Menu

आजकालच्या घडामाेडी

वर्धा
शिक्षण बचाव समन्वय समिती, महाराष्ट द्वारा आयाेजित राज्यस्तरीय शिक्षण हक्क व आशय परिषद, वर्धा येथे आयाेजित करण्यात आली ही परिषद वर्धा येथील बजाज सार्वजनिक वाचनालय बॅचलर राेड या ठिकाणी रविवार, दिनांक 15 सप्टेंबर, 2024 ला सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजता संपन्न झाली. या परिषदेचे उद्घाटन सत्र प्रा. डाॅ. सुखदेव थाेरात, डाॅ. उमेश बगाडे व रमेश बीजेकर यांनी पार पाडले. सत्र- एक मध्ये प्रा. मारुती बेगमपुरे, मा. शरद जावडेकर, प्रा. संताेष सुरडकर व प्रा. मिलिंद वाघ यांनी विषयांची मांडणी केली. सत्र – दाेन मध्ये प्रा. रेणुकादास उबाळे, मा. अण्णा सावंत, सुषमा भड, प्रा. मंगेश भुजाडे, प्रा. जावेद शेख व मनाेज देशमुख यांनी विषय मांडणी केली. सत्र- तीन मध्ये राम शृंगारे यांनी गाव व शाळा भेटीचे अनुभव सांगितले
तर बहुमूल्य ठरावाचे वाचन चंदू पाेपटकर यांनी केले. मा. रमेश विजयकर यांनी विषयाची मांडणी करताना भारतीय परंपरा म्हणजे वैदिक ब्राह्मणी परंपरा असे ते समजतात, मात्र तसे नाही. भारताच्या लिखित इतिहासात केवळ वैदिक परंपराच आढळते. मात्र बाैद्ध व जैन परंपरा दिसत नाही. यावरून त्यांना देशात वैदिक ब्राह्मणी परंपराच रुजवायची आहे व अब्राह्मणी परंपरा नष्ट करायची आहे, असे दिसते. नवीन शैक्षणिक धाेरणात त्यांना हे प्राधान्याने करायचे आहे, म्हणून त्यांना शिक्षणाचा पॅटर्न
बदलायचा आहे. आम्हाला हे हाेऊ न देण्यासाठी आपली जागरूकता वाढवणे, हा या परिषद आयाेजित करण्याचा उद्देश आहे.

या परिषदेचे उद्घाटन विद्यापीठ अनुदान आयाेग व भारतीय समाज विज्ञान परिषदेचे माजी अध्यक्ष तसेच सामाजिक व आर्थिक समता संघाचे अध्यक्ष प्रा. डाॅ. सुखदवे थाेरात यांचे हस्ते पार पडले. उद्घाटकीय भाषण करताना डाॅ. थाेरात म्हणाले की वर्तमान शैक्षणिक धाेरणांमधील शालेय व उच्च शिक्षणातील आव्हाने अतिशय गंभीर आहेत. प्रत्येकाला शिक्षण मिळावे हे तत्व इथे डावलले जाणारी यंत्रणा- व्यवस्था निर्माण करणार, असे दिसते. अनेक देशांध्ये शिक्षण हे स्वस्त व माेफतही आहे. भारतात आता सर्वाना शिक्षणाची संधी सरकारने द्यावी, हा विचार सुद्धा दुर्लिक्षत करून ‘असमान शैक्षणिक संधी- दर्जा व सुविधा‘ असे सूत्र नवीन शैक्षणिक धाेरणात समाविष्ट केले ते अत्यंत चुकीचे आहे. सर्वसामान्यांच्या दृष्टीने ही फार माेठी समस्या आहे अभ्यासक्रमामध्ये वैज्ञानिक दृष्टिकाेन, काैशल्य व नीतिमत्ता यावर भर देणे आवश्यक आहे. तिकडे प्रचंड दुर्लक्ष
आहे. त्याऐवजी कल्पित व धार्मिक शिक्षणावर अधिक भर आहे, हे एक माेठे आव्हान आहे. चाैथे आव्हान- सर्वसामान्यांचा शिक्षणातील उत्तराेत्तर कमी हाेत जाणारा सहभाग, हे आहे. यासाेबतच शिक्षणाला आव्हान देणारी वर्णव्यवस्था -जातीव्यवस्था आधारित मनुस्मृती याचे परखड विश्लेषण त्यांनी याप्रसंगी सादर केले. व हे आव्हान समजून घेऊनच ते परतवून लावण्याची दिशा मिळू शकते हे सांगितले. परिषदेला महाराष्टातून समितीचे प्रतिनिधी माेठ्या संख्येने उपस्थित हाेते व परिषदेत अत्यंत माैलिक विषयांची मांडणी समर्थपणे केली गेली परीक्षा देला यशस्वी करण्यासाठी स्थानिक मान्यवरांनी प्रचंड मेहनत घेतली.
अमरावती
अमरावती येथील भीम टेकडी जवळील संबाेधि सभागृहात दिनांक 21 डिसेंबर 2024 ला सायंकाळी सात वाजता ‘ भारतीय अनुसूचित जाती जमाती : सद्यस्थिती, आरक्षणाचे उपवर्गीकरण, क्रिमीलेअर व आंबेडकरी भूमिका‘ या विषयावर माजी अध्यक्ष, विद्यापीठ अनुदान आयाेग व भारतीय सामाजिक शास्त्र संशाेधन परिषद, नवी दिल्ली तसेच सामाजिक व आर्थिक समता संघाचे अध्यक्ष प्रा. डाॅ. सुखदेव थोरात सर यांचे मार्गदर्शन झाले या कार्यक्रमाचे अध्यक्ष, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे माजी कुलसचिव डाॅ. भीमराव वाघमारे, हे हाेते. या कार्यक्रमाची प्रस्तावना करताना माननीय प्रशांत वंजारे म्हणाले की आरक्षणाचे उपवर्गीकरण करणे म्हणजे आरक्षण नाकारणे हाेय. आरक्षणाचे संविधानिक तत्व नाहीसे करणे- बदनाम करणे, ही प्रक्रिया आता सुरू झाली आहे. खऱ्या अर्थाने आपण आरक्षण मागणारे लाके आहाेत. तेव्हा आता आपणास एका वेगळ्या पक्षात ढकलले जात आहे, आणि हे माेठे संकट आपल्यावर आहे. अशा वेळी समाजाला याेग्य मार्गदर्शन करण्यासाठी प्रा. डाॅ. सुखदेव थाेरात सर यांना आपण या विषयावर मार्गदर्शनासाठी आमंत्रित केले आहे अशी केली.याप्रसंगी बाेलताना डाॅ. थाेरात सर म्हणाले की आरक्षणाची संकल्पना कशी मांडली गेली, आरक्षणाने आजपर्यंत आपली किती प्रगती झाली, आरक्षणाच्या मर्यादा काय आहे, आणि त्याच्यामध्ये सुधारणांची गरज आहे का ? या सगळ्या प्रश्नांचे उत्तर मिळण्यासाठी आपल्याला यावर चर्चेची गरज आहे. यानिमित्ताने आरक्षणाची संपूर्ण कारणीमांसा डाॅ. सुखदेव थाेरात सरांनी याप्रसंगी के ली आणि यासंबंधीचा सखाेल इतिहास त्यांनी स्पष्ट केला. जेव्हा किती प्रगती झाली हा विचार मनात येताे तेव्हा आजच्या घडीला देशातील अस्पृश्य आणि उच्च जाती यांच्यामधील दरी कमी झाली नाही उलट ती वाढली. असे चित्र असले तरी आरक्षण जर नसते तर आणखी किती भयावह स्थिती या समाजाची असती, याची कल्पना आपल्याला सहजपणे येऊ शकते. याच्या समर्थनार्थ त्यांनी गरिबी, असमानता, स्वास्थ, कुपाेषण, मृत्यू आणि पिण्याचे पाणी या सगळ्यांमध्ये इतर समाजापेक्षा दलित जाती किती मागे आहेत याविषयीची सखाेल आकडेवारी महाराष्ट्र स्तरावर त्यांनी सादर केली. त्यांनी असेही मत व्यक्त केले की या वर्गाच्या धाेरणाबाबत
