Menu

मनोगत

“आमच्या या बहिष्कृत लोकांवर होत असलेल्या व पुढे होणाऱ्या अन्यायावर उपाययोजना सुचविण्यास तसेच त्यांची भावी उन्नती व तिचे मार्ग यांच्या खऱ्या स्वरूपाची चर्चा होण्यास वर्तमानपत्रासारखी अन्य भूमीच नाही.’’

डॉ. बाबासाहेब आंबेडकर


वाचकांचे मनोगत

‘मुक्ती विमर्श‘ पाक्षिकाचा 1 डिसेंबर ते 15 डिसेंबर, 2024 चा अंक मिळाला. यावरून भारतातील राजकीय व सामाजिक वातावरणाची पूर्ण कल्पना येते. तसेच डाॅ. आंबेडकर यांनी केलेले मार्मिक भाकीत खरे ठरण्याचे चिन्ह दिसते. संसदीय लाेकशाहीच्या भवितव्यासंदर्भात आंबेडकरांनी दिलेला इशारा हा महाराष्ट्र विधानसभेचा निकाल; एक जिवंत उदाहरण असल्याचा डाॅ. श्रीनिवास खांदेवाले यांनी काढलेला निष्कर्ष खरा ठरेल की काय याची चिंता वाटते.
अंकातील निवडणुकांच्या निकालासंदर्भातील प्रा. सचिन गरुड यांचा तसेच प्रा. श्रीरंजन आवटे यांचा लेख सुद्धा वस्तुस्थिती दर्शवताे. यासंदर्भातील कर्पुरी ठाकूर विचार मंचचे प्रदीप शेंडे तसेच प्रशिक आनंद, एल. अविनाश, अब्दुल पाशा या अभ्यासकांची मतेसुद्धा वर्तमान राजकीय स्थिती दर्शविणारी आहेत. सारांशाने,‘ ‘मुक्ती विमर्श‘ चा हा अंक भारतातील राजकीय स्थितीचे प्रतिबिंब दर्शविणारा आहे. याकरिता माननीय संपादक डाॅ. सुखदेव थाेरात व संपादक मंडळाचे हार्दिक अभिनंदन व आभार !

-दीक्षा खाेब्रागडे, ब्रिस्टल, इंग्लंड.


वाचकांचे मनोगत

आपण काढलेला मुक्ती विमर्श अंक खराेखरच अतिशय अभ्यासपूर्ण निघालेला आहे. डाॅ. थाेरात सरांचे संपादकीय तसेच आपल्या लेखासह इतर सर्व विद्वान लेखकांचे लेख अतिशय अभ्यासपूर्ण झाले आहेत. मुक्ती विमर्श या पाक्षिकाच्या माध्यमातून वाचकांना यापुढेही असेच अभ्यासपूर्ण नवनवीन लेख वाचायला मिळतील अशी आशा आहे. प्रमुख संपादक डाॅ. थाेरात सर व संपादक मंडळातील आपल्या सर्व सहका-यांचे मुक्ती विमर्श हा अभ्यासपूर्ण अंक सुरू केल्याबद्दल खूप खूप अभिनंदन.

-प्रा. डाॅ. करम सिंग राजपूत, वनी, जिल्हा यवतमाळ


वाचकांचे मनोगत

१५ ते ३० नोव्हेंबर २०२४ चा ‘मुक्ती विमर्श’ पक्षीकांचा कताच प्रसिद्ध झालेला अंक अतिशय उत्कृष्ट झाला आहे. हा अंक भारतातील महाराष्ट्र राज्याच्या होणा-या निवडणुकीवर मुख्यत: भाष्य करणारा असला तरी, भारतातील संविधान व ब्राह्मणवाद मानणा-या मानसिकतेचा संघर्ष स्पष्ट करणारा आहे. या मौलिक अंकाच्या संपादकीय लेखात प्रा. डॉ. सुखदेव थोरात यांनी आम्हा तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातच व्यस्त असणा-या नवीन पिढीसमोर अधिकारवाणीने तो उलगडला आहे, यासाठी त्यांचे हार्दिक आभार.

या शिवाय, विविध लेखकांनी लिहीलेले राज्य शासनाचे ब्राह्मणीकरण करण्याचा प्रयत्न, रोजगारविहीन आर्थिक विकासाची समस्या, महाराष्ट्रातील शिक्षणामधील विषमतेचा प्रश्न, दुष्टचक्रात अडकलेला शेतकरी हे लेखसुद्धा अभ्यासपूर्ण आहेत. या अंकातील ‘लोकभावनेच्या माध्यमाने समाजातील मान्यवरांनी मांडलेली मनोगते या अंकाचे खास वैशिष्ट्य म्हणता येईल. तसेच घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडी विशेषत: अमेरिकेतील प्राध्यापक डॉ. केविन ब्राऊन यांनी भारतातील नागपूर येथील भाषणात व्यक्त केलेले मत वास्तव मांडणारे आहे. अंक सर्वच अंगाने वाचनीय झाला आहे.

-अभिजित कांबळे, मिनिया पोलीस, अमेरिका


वाचकांचे मनोगत

विविध मंचांवर विचारप्रवर्तक व्याख्यानां व्यतिरिक्त जनतेला शिक्षित करण्यासाठी डॉ. थोरात यांनी केलेल्या खूप चांगल्या प्रयत्नाबद्दल त्यांचे आभार. मी त्यांचे आणि मुक्ती विमर्शच्या संपूर्ण चमूचे अभिनंदन करतो आणि उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देतो.

-डॉ. राजेंद्र कांबळे, पुणे


वाचकांचे मनोगत

नमो बुद्धाय, सविनय जयभीम. आपण पाठवलेले ‘मुक्तिविमर्श’चे अंक मिळालेत. अंक आणि लेख दर्जेदार आहे. चोहीकडे वैचारिक उथळपणा सुरू असताना ‘मुक्ति विमर्श’चा प्रयत्न दिलासादायक वाटतोय. या निमित्ताने आंबेडकरी चळवळीतील एक मोठी उणीव भरून निघेल अशी आशा आहे. मंगल कामना आणि धन्यवाद.

-डॉ. देवेंद्र इंगळे, जळगाव


वाचकांचे मनोगत

मुक्ती विमर्श या पाक्षिकेमध्ये प्रा. ख्रिस्तोफी जॉफरलॉट यांचा ‘सनातन धर्माचा ग्रंथ हा जातीच्या उतरंडीचे रक्षण करणारा’ या लेखामध्ये भारतीय समाजातील सद्यस्थितीचे स्पष्टीकरण करतांना धर्मकारणाचा आडोसा घेवून ब्राम्हणी विचारधारा कशी कार्यरत आहे ह्याची उदाहरणे दिलेली आहेत.

भारतीय इतिहासापासून शूद्र आणि दलितांना नामोहरम करण्यासाठी वेगवेगळ्या मोहिमा, संघटना स्थापन करण्यात आलेल्या होत्या असा प्रस्तुत लेखामध्ये उल्लेख  आहे. ‘दलित शुद्धीकरण’, ‘भारत धर्म महामंडळ’, ‘बनारस हिंदू विद्यापीठ’ या सारख्या संघटना स्थापन करुन समाजातील शूद्र आणि दलितांना गुलामीत ठेवण्याचे कार्य दिन दयालू यांनी केले. त्यांच्या मते सनातन समाजव्यवस्था म्हणजे मनुचा नियम.

भारतीय राजकीय सद्यस्थितीसुद्धा त्याचप्रमाणे कार्यरत असताना दिसते. सत्तेचा फायदा घेवून ब्राम्हणवादी विचारधारा दृढ करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे आपल्या निर्देशनास येते. एकीकडे धर्माच्या नावावर धार्मिक उन्माद निर्माण केला जातो तर दुसरीकडे गरिबी, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, दलितांचे उत्पिडन याकडे सपशेल दुर्लक्ष केला जातो. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मागास वर्गीयांचा विद्यार्थ्यांना शिक्षणाचे, उच्च शिक्षणाचे दारे बंद करण्याच्या प्रयत्न होतांना दिसतो.

मुक्ती विमर्श हे नियतकालिके समाजातील ज्वलंत समस्यांवर अभ्यास करून सामान्य जनतेपर्यंत हे प्रश्न समोर आणून जनजागृती करतात. हि अतिशय अभिमानास्पद बाब आहे. खूप धन्यवाद.

-विशाखा माणिक जंगम (एम. ए. समाजशास्त्र)
मु. महागाव, त. अर्जुनी (मोरगांव) , जि. गोंदिया


वाचकांचे मनोगत

एक दर्जेदार वर्तमान पत्राची गरज खासकरून या संभ्रम निर्माण करणाऱ्या सामाजिक व राजकीय वातावरणात जाणवत होती. ती बहुधा मुक्तीविमर्श या पाक्षिकाने पूर्ण होईल असे वाटते. प्रसिद्ध आंबेडकरी विचारवंत व अर्थतज्ञ डॉ. सुखदेव थोरात हे याचे प्रमुख संपादक आहे. त्यामुळे उत्तरोत्तर उत्तम व परखड विश्लेषणात्मक लेख वाचायला मिळतील अशी आशा व अपेक्षा आहे.

हार्दिक सदेच्छा

-रवी प्रल्हाद आटे
निवृत्त सहसचिव मंत्रालय, मुंबई


वाचकांचे मनोगत

‘मुक्तीविमर्श’ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ‘मूकनायक’ वृत्तपत्रातील पहिले संपादकीय समाजास दिशा दाखवणारे आहे. ‘मुक्तीविमर्श’ गरज या शिर्ष कातील, संपादकीय लेख मागास वर्गाची खरी स्थिती दाखवते. ‘गरिबाभिमुख भेदभाव विरहित विकास’ हा डॉ. सुखदेव थोरात यांचा लेख सध्याच्या सरकारच्या धोरणाला योग्य मार्ग दाखवणारा आहे. या अंकातील सगळेच लेख शोषित समाजाला जागृत करणारे आहेत.

‘मुक्तीविमर्श’ मध्ये महिला, युवक तसेच छोट्या लघुकथा, कविता यांचेसुद्धा प्रतिबिंब असले तर चांगले होईल. स्वयंरोजगार, समाजातील चळवळींचे सुद्धा रेखांकन असावे. मा.संपादकांनी याची दखल घ्यावी, हि विनंती.

-समिक्षा गणवीर
मु. नवेगाव पोस्ट सिर्शी, त. कुही जि. नागपूर


वाचकांचे मनोगत

‘मुक्तीविमर्श’ पाक्षिकेमध्ये डॉ. नितीन तागडे यांनी संपत्तीतील भयावह विषमता या गंभीर विषयावर लेख लिहिला होता. त्यांचा प्रस्तुत लेखामध्ये आकडेवारीतून असे निर्देशनास येते की, महाराष्ट्र राज्यातील संपत्तीचा ताबा अवघ्या १०% उच्चवर्णीय धनिकांजवळ आहेत. अर्थात संपुर्ण मालमत्तेपैकी ६६ % मालमत्ता या उच्चवर्णीयांच्या ताब्यात आहेत. आणि हि विषमता आजची नसून पिढ्यानपिढ्या चालत असल्याचे दिसून येते. मालमत्ताधारणेतील हि विषमता जातिनिहाय आहे व त्याचे जातीव्यवस्था हे अत्यंत महत्त्वाचे कारण आहे. सरकारने सामाजिक आणि आर्थिक प्रवर्गांमध्ये मालमत्ताधारणा वाढविण्यासाठी निश्चिय केला पाहिजे. कारण संपत्ती हे उत्पन्नाचे साधनही असते. त्यामूळे महाराष्ट्रातील संपत्तीतील भयावह विषमता कमी होण्यास मदत होईल.  

अशाप्रकारची सत्य आकडेवारी दर्शविणारे लेख आम्हाला नियमित या पाक्षिकेमध्ये वाचायला मिळतील अशी अपेक्षा करतो. कारण अशाप्रकारच्या लेखाव्दारे,  सत्य आकडेवारीव्दारे आम्हाला समाजातील विविध विषमतेची सखोल माहिती मिळेल जेणेकरून  

समाज प्रबोधनाचे कार्य सोयीस्कर होईल. या पाक्षिकेव्दारे मला समाजातील विभिन्न गंभीर समस्या आणि त्यांच्यावर मात करणारे लेख अभ्यासायला मिळाले त्यासाठी मी मुक्तीविमर्श पाक्षिकेचे संपादक डॉ. सुखदेव थोरात सर यांचे मनापासून धन्यवाद मानतो.  

– शुद्धोधन देशभ्रतार 
संशोधक विद्यार्थी,  
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे. 


वाचकांचे मनोगत

डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन विभाग राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र दि. २१ व २२ ऑक्टोबर २०२३ रोजी कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्या अध्यक्षेतेखाली पार पडले. विषय होता क्रांती-प्रतीक्रांतीच्या ऐतिहासिक सिद्धांताबद्दल डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांचा दृष्टीकोन. चर्चा सत्राच्या उद्घाटन प्रसंगी डॉ. उमेश बगाडे, (इतिहास विभाग प्रमुख, बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ) यांनी मार्क्सवादाने पहिले अधिष्ठान भैतिकतेला दिले. परंतु बाबासाहेब आंबेडकरांच्या मते सामाजिक परिवर्तन घडून येण्यासाठी केवळ आर्थिक सत्ता कारणीभूत ठरत नाही तर धार्मिक सत्ता ही काम करते. डॉ. देवेंद्र इंगळे, डॉ. दिलीप चव्हाण, डॉ.विनोदकुमार खोब्रागडे (लखनऊ), डॉ.संतोष सुरडकर, अजय चौधरी, बॅ.  अर्चना गरुड (सांगली), डॉ. नारायण भोसले (मुंबई), डॉ. अविनाश फुलझेले यांच्या उत्कृष्ट आयोजनाला डॉ. शिल्पा मेश्राम प्रज्ञानंद मते डॉ. गौतम कांबळे, डॉ. मोहन वानखेडे, प्रा.विद्या चौरपगार यांनी योगदान दिले.

न्यूयार्क दि.
अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स वाँलथम येथील ब्रॅडिअ विद्यापीठात


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा या विषयावर बोलतांना भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड म्हणाले, “उपेक्षित सामाजिक घटकासंदर्भात भयंकर गंभीर चुका करण्यात आल्या. पूर्वग्रह, भेदभाव आणि विषमता यांच्या प्रभावामुळे या चुका घडल्या. त्यामुळे पिढ्यानपिढ्या मोठे नुकसान सोसावे लागले आहे.

बेंगरूलू कर्नाटक राज्याच्या शैक्षणिक धोरणाची आखणीसाठी निर्माण केलेल्या. समितीचे अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात, परिषदेत म्हणाले तथ्य व सांख्यिकीचे आधारावर शैक्षणिक धोरण ठरविण्यात येईल. शालेय व उच्च शालेय शिक्षणाचे समग्र अभ्यास करून त्याची शक्तीस्थळे व दुर्बलस्थळे यांच्या विचार करण्यात येईल. कौशल्य शिक्षण कसे देता येईल यावर विशेष लक्ष देण्यात येईल.