-डाॅ. बाबासाहेब आंबेडकर. बहिष्कृत भारत 25 नाेव्हेंबर 1927
हिंदू समाज समर्थ करावयाचा असेल तर चातुर्वर्ण्य व असमानता याचे उच्चाटन करून हिंदू समाजाची रचना एकवर्णत्व व समता या दाेन तत्त्वांच्या पायावर केली पाहिजे. अस्पृश्यता निवारणाचा मार्ग हा हिंदू समाज समर्थ करण्याच्या मार्गापासून भिन्न नाही. म्हणून मी म्हणताे की, आपले कार्य जितके स्वहिताचे आहे तितकेच राष्ट्रहिताचे आहे, यात काही किंतु नाही. सामाजिक क्रांतीची जबाबदारी मुख्यतः …