प्रचंड भेदभाव- सरकारी धाेरण, अंमलबजावणी आणि समाजात नेहमी दिसून येते, ते अजूनही संपलेले नाही. हजाराे वर्षाच्या आपल्या समाजाच्या नुकसानीची भरपाई मागण्यासाठी आपण आता समाेर आलाे पाहिजे. शिक्षण, स्वास्थ, राेजगार, संपत्तीची मालकी व जमीन मालकी या सगळ्या क्षेत्रात उच्चभ्रू समाजाने आपल्याला मागे ढकलले आहे. तेव्हा ते परत मिळण्यासाठी आपल्याला दीर्घकालीन संघर्षाची गरज आहे, असे वक्तव्य त्यांनी केले. अनुसूचित जाती -जमातीच्या उपवर्गीकरणाचा विचार काेणत्याही पैलूने रास्त किंवा याेग्य नाही, हेही मत त्यांनी मांडले. याचबराेबर आरक्षणाचा आधार जात असावा की आर्थिक असावा? आरक्षण फक्त एकदाच द्यावे की नाही ? आरक्षणात क्रिमीलेअर आणावे की आणू नये? आरक्षणामुळे गुणवत्ता
व कार्यक्षमता याचा विचार केला जात नाही, या संबंधाने सुधारित धाेरण आणावे की आणू नये ?
यासंबंधीच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर डाॅ. थाेरात सरांच्या भाषणात मिळाली. तिथे उपस्थित असलेल्या सगळ्या मान्यवरांचे संभ्र दूर झाले. आजही आरक्षण असून सुद्धा अनुसूचित जातीमधील विषमता कमी झाली नाही, आरक्षणाचा आधार उपजाती असू नये, काही उपजाती विकास प्रक्रियेत मागास – माघारल्या असतील किंवा आरक्षणाचे लाभ त्यांना घेता आले नसतील
तर अशावेळी त्यांची संपत्ती स्थिती शिक्षणाच्या माध्यमातून दूर करण्याची गरज आहे. त्यांचे उच्च शिक्षण जाेपर्यंत वाढणार नाही ताेपर्यंत त्यांच्यामध्ये राेजगार क्षमता निर्माण हाेणार नाही व त्याच्या अभावी त्यांची सांप्रतिक स्थिती देखील चांगली हाेणार नाही याचे भान ठेवणे आवश्यक आहे असे मत त्यांनी व्यक्त केले याचबराेबर आरक्षणामध्ये क्रिमीलेयर लावणे याेग्य नाही किंवा ज्यांना एकदा आरक्षण मिळाले किंवा एका पिढीत आरक्षण मिळाले तर दुस-या पिढीतील त्यांचे आरक्षण बंद करावे ही भूमिका सुद्धा न्याय्य नाही. संघटनाही आजच्या घडीला आरक्षणाची मागणी करणारी ही पहिली दुसरी पिढी नसून ती तिसरी पिढी आहे तरी देखील सामाजिक जातीभेद व भेदभाव नष्ट झाला नाही म्हणून जाेपर्यंत सामाजिक भेदभाव कायम आहे ताेपर्यंत आरक्षणाची गरज आहे असे आग्रही मत त्यांनी या प्रसंगी व्यक्त केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणनू समायाेजित भाष्य संत गाडगेबाबा
अमरावती विद्यापीठाचे माजी कुलसचिव डाॅ भीमराव वाघमारे यांनी व्यक्त केले कार्यक्रमासाठी संबाेधी परिसरातील मान्यवरांनी बरीच मेहनत घेतली मधल्या काळात वादळ वारा आणि पावसाचा जाेरदार मारा त्या ठिकाणी झाला आणि वीज गेली अशाही वेळी डाॅ. थाेरात सरांच्या मार्गदर्शनासाठी जमाव एक तास पर्यंत प्रतीक्षा करत राहिला कार्यक्रमाला अमरावती शहरातील विविध भागांमधून बर्याच मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली.

-डॉ गौतम कांबळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *