Menu

मागील दहा वर्षात दलित, आदिवासी व महिलांवरील वाढते अत्याचार

भारताचे संविधान समूह ओळखीच्या आधारावर प्रतिबंध करते व समाजातील दुर्बल घटकांसाठीसंरक्षण देते. संविधानिक तरतुदीनुसार, त्यांना सामाजिक संरक्षण देणे व सामाजिक न्याय मिळवून देणे हेसरकारचे कर्तव्य आहे. त्यामुळे सरकारने दलित, आदिवासी व महिला यासारख्या उपेक्षित गटांवरील अत्याचारांविरुद्ध तसेचनागरी हक्कांच्या सततच्या उल्लंघनाविरुद्ध विशिष्ट कायदेशीर संरक्षण दिले आहे. तरीसुद्धा त्यांच्याविरुद्ध अनेक प्रकारच्यामानवी हक्कांचे उल्लंघन हाेतच आहे. इतर मुद्द्यांपैकी, …

एक देश एक निवडणुक : सांप्रदायिक लोकशाही थोपण्याचा अंतस्थ हेत

माजी राष्ट्रपती रामनाथ काेविंद यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीने नुकताच ‘एक देश, एक निवडणूक’ यासंदर्भात अहवाल राष्ट्रपती मा. द्राेपदी मुर्मू यांना सादर केला. या संकल्पनेच्या माध्यमातून संविधानातील समानता, सत्तेचेविकेंद्रीकरण, नागरिकांचे अधिकार यांची पायमल्ली हाेत आहे का? व न्यायालयीन संविधानिक निकषावर टिकेल का? हे प्रश्न निर्माण हाेतात. जवळपास 10 वर्षे केंन्द्रस्थानी तसेच अनेक घटक राज्यांच्या सत्तास्थानी राहिल्या …

डॉ. आंबेडकरांचा सांप्रदायिक लोकशाहीचाइशारा खरा ठरला

ब्रिटिशांनी 1945 मध्ये भारताला राजकीय स्वातंत्र्य देण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांनी स्वतंत्रभारतासाठी नवीन संविधान सभेद्वारे नवीन संविधानतयार करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार 1947 मध्ये एक संविधानसभा स्थापन करण्यात आली. संविधानाचा मसुदा तयार करण्यासाठी मसुदा समितीही स्थापन करण्यात आली हाेती.डाॅ. आंबेडकर यांना मसुदा समितीचे अध्यक्ष करण्यात आले. यावेळी अनेक राजकीय पक्षांनी त्यांच्या संविधानाचा मसुदासंविधान सभेच्या विचारार्थ सादर …

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे मसुदा घटना समितीपुढे अंतिम भाषण (२५ नोव्हेंबर १९४९)

माझ्या मते, संविधान कितीही चांगले असाे, ते राबविण्याचीजबाबदारी ज्यांच्यावर आहे, ते जर अप्रामाणिक असतीलतर ते वाईट ठरल्याशिवाय राहणार नाही. तसेच संविधानकितीही वाईट असाे, ते राबविण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, तेजर प्रामाणिक असतील तर ते चांगले ठरल्याशिवाय राहणार नाही. संविधानाचा अंमल हा संपूर्णतः संविधानाच्या स्वरुपावर अवलंबून नसताे. संविधान हे केवळ राज्याचे काही विभागजसे की कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, …

दहा वर्षात आर्थिक व राजकीय व्यवस्थेतील ऱ्हास

संपादक :- प्रा.डॉ. सुखदेव थोरात मूक्ती विमर्श ‘चा हा चाैथा अंक आहे. २०१४ ते २०२३ पर्यंतच्या गेल्या दहा वर्षात सरकारने केलेल्या कामगिरीवर यात लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. या दहा वर्षात सरकारच्या चुकीच्या धाेरणांमुळे निर्माण झालेल्या आर्थिक, सामाजिक व राजकीय आघाड्यांवरील समस्यांवर यात चर्चा करण्यात आली आहे. यातील काही समस्या यापूर्वीच्या काळातील देखील आहेत. आर्थिक …