दलितांवरील अन्याय व हिंसा केव्हा थांबणार ?
-प्रा. सुखदेव थोरात सर्व राज्यांमध्ये जाती व अस्पृश्यतेविरुद्धच्या चळवळीमध्ये पुढे असलेल्या पुराेगामी महाराष्ट्रात दलितांवरील अन्याय व हिंसा थांबण्याचे काहीही चिन्ह दिसत नाही. बदलत्या राजकीय, सामाजिक व धार्मिक वातावरणामध्ये दलितांबराेबरची वागणूक प्रवाहाच्या उलट दिशेने वाहतांना दिसत आहे. 2001 ते 2015 ह्या काळात महाराष्ट्रात अत्याचारग्रस्त दलितांकडून एकूण 22253 गुन्हे दाखल करण्यात आले. त्याची वार्षिक सरासरी 1060 केसेस …