दुष्टचक्रात अडकलेला शेतकरी
महाराष्ट्रात राज्यासमाेरचे सगळ्यात माेठे आव्हान म्हणजे सतत त्रासदायक ठरलेले कृषी क्षेत्रावरील संकट.शेतक-यांच्या आत्महत्या ह्या जवळपास महाराष्ट्रात अंगवळणी पडल्यासारख्या झालेल्या आहेत.त्याबाबत बराच डाेंबउसळताे आणि काही काळानंतर आपाेआप शांत हाेताे आणि शेतकरी हा त्या दुष्टचक्रात सतत पिसला जाताे. महाराष्ट्रातील माेठा प्रदेश हा दुष्काळ प्रवण असून ह्या प्रदेशात पावसाचे प्रमाण कमी आहे. परिणामतः ‘नेमेची येताे दुष्काळ’ आणि शेतक-यांचा …