राज्य शासनाचे ब्राम्हणीकरण करण्याचा प्रयत्न
ब्राह्मणवादी धर्माच्या चाैकटीत संविधानाला बांधण्याचे प्रयत्न 2014 पासून जाेमाने सुरु आहेत. हे सरकारच्या व त्यांना मदत करणा-या संघटनेच्या विचारातून व कृतीतून अगदी स्पष्ट झाले आहे. हिंदुधर्म, सनातन धर्म, गीता, मनुस्मृती ह्यांवर आधारित घटना असावी असे पर्याय सुचविले जातात. ह्या सर्व पर्यायाचा अर्थ एकच आहे; व ताे म्हणजे ब्राम्हणवाद. ब्राम्हणवादी धर्माचे निश्चित असे धार्मिक आणि सामाजिक …