
हिंदू समाज समर्थ करावयाचा असेल तर चातुर्वर्ण्य व असमानता याचे उच्चाटन करून हिंदू समाजाची रचना एकवर्णत्व व समता या दाेन तत्त्वांच्या पायावर केली पाहिजे. अस्पृश्यता निवारणाचा मार्ग हा हिंदू समाज समर्थ करण्याच्या मार्गापासून भिन्न नाही. म्हणून मी म्हणताे की, आपले कार्य जितके स्वहिताचे आहे तितकेच राष्ट्रहिताचे आहे, यात काही किंतु नाही. सामाजिक क्रांतीची जबाबदारी मुख्यतः समाजातील बुद्धिमान वगार्वरच असते, ही गाेष्ट काेणालाही नाकबूल करता येणार नाही. भविष्य काळाकडे नजर देऊन चालू घडीला समाजाला याेग्य मार्ग दाखविणे हे बुद्धिमान वगचि पवित्र कर्तव्य आहे. हे कर्तव्य पार पाडण्याची तत्परता ज्या समाजातील बुद्धिमान लाेक दाखवितात, ताेच समाज जीवन कलहात टिकाव धरू शकताे.
वास्तविक पाहिले असता ह्या अन्यायास आम्ही मान दिला म्हणूनच आज इतके दिवस चालू राहिला आहे. ताे झुगारून देण्याच्या जरा मी मनापासून निश्चय केला तर ताे काेणीही आमच्यावर लादू शकत नाही. ज्या ब्राह्मणी धर्माने आपल्याला हीन करून टाकले त्याच ब्राह्मणी धर्माने कायस्थासारख्या जातीवरही हीनत्त्वाच्याशिक्का मारण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला. परंतु त्यातील लाेकांनीवेळेवर प्रयत्न केल्यामुळे त्याच्या वज त्यांना कायम ठेवता आला.कालाचे चक्र उलट फिरत असतात आमच्या पूर्वजांनी झाेप घेतली. इतरांप्रमाणे आमच्या लाेकांनीही डाेळे उघडे ठेवून हाेत असलेल्या अन्यायाच्या प्रतिकार वेळीच केला असता तर आज अस्पृश्य हा केवळ इतिहासातला शब्द म्हणून राहिला असता. तसे करण्याचे निश्चय मागील पिढीने केला नाही हे अत्यंत लाच्छनाची गाेष्ट आहे. परंतु मागील पीडित ज्ञानाच्या प्रसार नाकारल्या कारणाने त्यांच्या बेिफिकिरी वर्तनास क्षम्य म्हणता येईल. परंतु या पिढीची गाेष्ट निराळी आहे. अस्पृश्यांना कदापिं न प्राप्त झालेले ज्ञान या पिढीला लाभलेले आहेत आणि म्हणून मागील पिढीच्या हातून पिढीच्या हातून जी गाेष्ट घडली नाही, ती गाेष्ट घडून आणणे हे या पिढीचे कर्तव्यकर्म आहे. त्यास जर या पिढीतील लाेक जाणणार नाही तर ते कुलवंत नसून कुलांगार आहेत, असेच म्हणावे लागेल.
-डाॅ. बाबासाहेब आंबेडकर. बहिष्कृत भारत 25 नाेव्हेंबर 1927