शाळेतील मूल्य शिक्षणावर महाराष्ट्र सरकारने सुचविलेल्या पाठ्यक्रमासंबधी निवेदन
नवीन शैक्षणिक धोरण 2020 नुसार महाराष्ट्र सरकारने शालेय शिक्षणाचा अभ्यासक्रम किंवा पाठ्यपुस्तक आराखडा तयार केला आहे, ज्यावर महाराष्ट्रातील अनेक शिक्षणतज्ज्ञांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अभ्यासक्रम आराखडा अभ्यासक्रमाची सामग्री देत नाही, मात्र शिक्षणासाठी अभ्यासक्रम तयार करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे देतो. इतर गोष्टींबरोबरच अभ्यासक्रम आराखडा शिक्षणाची उद्दिष्टे सुचवितो. ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी काय शिकवावे, हे सुचवतो. (What to teach?) …