहारे व मंदिरे पाडण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर बौद्ध संस्थानांचे विध्वंस करण्यात आले.

बिहारः ह्यूएन त्सांगच्या मते, गौडचा राजा शशांक याने बोधगयेतील बोधीवृक्ष छाटला, जे बुद्धाचे ज्ञानप्राप्तीचे स्थळ होते. त्याने बुद्धाची मूर्ती मंदिरातून हटवून महेश्वराची (शिवाची) मूर्ती बसवली आणि शैवपूजेला पुन्हा स्थापन केले. महाबोधी मंदिर अनेकदा पाडण्यात आले आणि पुन्हा बांधण्यात आले. बोधगयेत, अकराव्या शतकात विष्णू मंदिर उभारण्यात आले, जेथे त्याचा तळ व कुंपण आधीच्या बौद्ध स्थापत्याचे वापरलेले अवशेष होते.

नालंदा विद्यापीठाच्या परिसरात, सातव्या शतकाच्या मध्यकाळात विहार क्रमांक ७ व ८ च्या मागे मंदिर उभारण्यात आले. नालंदाच्या अनेक ठिकाणी विध्वंस करून पुन्हा ताबा घेण्याचे पुरावे आढळतात. मात्र नालंदा महाविहाराचा अंतिम विनाश तथाकथित ‘हिंदू कट्टरपंथीयांनी त्याच्या ग्रंथालयाला आग लावून केला होता. लोकप्रिय समजुतीनुसार हा विध्वंस अलाउद्दीन खिलजीने केला, परंतु ते खोटं आहे खिलजी-ने नालंदा येथे कधीच भेट दिली नव्हती, जरी त्याने आस पासच्या क्षेत्रातील विहारं पाडली.

कलचुरी राजा कर्ण (११वे शतक) याने माघदातील अनेक बौद्ध मंदिरं व विहारे नष्ट केली. तारानाथच्या मते (१७वे) शतक), ८४ बिहारे उध्वस्त झालेले होते, त्यात नालंदाही सामील होते. प्राचीन बंगालमध्ये लहान बौद्ध स्थळांचं ब्राह्मणांनी रूपांतर किंवा ताबा घेण्याचे अनेक उदाहरणे आहेत. उदा. बांकुडा येथील सिद्धेश्वर मंदिर स्तूपावर उभारले गेले, गोकुळ मेघ (महास्थान) आणि विरामपूर (दिनाजपूर) येथे बौद्ध वास्तू ब्राह्मण मंदिरांमध्ये रूपांतरित करण्यात आल्या (१२वे -१३वे शतक).

ओडिशा: अशोकाच्या काळात बौद्ध धर्माची भरभराट झाली. मात्र ७व्या शतकात शशांकने उत्कल व कोनगोडा जिंकताच बौद्ध स्थापत्याचा विध्वंस झाला. सोमवंशी (८२२-१११०) च पूर्व गंग (१०७८-१४३४) राजवटीत ब्राह्मण धर्म स्थळे बौद्ध विहारांवर उभारली गेली, पुरीतील जगन्नाथ मंदिर (१२वे शतक) पूर्वीच्या बौद्ध स्थळावर बांधले गेले असल्याची शक्यता आहे. तसेच पुरी जिल्ह्यातील पूर्णेश्वर, केदारेश्वर, कंतेश्वर, सोमेश्वर व अंगेश्वर ही मंदिरे बौद्ध विहारांवर किंवा त्याच्या अवशेषांवर उभारण्यात आली होती. कटकमधील बागलपूर येथील दक्षिणेश्वर मंदिर आणि तैला मठ (माधवाजवळ), सोहागपूरमधील अगिखिया मठ (पुरी), खर्बोहामधील कांधई मठ आणि बालासोर जिल्ह्यातील कोपारी येथील शैव मंदिर हे सर्व बौद्ध अवशेषांवर उभारले गेले आहेत. छत्तीसगडः शेजारच्या छत्तीसगडमध्येही असे अनेक उदा हरणे आहेत. सिरपूर (रायपूर जिल्हा) येथे आनंदप्रभू भिक्षूनी उभारलेले मुख्य मंदिर व विहार शैव संप्रदायाच्या ताब्यात गेले.

