Menu

बातम्या

राज्यातील हजारो शाळा असुविधांनी ग्रस्त- शिक्षक,वीज, संगणक, इंटरनेट, स्वच्छतागृहांचा अभाव, ‘यूडायस प्लस’ अहवालातील नोंदी

राज्यातील २५ हजार ९५८ शाळांमध्ये अध्यापनासाठी संगणक सुविधा, ३० हजार १६६ शाळांमध्ये इंटरनेट सुविधा, ५ हजार ५६७शाळांमध्ये वीजच नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच, ६ हजार ९६४ शाळांमध्ये मुलींचे, १० हजार १८९ शाळांमध्ये मुलांचे कार्यक्षम स्वच्छतागृह नसल्याचेही आकडेवारीवरून दिसून येते. एकीकडे डिजिटल इंडियाचे नारे देत विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या नव्या युगाच्या तंत्रज्ञानासाठी सक्षम करण्याच्या घोषणा केल्या जात असल्या, तरी या आकडेवारीच्या निमित्ताने राज्यातील वास्तव वेगळेच असल्याचे समोर आले आहे.तसेच, राज्यातील शाळांपैकी एकूण ८ हजार १५२ शाळा एकशिक्षकी असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *