Menu

डाॅ.आंबेडकरसाहेब व चर्मकार समाज

( जनता खास अंक १९३३ ) – गणपत नारायण कांबळे, पुणे.
( चर्मकार समाजातील एक तडफदार तरुण. डाॅ. आंबेडकर यांच्या अस्पृश्य वर्गाच्या ध्येयानुसार अस्पृश्य तरुणांनी संघटनेच्या बळावर कार्य करावें असें यांचे प्रामाणिक मत आहे. )

डाॅ. आंबडेकराइतके विद्वान अस्पृश्य समाजात दुसरे काेणी नाही व ब्राह्मणेतरातही विरळाच आहेत. विद्वत्तेच्या दृष्टीने अस्पृश्य समाजात ते जसे अद्वितीय आहेत तसे पुढारी- पणातही आता अद्वितीय झाले आहेत. अस्पृश्याेद्धाराच्या कार्यात म.गांधी इतकेच ते मानले जातात. महार वगैरे लाेक तर त्यांना देवाप्रमाणेच समजतात. आपले शिक्षण पुरे करून ते जेव्हा स्वदेशी आले तेव्हा त्यांची इतकी प्रख्याती नव्हती. तथापि एक विद्वान म्हणून त्यांचा सत्कार जागाेजाग हाेतच असे. पण ते पुढारी हाेतील असे त्या वेळी काेणालाच वाटले नव्हते. पुढा-याचा धडपड्या स्वभावही त्यांचा नाही. तरीपण बडाेदे दरबारची व ब्रिटिश सरकारची काेणतीही नोकरी न पत्करता बॅरिस्टरी सुरू करून त्यांनी जेव्हा विधायक कार्यास सुरुवात केली तेव्हा ते आपाेआपच चमकू लागले. सरकारने त्यांना काैन्सिलात नाॅमिनेट केले. बहिष्कृत भारत पाक्षिक काढून व बहिष्कृत हितकारिणी सभा स्थापून त्यांनी
अस्पृश्याेद्धाराच्या कार्यास बरीच चालना दिली. महाडचा सत्याग्रह केल्यापासून तर ते अस्पृश्य समाजाचे एकमेव पुढारी मानले जाऊ लागले. राऊंड टेबल काॅन्फरन्सचे प्रतिनिधी त्यांना नेमून सरकारने त्यांच्याकडे अखिल भारतीय अस्पृश्यांचे पुढारीपण दिले व ते त्यांनी सरकारचा व म. गांधी सारख्यांचा राषे पत्करूनही कसे एकनिष्ठेने बजाविले ते आता सर्व विदितच आहे. ते जातीने महार असले तरी समतावादी असल्यामुळे त्यांची इतकी काेती दृष्टी नाही.

समाज समता संघ स्थापून त्यांनी अखिल हिंदूसमाजाबद्दलचा कळवळा व्यक्त केला आहे. ते पूर्ण राष्ट्रीय वृत्तीचे आहेत. म. गांधी विेशबंधू असले तरी जसे व ज्या कारणा- मुळे केवळ भारतीयांसाठी धडपडतात तेसे व त्याच कारणांमुळे डाॅ. आंबेडकरही केवळ अस्पृश्यांसाठी झगडतात व तसे करताना त्यांनी ज्ञातिदृष्टी पत्करली आहे असे भासते.