महाराष्ट्रः डॉ. झा यांच्या मते महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी बौद्ध स्थळांचे नाश किंवा ब्राह्मणांनी त्यांचा ताबा घेतलेला आहे. त्यांनी तीन उदाहरणं दिलीः (१) उस्मानाबाद जिल्ह्या तील टेर (प्राचीन टगार) येथे अप्सिडल बौद्ध मंदिराचे रूपांतर त्रिविक्रम मंदिरात झाले. (२) पुणे जिल्ह्यातील कार्ला येथे दगडी विहारातील स्तूप मोठ्या शिवलिंगात रूपांतरित करून ते शैव मंदिर बनवले गेले. (३) औरंगाबाद जिल्ह्यातील एलोरा येथे राष्ट्रकूट काळात मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झालेला असून बौद्ध लेण्यांचे ब्राह्मण मंदिरात रूपांतर झाले.

आंध्र प्रदेशः आंध्रमध्ये देखील बौद्ध स्थळांचे ब्राह्मणीकरण झाले. गुन्द्रर जिल्ह्यातील चेझरला येथील बौद्ध विहाराचे रुप तिर कुड्डालोर मंदिरात झाले. नागार्जुनकोंडामध्ये गुप्तकालात मोठ्या प्रमाणात बौद्ध वास्तूंचा विध्वंस झाला. अमराव तीत, कृष्णा नदीच्या काठावर असलेल्या महान स्तूपाजवळच शिव मंदिर उभारले गेले हेही अतिक्रमणाचं उदाहरण आहे. विजयवाड्याजवळील उंडवळली येथील बौद्ध लेण्यांवर ब्राह्मण संप्रदायांनी ताबा मिळवला.

कर्नाटकः अशोकाच्या काळात बौद्ध धर्माची भरभराट झाली असलेला कर्नाटक देखील त्यातून सुटला नाही. सहाव्या शतकातील लाड खान मंदिर हे पूर्वीचे बौद्ध विहार होते, त्याचे सूर्य-नारायण मंदिरात रूपांतर झाले. दक्षिण कर्नाटकातील मंगळुरू येथे कदारिका विहार या बौद्ध स्थळाचे १०६८ मध्ये शैव मंदिरात रूपांतर करण्यात आले.

दक्षिण भारतः दक्षिण भारतात शंकराचार्याच्या ब्राह्मण चळवळीमुळे बौद्ध धर्माला मोठा धका बसला. कांचीपुरम मधील कामाक्षी मंदिर हे पूर्वीचे बौद्ध स्थळ असण्याची शक्यता आहे ते तारा देवीच्या उपासनेसाठी असलेले बौद्ध स्थळ होते. तिरुप्पदिरीपुळीयुर, (कुठूलोरजवळ) येथील गुणधारीश्वर मंदिर हेही बौद्ध अवशेषांवर उभारले गेले, वैष्णव संत तिरुमंगे बांनी बौद्ध मूर्तीचा उपयोग त्यांच्या धर्मकृतीसाठी केला, हेही appropriation चे उदाहरण आहे. दक्षिण भारतात बौद्ध स्थळांचे रूपांतर अन्यत्रही घडले असण्याची शक्यता आहे. निष्कर्षः डॉ. झा यांच्या मते, इस्लामपूर्व काळात भारतात प्रचंड प्रमाणावर धार्मिक संघर्ष आणि बौद्ध स्थळांचा ब्राह्मणीकरणाद्वारे विध्वंस आणि अपहरण झाले. बौद्धधर्माच्या विनाशामध्ये ब्राह्मणांचा मोठा हात होता.

डॉ. लालमणी जोशी :

डॉ. जोशी यांनी इ.स. पहिल्या शतकापासून ते इ.स. १२ व्या शतकापर्यंत भारतातील बौद्ध धर्माचा -हास कसा झाला, याचे विश्लेषण दिले आहे. त्यांनी बौद्ध विहारांची संख्या, नाश आणि त्याच जागी बांधले गेलेले ब्राह्मणधर्मी मंदिरे याचा तपशीलवार उल्लेख केला आहे. त्यांनी बौद्ध विहारांची घटती संख्या आणि ब्राह्मण मंदिरांची बाढ याचे तुलनात्मक निरीक्षण अनेक भागांतील उदाहरणांनी मांडले आहे.

(१) डॉ. जोशी यांनी सर्वप्रथम ५ व्या शतकाच्या पहिल्या पावसाळ्यात (इ.स. ५१८-५२१) भारतात आलेल्या चिनी प्रवासी फा-होन यांनी दिलेले वर्णन दिले आहे. त्यांनी गंगा नदीचे मैदान, वैशाली, गया, कपिलवस्तू इ. स्थळांचे वर्णन केले आहे. त्यानंतर ७ व्या शतकात आलेल्या सांग-युन आणि ह्युएन त्सांग यांनी दिलेले वर्णन आहे.

फा-होन (इ.स. ५१८-५२१): रामग्रामः येथे फक्त एक विहार उरला होता. परिसर ओसाड होता. काहीच कुटुंबे उरली होती. सर्व वस्ती उद्धवस्त अवस्थेत होती.

सांग-युन आणि ह्युएन-त्सांग (७ वे शतक):

वैशालीः वैशाली उद्धवस्त अवस्थेत होते. फक्त १०० विहारे उरलेल्या होत्या. मठांमध्ये फारच थोडे भिक्षु उरले होते. कानौज: फक्त २ बिहार होते. भिक्षु वा भिक्षुणी नव्हते. उदयनाः पूर्वी येथे १४०० बिहारे व १८.००० भिक्षु होते. ७व्या शतकात फारच थोडे उरले होते.

गंधारः १००० बिहारे होती, पण सर्वच उद्ध्वस्त अवस्थेत. तक्षशिला (सिमपुरा): ओसाड.

काश्मीरः विहारांची स्थिती  ऱ्हासाच्या मार्गाबर होती. सिंघः १०,००० विहारे होती पण ऱ्हास सुरू होता.

स्थाण्विश्वरः फक्त ३ बिहार होते, पण १०० ब्राह्मण मंदिरे, मथुराः फा होनच्या काळात २० विहारे व ३००० भिक्षु होते. ह्युएन-त्सांगच्या काळात भिक्षु फक्त २००० उरले. श्रुध्मा, मथीतुरा, ब्रह्मपुरा, गोविसाना, अहीच्छत्र, कपिथा, आयमुखा, कौशांबी, श्रावस्ती, वाराणसीः सर्वत्र बौद्ध विहारों ची संख्या कमी झाली होती व हिंदू मंदिरांची संख्या वाढली होती. उदा, श्रावस्ती येथे बहुतांश विहारे उद्ध्‌वस्त होती आणि १०० मंदिरे होती. वाराणसीत ३० विहारे, ३००० भिक्षु आणि १०,००० शिवभक्त होते.

मगधः नालंदाजवळ १५ विहारे कार्यरत होती व १०,००० अनुयायी होते.

पूर्व भारत (७ वे शतक):

बंगालः ताम्रलिप्तिः फा होनच्या काळात २४ विहारे होती, पण ह्युएन त्सांगच्या काळात १० उरल्या, येथे १०० मंदिरे होती.

पुंडूवर्धन, समत्ता, कर्णसुवर्णः येथे मंदिरांची संख्या विहारांपेक्षा अधिक होती. उदाहरणार्थ, समत्तात १०० मंदिरे पण फक्त ३० बिहारे.

ओडिशाः कान्योढ, चिल्का झील जवळः बौद्ध अनुयायी नव्हते.

कलिंगः १० विहारे व १०० मंदिरे,

दक्षिण भारतः धन्यकटकः बौद्ध स्थळे ओसाड झाली होती. १०० पेक्षा अधिक मंदिरे होती.

चोल देशः विहारे उद्ध्वस्त अवस्थेत, फारच थोडे भिक्षु उरले होते. १० मंदिरे होती, मलाकुट (त्रावणकोर कोचीन): फारच थोडे विहार उरले होते.

पश्चिम भारतः कच्छ, सूरत, उज्जैन, महेश्वरपूरः सर्वत्र हिंदू मंदिर अधिक होती.

गुजरातः येथे बौद्ध धर्म जवळपास संपलेला होता. चित्तौड (राजपुताना): बहुतांश जनता अबौद्ध होती. सिंध: बौद्ध धर्म -हासाच्या मार्गावर.

डॉ. जोशी यांचे वर्णन स्पष्ट करते की, इ.स. पूर्व पहिल्या शतकापूर्वी बौद्ध विहार, भिक्षु आणि अनुयायांची संख्या मोठी होती. मात्र, इ.स. ७ व्या शतकापर्यंत बहुतांश भारतात बौद्ध धर्माचा -हास झाला. ब्राह्मणधर्माची वाढ मंदिर, पुरोहित आणि अनुयायांच्या स्वरूपात झाली.

ब्राह्मणधर्मी राजांकडून छळ आणि विहारांचा नाश

बौद्ध धर्माच्या न्हासामागे एक महत्त्वाचा कारण म्हणजे ब्राह्मणधमर्मी राजांनी केलेला छळ, विहारांचे जाळणे, आणि भिक्षुचे हत्याकांड.

पुष्यमित्र शुंग (इ.स.पू. १८५-१४९): मौर्य राजवटीचा शेवट करून या ब्राह्मण राजाने बौद्ध धर्माचा मोठा छळ केला. स्तूप उद्ध्वस्त केले, बिहारे जाळली, आणि भिक्षूना ठार मारले. श्रमणाचे डोके सादर केल्यास १०० सुवर्ण मोहरा जाहीर केले होते.

हूण राजा मिहिरकुल (कश्मीर): याला ‘यमासारखा क्रूर’ म्हटले गेले. त्याने १६०० बिहारे उद्ध्वस्त केल्या, ९०० कोटी बौद्ध अनुयायांचे संहार केले, बुद्धाचे पवित्र भांडे फोडले. तो शैव होता आणि ब्राह्मणांचा आश्रयदाता होता.

शशांक (गौडाचा राजा): याने पाटलीपुत्रातील बुद्धाचे पवित्र पदचिन्ह नदीत फेकले, बोधीवृक्ष तोडून जाळला, बुद्धमूर्ती काढून तिथे शंकराची मूर्ती बसवली.

राजा नरा, हर्षदेवः नरा याने ‘हजारो बिहारे’ जाळली. क्षेम गुप्त (इ.स. ९५०-९५८) याने जयेंद्रविहार उद्ध्वस्त करून त्याच्या ठिकाणी हिंदू मंदिर बांधले.

कलचुरी राजा कर्ण (११वे शतक), तेन राजे (बंगाल): यांनीही बौद्धांवर अत्याचार केले.

विहारांचा ताबा आणि हिंदू मंदिरांमध्ये रूपांतरण

डॉ. जोशी म्हणतात, ब्राह्मणधर्मी लोकांनी बौद्ध धर्मावर असहिष्णुता आणि हिंसा दाखवली. भारतीय संग्रहालयातील अनेक बौद्ध मूर्ती भग्नावस्थेत आहेत. या तोडफोडीस मुस्लिम आक्रमकांपेक्षा अधिक प्रमाणात ब्राम्हण्यग्रस्त हिंदू आक्रमक जबाबदार आहेत. हजारो बौद्ध ग्रंथ अस्तित्वात होते, पण आज केवळ चार उरले आहेत. ब्राह्मणधर्मी ग्रंथातही लिहिले आहे की ‘ब्राह्मण जर बौद्ध मंदिरात गेला तर, तो शेकडो प्रायश्चित्ते करूनही शुद्ध होऊ शकत नाही, कारण बौद्ध विधर्मी आहेत.’

कुमारिल आणि शंकराचार्य यांची भूमिका

बौद्ध धर्मावर सर्वात तीव्र वैचारिक आणि शारीरिक हल्ले करणारे दोन प्रमुख ब्राह्मण होतेः

कुमारिल भट्टः अत्यंत उग्र वेदवादी, ब्राह्मण वर्चस्ववादी. केरळ-उत्पत्ती ग्रंथात सांगितले आहे की त्याने बौद्ध धर्माचा केरळातून नाश केला. अनेक स्रोतांत त्याच्या धर्मयुद्धाचा उल्लेख आहे.

शंकराचार्य (इ.स. ७८८): त्यांनी हिमालय ते कन्याकुमारी पर्यंत बौद्ध धर्माचा नाश केला. शृंगेरी मठ त्यांनी एका बौद्ध विहाराच्या जागी स्थापन केला. डॉ. जोशी म्हणतात, बौद्ध आणि ब्राह्यणधर्म यांच्यातील संघर्ष हा फक्त विचारांचा नव्हता, तर तलवारीचाही होता.

बोधगया विहार : विध्वंस, अतिक्रमण आणि अपवित्रता

डॉ. झा आणि डॉ. जोशी यांनी गया विहाराच्या अतिक्रम णाच्या इतिहासावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. त्यांनी ह्युएन त्संगचा संदर्भ दिला आहे, जो सांगतो की गोड देशाचा राजा शशांक, जो सम्राट हर्षाचा समकालीन होता, त्याने बिहारमधील बोधगया येथे बुद्धांच्या बोधिस्थळाजवळ अस-लेले बोधिवृक्ष तोडून टाकले. त्याचबरोबर बुद्धाची मूर्ती स्थानिक मंदिरातून हटवून त्या ठिकाणी महेश्वर (शिव) याची मूर्ती बसवण्याचे आदेश दिले. त्यांनी आणखी एक मते मांडली आहे की, शैव पंथीयांनी आधीच त्या स्थळाचा ताबा घेतला होता आणि शशांकने केवळ शिवपूजेची पुनर्स्थापना केली.

बोधगया पुन्हा पाल राजवटीत बौद्धांच्या ताब्यात आले, कारण पाला राजे बौद्ध होते. पण गया हे धार्मिक संघर्षाचे स्थळ राहिले, याची साक्ष परंपरागत विवरणे आणि पुरातत्त्वीय पुरावे देतात. महाबोधी मंदिर वारंवार उद्धवस्त केले गेले आणि पुन्हा बांधले गेले. जवळील गया शहर, जे पौराणिक ग्रंथांमध्ये ‘पितृतीर्थ’ म्हणून प्रसिद्ध आहे (जिथे पितरांसाठी श्राद्ध विधी केले जातात), येथे ११ व्या शतकाच्या मध्यात विष्णू मंदिराची स्थापना करण्यात आली. हे मंदिर बौद्ध वास्तूंच्या अवशेषांवरच उभारले गेले आणि त्याचे जमिनीचे फरशी आणि कठडे पुन्हा वापरलेल्या (बौद्ध) सामग्रीतून बनवले गेले.

डॉ. झा यांनी नमूद केले आहे की, गौड देशाचा राजा शशांक याने पाटलीपुत्रात असलेली बुद्धाच्या पादचिन्हांची पवित्र शिला गंगेत फेकून दिली. त्याने गया येथील पवित्र बोधिवृक्ष मुळापर्यंत तोडून टाकला आणि त्याचे उरलेसुरले भाग जाळून टाकले. तसेच बोधिवृक्षाच्या पूर्वेकडील मंदिरात असलेली बुद्धमूर्ती काढून तिथे शिवाची मूर्ती बसवली.

ह्युएन त्संग याच्या साक्षेला शशांकाच्या नाण्यांनी पुष्टी दिली आहे. या नाण्यांवरून सिद्ध होते की शशांक अत्याचारी होता आणि एक उग्र शिवभक्त हाता.

शिकवणः

डॉ. झा, डॉ. जोशी आणि इतर अभ्यासकांचे (उदा. जिओव्हानी व्हेराडर्डी, Hardship and Downfall of Buddhism in India, २०१४) साक्ष सांगतात की गया विहारावरचे सध्याचे अतिक्रमण हे प्राचीन व मध्ययु गीन काळापासूनच चालत आलेले आहे आणि आजही चालू आहे. बौद्ध विहारांवर अतिक्रमण करून तिथे हिंदू मंदिरे बांधण्याची प्रक्रिया अशोक नंतरच्या काळापासून (इ.स.पू. २०० च्या सुमारास) थांबलेली नाही. ब्राह्मणी धर्माने ही रणनीती कधीही सोडलेली नाही. ती अजूनही सुरू आहे. ही साक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मताला आधार देते. त्यांच्या मते बौद्ध धर्माच्या हासाचे मुख्य कारण म्हणजे ब्राह्मणधर्मीयांनी केलेला हिंसक विरोध होता.

डॉ. आंबेडकर यांनी आणखी एक मत मांडले. त्यांच्यानुसार बौद्ध धर्मीयांवर झालेल्या हिंसेमुळे, विशेषतः जिथे अत्या-चार प्रचंड होता, अशा भागांतील बौद्ध मोठ्या प्रमाणात इस्लाममध्ये परिवर्तित झाले. इतर अभ्यासकांनीही त्यांच्या या मताला पाठिंबा दिला आहे. या कारणाने बंगाल, सिंघ, काश्मीर आणि उत्तर-पश्चिम भारतात मुस्लिम लोकसंख्या का अधिक आहे, हे समजते.

या ऐतिहासिक अनुभवावरून असे दिसून येते की गेल्या ८० दिवसांपासून बौद्ध समाजाने केलेल्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची शक्यता फारच कमी आहे. तरीही, बौद्ध समाजाने आपली चळवळ आणि प्रयत्न चालू ठेवले पाहिजेत.

Comments 2

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *