बरे झाले कुणबी केलो . . . . . उजळावया आलो बाटा खरा खोटा निवाडों : – संत तुकोबाराय
वारकरी संतमंडळातील संतांची अभिव्यक्ती आणि वैचारीक संघर्ष हा बहुजनांच्या हितासाठी, सुखासाठी होता. पहिला संघर्ष त्यांनी मक्तेदारीत कुलपबंद केलेले ज्ञान बहुजनांना वाटून टाकण्यासाठी केला होता. ज्ञान भांडाराच्या चाव्या ज्या वैदिक सनातन्याच्या जानव्याला होत्या त्यांच्याशी संतांनी तिव्र संघर्ष केला आणि ज्ञानबंदी उठवली. संस्कृतातले सर्व तथ्यांश संतांनी मराठीत आणुन, जनतेत वाटुन टाकले. या सुरुवातीच्या संत मंडळात संत नामदेव …