-डॉ. सुनिता सावरकर
ब्रिटशांच्या भारतातील आगमनामुळे भारतीय समाजात अनेक पातळ्यांवर बदलाला सुरुवात झाली. यामध्ये पारंपारिक जातीव्यवस्था व सामाजिक प्रथा आणि परंपरा यांच्यामध्ये घडून आलेलं परिवर्तन हे अमुलाग्र बदल महत्त्वाचे आहेत. या सर्व बदलांमध्ये भारतीय समाज व्यवस्थेमधील सर्वात खालच्या स्तरातील अस्पृश्य समाज हा ही बदलला. ब्रिटिशांचे कायदे आणि नियम हे सर्व माणसांकडे सारखेपणाने बघणारे असल्यामुळे पारंपारिक समाज व्यवस्थेतील न्यायव्यवस्थेला हा खूप मोठा एक धक्का हाेता. एकांगी पणे अन्याय सहन करणा-या अस्पृश्यांमध्ये काही बदल घडून आले यामध्ये सुरुवातीच्या काळात
अस्पृश्यांमधील काही जाती ज्यांना व्यवसाय हाेता असे आणि काही ज्यांना व्यवसाय नव्हता असे ब्रिटिशांच्या रेल्वे विभागामध्ये आणि मिलिटरी मध्ये माेठ्या प्रमाणात भरती झाले. ब्रिटिशांच्या येण्याने शिक्षण आले त्यामुळे काही शिक्षण खात्यामध्ये रुजू झाले या सर्वांचा परिणाम म्हणून अस्पृश्यांमध्ये शिकलेली एक नवीन पिढी तयार झाली. महात्माफुले, राजर्षी शाहू महाराज यांनी अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी सर्वतापेरी प्रयत्न केले. त्यातून मातंग, महार, चांभार, ढाेर व वाल्मिकी या सर्व जातीं ध्ये सुशिक्षितांची एक पिढी तयार झाली.
अस्पृश्यांमधील सामाजिक चळवळीचे भान ठेवून काम करणारा पहिली व्यक्ती गाेपाळबाबा वलंगकर नंतर शिवराम जानबा कांबळे आणि इतर अनेक चांभार, मातंग, ढाेर व वाल्मिकी समुदायातल्या लाेकांनी अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी स्वतंत्र व समुहीक पातळीवर प्रयत्न केले. 1920 ला डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात एका वेगळ्या पर्वाचा उदय झाला 1920 ते 1956 या कालखंडात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात स्पृश्य व अस्पृश्य इत्यादी समुदायातील अनेकानी चळवळीमध्ये काम केल्याचे दिसून येते. महाराष्ट्रातील अस्पृश्यांपैकी ज्या महत्त्वाच्या जाती आहेत त्यात महार, मातंग, चांभार, ढारे व वाल्मिकी इ. या जातींचा कमी अधिक प्रमाणात बाबासाहेबांच्या चळवळीत महत्त्वाचा सहभाग राहिलेला दिसून येताे. या लेखामध्ये आपण आंबेडकरी चळवळ आणि मातंग समाज यांच्या चर्चा करणार आहाेत. महाराष्ट्रात अस्पृश्यां ध्ये महार समाजानंतर जर संख्येने दुसरी माेठी जात कुठली असेल तर ती मातंग हाये . डाॅ. आंबेडकर पूर्व बहिष्कृत चळवळीतील मातगं समाजाचे अनेक सुधारक कार्यकर्ते हाेऊन गेले. त्यांनी स्वतंत्र तर कधी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या नेतृत्वात काम केले. 1920 नंतर सर्व अस्पृश्यांना साेबत घेऊन बाबासाहेबांनी पहिल्यांदा सामाजिक व राजकीय पातळ्यावंर संघटन उभे केले. त्यामध्ये अस्पृश्यां धील सर्व जातीतील लाेकांचा समावेश करून घेतला हाेता. आंबेडकरी चळवळीतील मातंग समाजाचा अभ्यास हाेणे गरजेचे आहे. आंबेडकरी चळवळीतील मातंग नेतृत्व, आंबेडकर कालीन मातंग परिषदा आणि सभा, महार मांग यांच्या संयुक्त परिषदा, मातंग समाजाने घेतलेल्या स्वतत्रं परिषदा आणि आंबेडकरी चळवळीने वेगवेगळे जे सत्याग्रह केले ज्या संघटना काढल्या, जे-जे मुद्दे घेऊन आंबेडकरी चळवळ संघर्ष करत राहिली या सर्व संघर्षांमध्ये मातंग समाजातील लाेकांचे याेगदान महत्वाचे राहिले आहे. चळवळीत वावरताना आपण किती पुढे गेलाे यापेक्षा आपण काेणत्या दिशेने जात आहाेत हे महत्त्वाचे असते. मातगं समाजातील एक भाग हा कायम आंबेडकरी चळवळी साेबत जाेडून राहिला. रामचद्रं नाथाेबा काळाेखे, दाैलती चिलाेबा वायदंडे, केशव शिरसाेबा सकाटे, तुकाराम गणेशाचार्य, आर जी खंडाळे, धाेंडीबा संभाजी साठे, भागवत सदाशिव पवार, के. एम. काळोखे, हेवती देवाजी बेहाडे, के. बी. माेरे, बन्सीलाल गणपत निखाडे, श्रीमती गिताबाई दामाेदर पवार, सिताराम आबाजी लांडगे, रामचंद्र जाधव, शांताबाई श्रावण सकाटे इत्यादी अनेक नाव आपल्याला मातंग समाजातील सांगता येतील. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चळवळीचे नेतृत्व व करत असताना अस्पृश्यां धील सर्व जातीतील स्त्री-पुरुष चळवळीत कसे सहभागी हाेतील याकडे विशेष लक्ष दिलेले दिसते. डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या संघटनांमध्ये मातंग समाजातील सदस्यांचाही समावेश केल्याचे दिसून येते. वेगवेगळ्या परिषदां ध्येही त्यांना सामावून घेतल्याचे दिसून येते.
महाडच्या सत्याग्रहामध्ये मातंग समाजाचा सहभाग असल्याचे दिसनू येते. 26-27 डिसेंबर 1927 रोजी झालेल्या सत्याग्रह
परिषदेसाठी मातंग समाजातूनही प्रतिसाद मिळाल्याचे दिसून येते. 4 जुलै 1927 राेजी अहमदनगर येथील मातगं समाजाने महाड येथे संपन्न हाेणा-या परिषदेत सहभागी हाेण्याचा ठराव घेतला हाेता.

2 ऑगस्ट 1927 राेजी कर्नाटकातील शिरपाळी तालुका अथणी जिल्हा बेळगाव येथे बहिष्कृत वर्गाची सभा झाली या सभेत मातंग बांधवांनी महाड सत्याग्रहात भाग घ्यावा असा ठराव पास केला हाेता. 18 ऑक्टाेबर 1927 राेजी कागवाड जिल्हा बेळगाव येथे झालेल्या सभेत मातंग समाजाच्या प्रश्नावर चर्चा करण्यात आली व महाडच्या सत्याग्रहात मातंग समाजाने मदत करावी असा ठराव पास करण्यात आला. 7 डिसेंबर 1927 राेजी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे झालेल्या परिषदेत मातंग समाजाने महाड सत्याग्रहास मदत करावी असा ठराव पास करण्यात आला. अमरावती येथील अंबाबाईच्या मंदिरात प्रवेशाच्या सत्याग्रहासाठी एकत्र येऊन मातंग लाेकांनी सह्या केल्या हाेत्या. नाशिकच्या काळाराम मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळावा म्हणून 2 मार्च 1932 राेजी दुपारी नाशिक येथे परिषद आयाेजित करण्यात आली हाेती या परिषदे ध्ये काेकण, विदर्भ आणि नाशिकसह जिल्ह्याच्या आजूबाजूंच्या भागातील सुमारे सात-आठ हजार स्त्री पुरुष एकत्र झाले हाेते यात मातंगांचाही समावेश हाेता. 20 जुलै 1924 राेजी दामाेदर हाॅल परळ मुंबई येथे बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना
करण्यात आली. या सभे ध्ये ट्रस्टी अध्यक्ष व कार्यकारी मंडळ ने ण्यात आले. यात एकूण 17 सभा सभासद हाेते त्यात केशव
शिरसाेबा सकाटे हे सदस्य मातंग होते. पंचमंडळामध्ये तुकाराम गणेशआचार्य हे काेल्हापुरातील मातंग समाजातील अत्यंत महत्त्वाचे नेते हाेते त्यांच्या समावेश डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत हितकारणी सभेमध्ये केला हाेता. स्वतत्रं मजूर पक्ष एक ऑगस्ट 1936 ला स्थापन केला गेला या पक्षार्ते 1937 ला मुंबई मधून भाग घेण्यात आला. मुंबई प्रांतात राखीव गटातून स्वतंत्र मजूर पक्षाच्या वतीने एकूण 18जागा लढविल्या त्यात मुंबई जी वार्ड आणि सबर्न या मतदारसंघातून मातंग समाजाचे कृष्णाजी महादेव काळाेखे यांना उमेदवारी देण्यात आली. शेड्युल कास्ट फेडरेशन मध्ये स्थापनेच्या वेळी नागपूर येथील मातंग समाजाचे पुढारी व डाॅ. बाबासाहबे आंबेडकरांचे निकटवर्ती एच. डी. बेहाडे यांना फेडरेशनच्या कार्यकारी मंडळात सदस्य पदी नियुक्त केले हाेते. पंढरपूर येथील मातंग समाजातील खिलारे व रणदिवे हे पंढरपूर समता सैनिक दलाचे सैनिक होते. भारतीय रिपब्लिकन पक्षां ध्ये आर. जी. खंडाळे हे नेतृत्व करत होते.1960 साली आर. जी. खंडाळे यांची नियुक्ती रिपाइर्च् या संयुक्त सचिव पदी झालेली हाेती. नाशिक येथील कार्यकर्ते के. बी. माेरे हे अनेक वर्ष चळवळीत कार्यकर्ते हाेते व काही काळ नाशिकचे शहराध्यक्ष म्हणून काम पाहिले. यवतमाळ जिल्हा सचिव म्हणून रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते रामचंद्र महाजन हे अखेरपर्यंत काम करत हाेते. महाराष्ट्रात एकनाथ आव्हाड व जी. एस. दादा काबं ळे यांनी बुद्ध धम्म मातंग
समाजात रुजवण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले.
मातंग समाजाच्या प्रबोधन सभा
भारतीय जाती व्यवस्थेने अस्पृश्यअंतर्गत जातीमध्ये वैराची भावना निर्माण केलेली आहे. जातीची अस्मिता आणि अहंभाव हा कायम जातीय अस्मितेचा विषय राहिलेले आहे.
त्यामुळे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चळवळीमध्ये सर्व अस्पृश्य जातींना साेबत घेऊन काम करण्याचे सुरू केल्यानंतर
जातीव्यवस्थेमुळे त्यांना एकत्र येण्यास अडथळे निर्माण झालेले हाेते. यावर उपाय म्हणून डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी महार मांग अश्या संयुक्त परिषदा घेतल्या तसेच मातगं समाजाच्या स्वतंत्र सभा घेतलेल्या आहेत. यातील पहिली सभा भाेकरवाडी पुणे येथे 20 जुलै 1927 राेजी घेतली हाेती त्यावेळी के.के. सकट व वायदंडे हे मातगं पुढारी प्रथमच बाबासाहेबांबराेबर एका मंचावर हाेते. बाबासाहेबांनी या परिषदेला मार्गदर्शन करताना अनेक उदाहरणे देऊन मातंग समाजातून डाॅ बाबासाहेब आंबेडकर व चळवळीवर हाेणारे अनेक आराेप सप्रमाण खाेडून काढले. दिनांक 11 व 12 जानेवारी 1936 अहिल्याश्रम पुणे येथे
अखिल महाराष्ट्रीयन अस्पृश्य तरुणांची एक परिषद आयाेजित करण्यात आली हाेती. अस्पृश्य जातीतील सर्वच तरुण उपस्थित हाेते. त्यात असपृश्य जाती अंतर्गत जातीभेद माेडून काढण्यासाठी बाबासाहेबांनी विशेष मार्गदर्शन केले. 31 डिसेंबर 1938 ला करकंब जिल्हा साेलापूर येथे मातंग समाजाच्या परिषदेत डाॅ. बाबासाहेबांनी जातिव्यवस्थेमुळे अस्पृश्य जातिअन्तर्गत असलेले भेदभाव कश्यामुळे आहेत आणि सवर्ण कशा पद्धतीने याचा फायदा घेऊन मांग, महार व चांभारां ध्ये भांडण लावत आहेत यावर सविस्तर भाषण केले. जाती व्यवस्थे ुळे अस्पृश्य जातींमध्ये असलेल्या भेदाच्या भावनेला आजही समाजात खतपाणी घातले जाते. आजही समाजात ऐकी दिसून येत नाही.
जातीच्या अस्मितेपेक्षा सामुहिक पातळीवर काम करणे अस्पृश्य म्हणून ज्या अवहेलना वाट्याला येतात त्यासाठी
प्रयत्न करणे हे किती गरजेच आहे हि समज इतराप्रमाणे मातंग समाजात रूजने गरजेचे आहे.
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सातत्याने प्रशासकीय, राजकीय पातळीवर काम करत असताना त्यांनी सामाजिक
पातळीवर कायम अस्पृश्यामधील विविध जातींना एकत्रित आणून त्यांच्यात एकाेपा निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
परंतु जातीय अस्मिता महत्वाची मानून काही मातंग पुढारी बाबासाहेबांचे विराेधक बनले त्याला जातीव्यवस्था
कारणीभूत आहे. ज्या मातंग बांधवानी जाती व्यवस्थेची बंधन झुगारून स्वतंत्र्य, समता, बंधुता हि मुल्ये महत्वाची
मानली आणि आंबेडकरी चळवळीत काम केले त्यांच्या कार्याला सातत्याने उजाळा देऊन मातंग समाजात प्रबाेधन
करून अस्पृश्य जातीमधील एकी टिकवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.