Menu

डॉ. असंग वानखडे

रिसर्च स्कॉलर ऑक्सफोर्ड, यांच्या आवाज इंडियावरून मुलाखतीचा सारांश

मुद्दे

  • महाबोधी मंदिर संकुल, बोधगया, बिहारमधील गया जिल्ह्यापासून १६ किमी व राज्याची राजधानी पाटणा पासून ११५ किमी दक्षिणेस आहे. भगवान बुद्ध यांच्या जीवनाशी संबंधित चार पवित्र स्थळांपैकी एक आहे, विशेषतः तेथे त्यांना ज्ञानप्राप्ती झाली होती.
  • अशोक सम्राटाने इ.स.पू. तिसऱ्या शतकात सर्वप्रथम येथे मंदिर बांधले.
  • सध्याचे मंदिर ५व्या-६व्या शतकातील असून भारतातील सर्वात जुने, पूर्णतः विटांनी बांधलेले बौद्ध मंदिर आहे.
  • संकुलामध्ये मुख्य ५० मीटर उंचीचे मंदिर, वज्रासन, पवित्र बोधी वृक्ष, बुद्धाच्या ज्ञानप्राप्तीशी संबंधित सहा अन्य पवित्र स्थळे आणि असंख्य प्राचीन स्तूप आहेत. हे संकुल पुरातत्त्वीय दृष्टिकोनातून अनमोल आहे आणि २००२ मध्ये जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आले.

२००२ साली जागतिक वारसा स्थळ म्हणून यादीत समाविष्ट एकदा का एखाद्या स्थळाची जागतिक वारसा यादीत नोंद झाली (आणि ते ‘जागतिक वारसा मालमत्ता’ ठरते), तेव्हा भारतीय सरकारने त्या स्थळाच्या संरक्षण, संवर्धन व सादरीकरणासाठी प्रभावी आणि सक्रिय उपाययोजना करणे बंधनकारक असते. त्यासाठी, युनेस्कोच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, संबंधित राष्ट्रांनी वारसा स्थळांचे संरक्षण, संवर्धन आणि सादरीकरण यासाठी सेवांचे आयोजन करणे आवश्यक आहे, तसेच कायदेशीर, वैज्ञानिक, तांत्रिक, प्रशासनिक आणि आर्थिक उपाययोजना करून वारसाचा नाश होऊ न देणे, किंवा थेट किंवा अप्रत्यक्षपणे नुकसान पोहोचवणारी कोणतीही कृती टाळणे आवश्यक आहे.

युनेस्को जागतिक वारसा समितीसमोर सादरीकरणाची प्रक्रियाः

  • जागतिक वारसा समितीच्या मार्गदर्शक तत्त्वांचे स्पष्ट उल्लंघन
  • महाबोधीचे जागतिक वारसा दर्जा धोक्यात
  • कारवाईचे आवाहनः युनायटेड नेशन्सच्या सांस्कृतिक अधिकारांबाबत विशेष प्रतिनिधी व धर्मस्वातंत्र्यावरील विशेष प्रतिनिधी यांच्याकडे अर्ज करून ‘भारतीय सरकारने आंतरराष्ट्रीय कायद्याचे पालन करावे यासाठी निर्देश मागवावेत.
  • आंतरराष्ट्रीय कायद्याच्या अंमलबजावणीसाठी १९४९ चा कायदा अडथळा ठरतो
  • वारसाचे संरक्षण, संवर्धन व सादरीकरण यासाठी योग्य कायदेशीर, वैज्ञानिक, तांत्रिक, प्रशासकीय व आर्थिक उपाययोजना करणे आणि कोणत्याही प्रकारचे नुकसान न टाळणे हे आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार बंधनकारक आहे.

आंतरराष्ट्रीय कायदा आणि भारतीय राज्यघटना:-

  • भारतीय सर्वोच्च न्यायालयात रिट याचिका दाखल करणे आवश्यक मोनीस्ट विरुद्ध ड्युअलिस्ट प्रणालीः विशाखा प्रकरण (१९९७) नुसार, जेथे भारतीय कायद्यात पोकळी आहे तेथे सर्वोच्च न्यायालय आंतरराष्ट्रीय कायद्याच्या अंम लबजावणीसाठी हस्तक्षेप करू शकते.
  • भारतीय सरकारकडून निष्क्रियता ही आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन आहे. त्याचप्रमाणे, हे अनुच्छेद २५ अंतर्गत भारतीय बौद्धांचे धर्म स्वातंत्र्याचे उल्लंघन आहे ज्यामुळे त्यांना आपला धर्म स्वीकारणे, आचरण करणे व प्रचार करण्याचा अधिकार मिळतो.

घटक व उपाययोजना (WAY FOR WARD):

  • युनेस्कोने ही प्रक्रिया स्वीकारलेली आहे. त्यानुसारः वारसा स्थळांच्या संरक्षणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
  • जाणूनबुजून किंवा अजाणतेपणी वारसाचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेणे बंधनकारक आहे.
  • वारसा स्थळांची सद्यस्थिती युनेस्कोला नियमितपणे कळवावी लागते.

उल्लंघनाचे पुरावेः

  • बुद्ध मंदिरे हडप करून त्यास हिंदू मंदिर म्हणून सादर करणे
  • बुद्धाच्या मूर्तीना हिंदू देवता (पांडव, देवी) म्हणून दर्शवणे
  • प्राचीन बुद्ध मूर्तीची चोरी व नाश
  • मंदिरात शिवलिंग बसवण्यासाठी बुद्ध मूर्ती काढून टाकणे

कायदेशीर उपाययोजना

  • १९४९ कायद्याच्या असंवैधानिकतेविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात रिट याचिका
  • मंदिर व्यवस्थापन समितीच्या अधिकाऱ्यांविरुद्ध राज्य व केंद्र सरकारकडे तक्रार
  • युनेस्को जागतिक वारसा समितीकडे सादर करणे
  • लोकआंदोलन चालू ठेवणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *