Menu

Tag «mukti vimarsh»

ब्राम्हणवादाविरोधी मागासवर्गीय (ओबीसी) समतावादी चळवळ

दलितेत्तर मागासवर्गाची ब्राम्हण्याविरोधी वैचारिक चळवळ व कृती -प्रा. सुखदेव थोरात भारतीय इतिहासाचे विश्लेषण करण्यासंबंधी दोन प्रवाह आपणास दिसतात. एक धर्मसहिष्णुता म्हणजे सर्व धर्माला समानतेने वागणूक देणे आणि प्रत्येक धर्माची विचारसरणी प्रचारित करणाऱ्या अधिकार देणे. दुसरा विचार जो प्रामुख्याने डॉ. आंबेडकरांनी मांडला तो भारतीय इतिहासात ह्या दोन विचारसरणीचा सतत चाललेला संघर्ष.हा संघर्ष धार्मिक व सामाजिक विचारसरणीचा …

संत नामदेव : समतामूलक आंदोलनाचे प्रथम निर्गुण संत कवी

-प्रा. विमल थोरात, माजी प्राध्यापक IGNOU , न्यु दिल्ली संत नामदेव : संत नामदेव १२७० इ.स. महाराष्ट्रातील नरसी (हिंगोली) येथे शिंपी जातीत जन्मले. बालपणापासून विठ्ठल भक्तीमध्ये रमलेले नामदेव आणि ज्ञानेश्वर ह्यांनी महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाची स्थापना केली. नामदेवांनी बरीच वर्षे महाराष्ट्रभर फिरून वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार केला. पण त्यांचे सामाजिक, सांस्कृतिक कार्य हे महाराष्ट्रापुरतेच सीमित राहिले …

महात्मा बसवेश्वर आणि शरणांचा वैज्ञानिक दृष्टीकोन

म. बसवेश्वर अवैदिक व स्वतंत्र धर्म आणि संस्कृती चे जनक आहेत. आपली संस्कृती ही शरण संस्कृती आहे. लिंगायत धर्मात स्री-पुरुष समानता, लिंगभेद, वर्ग वर्ण भेदभाव मान्य नाही. सर्व जाती समावेशक समाज निर्मिती करण्याचे महात्मा बसवेश्वरव शरण मंदियाळांचे स्वप्न होते. बारा बलुतेदार व समाजातील बहुजन वंचित अस्पृश्य घटकांना एकत्रित समान पातळीवर आणण्याचे महान क्रांतिकारी काम म. …

बरे झाले कुणबी केलो . . . . . उजळावया आलो बाटा खरा खोटा निवाडों : – संत तुकोबाराय

वारकरी संतमंडळातील संतांची अभिव्यक्ती आणि वैचारीक संघर्ष हा बहुजनांच्या हितासाठी, सुखासाठी होता. पहिला संघर्ष त्यांनी मक्तेदारीत कुलपबंद केलेले ज्ञान बहुजनांना वाटून टाकण्यासाठी केला होता. ज्ञान भांडाराच्या चाव्या ज्या वैदिक सनातन्याच्या जानव्याला होत्या त्यांच्याशी संतांनी तिव्र संघर्ष केला आणि ज्ञानबंदी उठवली. संस्कृतातले सर्व तथ्यांश संतांनी मराठीत आणुन, जनतेत वाटुन टाकले. या सुरुवातीच्या संत मंडळात संत नामदेव …

बळीचे राज्य : महात्मा फुले

म. जोतीराव फुले यांनी इ. स. १८८३ साली आपला ‘शेतक-याचा आसूड’ हा ग्रंथ लिहिला. या पुस्तकात त्यांनी सर्व शेतकरी एकच गणला आहे. कारण त्यांच्या मते लहानमोठ्या सर्वच शेतक-यांची अज्ञाना- मुळे नोकरशाहीच्या व भटशाहीच्या जुलमामुळे आणि साम्राज्यशाहीच्या शोषणामुळे दैना उडालेली आहे. म. फुले यांच्या मते सांप्रत शेतकरी म्हटले म्हणजे त्यात तीन भेद आहेत. कुणबी, माळी आणि …

राजश्री शाहू: शिक्षणविषयक भूमिका व कार्य

ज्या समाजात शिक्षणाचा फारसा वारसा नव्हता आणि परंपरांनी ज्यांना शिक्षणाचा हक्क नाकारला होता अशा समाज विभागांचे महाराष्ट्रातले विद्येचे माहेरघर जर कोणते असेल तर ते कोल्हापूर. आणि या माहेरघराचा पाया घालणारा दूरदृष्टीचा महापुरुष जर कोण असेल तर तो म्हणजे शाहूराजा. ब्राह्मणेतरांच्या शिक्षित झालेल्या असंख्य नेत्यांनी कोल्हापुरात शिक्षण घेतले आहे आणि आपसुक किंवा आपोआप घडलेले नाही. यामागे …

महाराजा सयाजीराव आणि शाहू छत्रपती

एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील महाराष्ट्राच्या सामाजिक-राजकीय सुधारणांत महाराजा सयाजीराव आणि राजर्षी शाहू छत्रपती या दोन लोकोत्तर राजांचे फार मोठे योगदान आहे. स्वातंत्र्यानंतर राजर्षी शाहूंच्या कार्याचे स्मरण महाराष्ट्राने कृतज्ञतापूर्वक जागविले. राजर्षी शाहू छत्रपतींसंबंधी गेल्या तीस-चाळीस वर्षांत मराठी लेखकांनी सातत्याने चरित्र, संशोधन, भाषणांचे खंड, गौरवग्रंथ, शाहू छत्रपतींचे निवडक आदेश आणि शाहू कालखंडातील कागदपत्रांचे प्रकाशन केले आहेत. यातून शाहू …

महाराज सयाजीराव आणि विठ्ठल रामजी शिंदे

पारंपारिक भारतीय समाजव्यवस्थेने सामाजिक-धार्मिक परिघाबाहेर ठेवलेल्या अस्पृश्य जातीतील लोकांना ‘माणूस’ म्हणून समाजात प्रतिष्ठा मिळावी यासाठी आधुनिक भारतातील अनेक व्यक्तींनी प्रयत्न केले. बडोद्याच्या महाराजा सयाजीरावांनी तर बडोद्यात भारतीय अस्पृश्योद्घार चळवळीचा ‘पाया घातला. सयाजीरावांनी दिलेल्या खंबीर पाठबळामुळेच विठ्ठल रामजी शिंदे व बाबासाहेब आंबेडकर आपले अस्पृश्योन्नतीचे कार्य ‘उभा’ करू शकले. परंतु सयाजीरावांकडून प्रेरणा, आर्थिक सहकार्य आणि पाठबळ घेऊन …

श्रीधरपंत टिळक

श्रीधर बळवंत टिळक (ज्यांना श्रीधरपंत टिळक म्हणूनही ओळखले जाते) हे चित्पावन ब्राह्मण बाळ गंगाधर टिळक (१८५६-१९२०) यांचे सर्वात धाकटे पुत्र होते, जे भारतातील वसाहतविरोधी लढ्यातील एक प्रमुख नेते होते. जरी ज्येष्ठ टिळकांनी भारताच्या स्वातंत्र्य चळवळीला लक्षणीय सार्वजनिक पाठिंबा निर्माण केला असला तरी, जात आणि लिंगाच्या बाबतीत त्यांचे दृष्टिकोन प्रतिगामी होते.मनोज मित्ता यांनी त्यांच्या’ कास्ट प्राइड’ …

संत गाडगे बाबा आणि डॉ.आंबेडकर यांच्या तील ऋणानुबंध

विसाव्या शतकातील सामाजिक सुधारणेच्या कार्यात/आंदोलनात ज्या महापुरुषांचा उल्लेखनिय व महत्वपूर्ण असा सहभाग होता त्यात लोकसंत, कर्मयोगी, वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा आणि युगपुरुष डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रामुख्याने समावेश करावा लागेल. दिन-दलित, पिडित, वंचित आणि दुःखीताच्या कल्याणासाठी या दोन्ही बाबांचे महत्त्वपूर्ण असे योगदान आहे.त्यासाठी त्यांनी प्रबोधन केले,लढे दिले,आंदोलने केलीत. बळकट असलेली चातुर्वर्ण्य व्यवस्था मोडीत काढणे आणि सामाजिक व …