महाराष्ट्रातील काही चांभारांची त्यांच्याबद्दल बरीच कूरकूर आहे. सर्व अस्पृश्याच्ं या नावांवर डाॅ. आंबेडकर महार जातीचेच
सर्व फायदे करून देतात अशी त्यांची तक्रार आहे. डाॅ. आंबेडकरांचे प्रमुख सहकारी किंवा प्रायव्हेट सेक्रेटरी एक काेंकणी चांभार आहेत आणि धारवाड, काेल्हापूर वगैरे भागातील काही देशी चांभारांचाही त्यांना पूर्ण पाठिंबा आहे. त्यामुळे काही चांभारांची त्यांच्यावरील टीका फिकी पडते. शिवाय या टीकाकारांनीही आपल्या ज्ञातिबद्दल काहीच केलेले नाही. स्वतः हातपाय न हालविता दुस-याला दाेष देणा-याच्या वटवटीला काेणीही किंमत देत नसतात. त्यामुळे काही चांभार टीकाकारांची टीका व्यर्थ ठरते. अस्पृश्य जातीमध्ये महारांची प्रगती हाेत असल्यास तिला त्यांचेच गुण कारण आहेत. ते बहुसंख्यक असल्यामुळे सर्वत्र
तेच प्रामुख्याने दिसतात. परस्परांना मदत करण्याची त्यांची वृत्ती, त्यांची तड व नव्या गाेष्टीचा स्वीकार करण्याची त्यांची तयारी
वगैरे गुणांमुळेच त्यांची प्रगती हाेत आहे. उलट चांभारांची मत्सरी वृत्ती, कमकुवतपणा, संघटनेचा अभाव व घरबशा स्वभाव वगैरे
दुर्गुणांमुळेच समाज ह्या दृष्टीने चांभार मागे पडत आहते . आपलेच कर्म खाेटे असताना इतरांना दाेष देणे यात हंशील काय? महार समाजच नादान असता तर डाॅ. आंबेडकर तरी काय करू शकले असते? डाॅ. आंबेडकरांचा उपयाेग करून घेण्यास लायक महार भेटले म्हणूनच त्यांचा उत्कर्ष हाेत आहे. तसे चांभार गृहस्थ काेणी निघाले नाहीत. म्हणनू च डाॅ. आंबेडकरांचा त्यांना उपयाेग हाेत नाही हेच खरे. डाॅ. आंबेडकरांना दाेष देणा-या चांभारांनी तरी काय केले आहे? पुण्याचचे उदाहरण घऊे . हे ठिकाण शिक्षणाचे केंद्र असून व येथे सुखवस्तू चांभारांची बरीच वस्ती असून चांभार ज्ञातीने एकही वसतीगृह काढले नाही किंवा घरगुती तन्हेने काेणाला मदतही केली नाही. मुलामुलांनीच काही वर्षापूर्वी एक मंडळ काढले पण तेथे सारी पाेराटकीच! अशा ठिकाणी लायक व हाेतकरू विद्यार्थ्यांना उत्तेजन काेठून मिळणार! पंच वगैरे जुने पुढारी भंडारे घालण्यात व धर्मशाळा व देवळे बांधण्यातच मश्गुल ! आपल्या ज्ञातिबांधवांची व्यसने नष्ट करून सहकार्याने धंद्याची अभिवृद्धी करून व शिक्षणाचा प्रसार करून आपल्या ज्ञातीची सर्वांगीण प्रगती करण्याचे त्यांना सुचतही नाही. त्यामुळे साेनार, कासार, न्हावी, परीट, तेली, तांबट वगैरे धंदेवाईक अल्पसंख्यक समाज ब्राह्मणेतरांत जसे मागासलेले राहिले आहेत व माळी मराठे पुढे चालले आहेत तसेच अस्पृश्यांतील महार मांगादी उत्कर्षास चढत असून, ढाेर, चांभारादी धंदेवाले अल्पसख्ं यक समाज हीनावस्थेस पाेहचत आहेत. आपला धंदा बरा की आपण बरे हीच ज्याची त्याची वृत्ती. त्यामुळे इतर बाबीकडे दुर्लक्ष हाेत जाऊन हातचा धंदाही चाललाच; असाे. केवळ आपल्या कर्तबगारीवर काही चांभार तरुण नवी विद्या शिकून किंवा अन्य मार्गाने पुढे येत आहेत. पण त्याचे श्रेय चांभार ज्ञातीला मुळीच नाही. हेही ज्यांना साधत नाही असे काही बेकार इतरांची कुटाळकी करीत फिरत असतात.
अशांनी डाॅ. आंबेडकरांची कितीही नालस्ती केली तरी तिला जग मुळीच किंमत देत नाही. कारण हे कमकुवत लाेक आज ब्राह्मणांना तर उद्या ब्राह्मणते रांना, एकदा ज्ञातीला तर एकदा धर्माला, केव्हातरी सरकारला तर केव्हा केव्हा
डाॅ. आंबेडकरां सारख्यांना दाेष देत राहणारच. पण आपला दाेष त्यांना कधीही दिसावयाचा नाही. डाॅ. आंबेडकर काेणाच्याच टीकेला दाद देत नाहीत मग असल्या नामर्दाच्या टीकेला ते थोडीच दाद देणार आहेत! चांभार समाजाच्या अवनतीला हे असले नादान व स्वार्थी लाेकच कारण आहेत. नाहीतर एक महत्त्वाचा धंदा हातात असलेले व इतर अस्पृश्य जातीपेक्षा अधिक हुशारी व इतर अनुकूलता असलेले चांभार तरुण मागासललेले कां राहिले असते? इतर सर्व लहान माेठ्या जातीच्या परिषदा व संस्था आहते पण चांभार समाजाची एकही सुरळीत संस्था नाही व व्यवस्थित चालणारी परिषद नाही. समाज
सुधारणेसाठी फंड जमविलेला नाही किंवा इतर काेणताही प्रयत्न नाही. याप्रमाणे सारा दाेष आपणाकडे असताना दुस-याच्या
नावाने घराेघर कुजबुजण्यात किं वा पाेरकटपणाने जाहीर नालस्ती करण्यास चांभार मंडळी पुढे हाेतात याला काय म्हणावे?
आता अल्पसंख्यक म्हणून चांभार समाजाकडे अस्पृश्य पुढा-यांनी अधिक लक्ष दिले पाहिजे हे काही खोटे नाही. पण या
बाबतीतही लायकी दाखवावी लागते. झगडल्याशिवाय हक्काची सुद्धा शाबिती हाेत नसते. युराेपियन, अँग्लाे इंडियन व मुसलमान
अल्पसख्ं यकांची इतकी कदर बहुसंख्यक समाज व सरकार करते याचे कारण त्या समाजांनी आपली लायकी सिद्ध केली आहे हेच हाेय. बा्र ह्मण, पार्शी, ख्रिश्चन व ज्यू या अल्पसंख्याक समाजांनी तर आपली लायकी इतकी प्रगट केली आहे की, त्यांना अल्पसंख्याक म्हणनू सवलती मागाव्याच लागत नाहीत. चांभार समाजाला असे करता आले असते. पार्शी अल्पसंख्याक जातीप्रमाणे नाहीतरी मुसलमानादी अल्पसंख्यकाप्रमाणे तरी आपली कुवत चांभार समाजाने दाखविली असती तर डाॅ. आंबेडकर पक्षपात करतात असे कुजबुजण्याची फुरसतच त्यांना मिळाली नसती. डाॅ. आंबेडकरांनी पक्षपात मुळीच केलेला नाही. हाेतकरू महारांनाच काय पण ब्राह्मण, प्रभू, भंडारी व ख्रिश्चन, मुसलमान वगैरे हाेतकरू तरुणांनाही त्यांनी मदतीचा हात दिलेला आहे. चांभार तरुणांना ताे मिळत नसेल तर त्याला त्यांच्या नादानपणाच कारण आहे. एकजुटीने चांभार समाजाने आपला धंदा जर भरभराटीस आणला असता, ज्ञातिंड उभारून शिक्षण प्रसाराचे यथाशक्ती प्रयत्न केले असते, आपल्या ज्ञातीतील दाेष दूर करण्यासाठी संघटित प्रयत्न केले असते, सरकार, राष्ट्रीय पुढारी व डाॅ. आंबेडकरांसारखे सामाजिक पुढारी यांच्याशी सहकार्य करून त्यांना जर वेळाेवेळी मदत केली असती तर पार्शी समाजाप्रमाणे व इतर मुसलमान समाजा प्रमाणे सरकारने त्यांच्या हक्काचीही फिकीर बाळगली असती. पण स्वतः काहीच न करता ताेंडावर पडलेले जांभुळही गिळण्याचे श्रमन करणा-या आळशाप्रमाणे वागून दैवाला दाेष देणा-याचे जगात हंसे झाल्यास नवल काय? आपले सुदैवाने डाॅ. आंबेडकरांसारखे पुढारी आपल्या समाजास लाभले आहेत. श्री. काजराेळकर, श्री. सामराणी, श्री. पवार वगैरे प्रमाणे त्यांचे हाकेला ओ देऊन त्यांचे प्रेम चांभार कार्यकर्त्यांनी संपादले पाहिजे. सर्व अस्पृश्य जातीमध्ये संख्येच्या दृष्टीने कितीही फरक असला तरी अस्पृश्य या नावाखाली सार्वजनिक दृष्टीने सर्व जातीचे लाेक एकाच नावेत बसलेले आहेत.
ते एकमेकाला मदत न करतील तर सारेच बुडतील. महारांनी चांभाराशी गाेडीगुलाबीने वागून त्यांच्याकडून मदत मिळविली
पाहिजे व चांभारांनीही त्यांच्याशी फटकून न वागता सहकार्य केले पाहिजे. सरकारच्या व म. गांधी आणि पंडित मालवीयांच्या
प्रयत्नांमुळे अस्पृश्याेद्धारास अनुकूल वेळ आलेली आहे. अशावेळी चांभार समाज जर आत्माेन्नतीसाठी प्रयत्न करणार नाही तर त्याच्यासारखा दुर्दैवी ताेच. आळशावर गंगा आल्याप्रमाणेच ही शाेचनीय स्थिती हाेय. सरकार व लाेकपक्ष, हिंदू व परधर्मी, स्पृश्य व अस्पृश्य आणि महार व चांभारादी अल्पसंख्यक यांच्यामधील दुव्यासारखे डाॅ. आंबेडकर आहेत. त्यांची भरभराट हाेवाे असेच प्रत्येक समाजहितचिंतक चिंतील. डाॅ. आंबेडकरांना मदत करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *