नवीन शैक्षणिक धोरण बहुजनांच्या गळ्याला फास
येत्या निवडणुकीत प्रत्येक नागरिकाच्या जगण्या- मरणाचा प्रश्नाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. शिक्षण, राेजगार, आराेग्य, वाढती महागाई त्यामुळे जनसामान्याचे माेडलेले कंबरडे याची चिंता सत्ताधा-यांनी व जे सत्तेवर निवडून येतील अश्या सर्वांची नैतिक जबाबदारी आहे. हि जबाबदारी ते नाकारीत असतील त्यांचे मनसुबे फक्त भांडवलदारांचे कर्ज माफ करणे, त्यांना विशिष्टसाेयीसवलती पुरविणे व जनसामान्याचे शाेषण करून संविधानाने दिलेल्या जगण्याचा …