निघू दे दिवस मंगल तो, बघाया भारता ! तुजला !…. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

२६ जानेवारी १९५० ला भारताचे संविधान लागू झाले. जगातल्या एका मोठ्या लोकशाहीचा लोककल्याणाचा मार्ग मतपेटीतून निवडून येणा-या लोकप्रतिनिधींच्याद्वारे सुरू झाला. आज या लोकशाहीने आपल्या वयाची पंचाहत्तरी कठिण परिस्थितीतून गाठली. कारण हा देश विविध जाती, पोटजाती, धर्म, पंथ, संप्रदाय, भाषा अशा विविधतेत विखुरलेला आहे. भारतीय जनजीवनाला माणूस म्हणून जगण्याचा स्वाभिमान भारतीय संविधानाने बहाल केला. संविधान निर्मितीत …

समाजसुधारक: संत गाडगे महाराज

‘शिक्षणासाठी ताटे विका पण शाळा शिका, कारण ताटाशिवाय खाता येईल. परंतु, शिक्षणाशिवाय संपूर्ण आयुष्य अर्धवट आहे, असे विचार समाजमनावर बिंबवताना आपल्या किर्तनातून स्वच्छता, अहिंसा दारूबंदी अंधश्रद्धा, निर्मुलन, अस्पृश्यता निवारण आदी विषयांबाबत समाजाचे प्रबोधन करणारे समाजसुधारक डेबूजी झिंगराजी उर्फ गाडगे महाराज यांचा जन्म विदर्भातील कोते या खेडेगावी दि. २३ फेब्रुवारी रोजी झाला. गाडगे महाराजांनी वयाच्या आठव्या …

अमेरिकेतील Anti-Caste चळवळ

मिलिंद अवसरमोलसंचालक, आंबेडकर इंटरनेशनल मिशन (AIM USA) शंभर हुन अधिक वर्षांपुर्वी, डॅा. बाबासाहेब आंबेडकरांनी कोलंबिया विद्यापिठातील आपल्या व्याख्यानामध्ये डॅा. केतकरांच्या विधानाचा उल्लेख केला होता जेव्हा हिंदु भारता बाहेर प्रयाण करतील, तेव्हा जातीयवादाची समस्या भारतापुरती सिमित न राहता, ती एक वैश्विकसमस्या बनेल! आजच्या युगात मोठ्या संख्येने भारतीय परदेशांमध्ये स्थलांतरीत झालेत आणि त्यांनी उपरोक्त भविष्यवाणीस खरे ठरविले …

युगप्रवर्तक बंडखोर नायिका: सावित्रीबाईं फुले

डॉ. विद्या चौरपगार  ( असिस्टंट प्रोफेसर, राज्यशास्त्र विभाग, डॉ. आंबेडकर कॉलेज दीक्षाभूमी, नागपूर ) सावित्रीबाई फुले पहिल्या स्त्री शिक्षिका म्हणून सर्वश्रुत आहेतच, याबद्दल दुमत नाही. परंतु एक निस्वार्थी समाज सुधारक, स्त्री मुक्ती चळवळीच्या प्रणेत्या आणि फुल्यांच्या मृत्यूनंतर सत्यशोधक समाजाचे नेतृत्व करणा-या महान नेत्या होत्या. जातीधर्मपितृसत्ताक व्यवस्थेच्या परंपरावादाला छेद देणा-या 19 व्या शतकातील बंडखोर नायिका म्हणूनही …

सामाजिक सौहार्द नष्ट करणाऱ्या शक्तीपासून देश वाचविणे कर्तव्य

येत्या निवडणुकीत जनतेचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न सन 2024 च्या विधानसभेच्या पाेर्शभूमीवर अनेक मतदार संघातील लाेकांसाेबत चर्चा केल्यानंतर असे निदर्शनास आले की, बेराेजगारीचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. शासकीय-निमशासकीय नाेकर भरती गेल्या वर्षापासून जवळजवळ बंद आहे. युवक-युवती प्रचंड नाराज असून अस्वस्थ आहेत. झिराे बजेटपेक्षा भयावह परिस्थिती आज महाराष्ट्रात आहे. बेराेजगारीचा दर गेल्या 45 वर्षातील सर्वात जास्त आहे. …