Menu

जेंडर गॅप रिपोर्ट अहवाल- 2024

‘वर्ल्ड इकॉनोमिक फोरम’ तर्फे दरवर्षी जागतिक जेंडर गॅप रिपोर्ट प्रसिद्ध केला जातो. हा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला. या अहवालानुसार यंदा भारत 146 देशांमध्ये 129 व्या स्थानावर आहे. हा अहवाल पुरुष आणि स्त्रियांमधील जागतिक आणि देशनिहाय अशा लिंग असमानतेचं विश्लेषण करतो. आर्थिक सहभाग आणि संधी, शैक्षणिक उपलब्धता, आरोग्य जीवनमान व राजकीय सक्षमीकरण अशा निकषांवर आधारित हा अहवाल असतो. शाश्वत विकास व सामाजिक एकात्मतेसाठी लैंगिक समानता हा महत्त्वाचा घटक आहे. यावरून  लैंगिक समानता हा निकष पूर्ण करण्यासाठी आणखी बरीच वर्षे वाट बघावी लागणार आहे असे या अहवालावरून लक्षात येते. 

– संकलन- डॉ. विद्या चौरपगार (दि. १७ जुलै २०२४ )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *