Menu

Category «अभिव्यक्ति-स्वातंत्र्य»

युगप्रवर्तक बंडखोर नायिका: सावित्रीबाईं फुले

डॉ. विद्या चौरपगार  ( असिस्टंट प्रोफेसर, राज्यशास्त्र विभाग, डॉ. आंबेडकर कॉलेज दीक्षाभूमी, नागपूर ) सावित्रीबाई फुले पहिल्या स्त्री शिक्षिका म्हणून सर्वश्रुत आहेतच, याबद्दल दुमत नाही. परंतु एक निस्वार्थी समाज सुधारक, स्त्री मुक्ती चळवळीच्या प्रणेत्या आणि फुल्यांच्या मृत्यूनंतर सत्यशोधक समाजाचे नेतृत्व करणा-या महान नेत्या होत्या. जातीधर्मपितृसत्ताक व्यवस्थेच्या परंपरावादाला छेद देणा-या 19 व्या शतकातील बंडखोर नायिका म्हणूनही …

देशाचे गृहमंत्री अमित शहांकडून आंबेडकरांचा अपमान

‘आजकाल आंबेडकरांचे नाव सारखे सारखे घेण्याची फॅशन झाली आहे. आंबेडकर, आंबेडकर असा जप काही लोक करत असतात. पण एवढ्या वेळा देवाचे नाव घेतले तर एखाद्याला सात जन्म स्वर्गात जागा मिळेल.’ अशा शब्दात गृहमंत्री अमित शहांनी आंबेडकरांचा अपमान केला असून या घटनेने आंबेडकरी समाजात तसेच देशाच्या राजकारणात अस्वस्थता निर्माण झाली आहे. या घटनेचे पडसाद संसदेमध्ये सुद्धा …

धर्म,आमिष व गरज पडल्यास इवीएम सुद्धा

– प्रा. सुखदेव थोरात २५ नोव्हेंबर १९४९ च्या आपल्या शेवटच्या भाषणात डॉ. आंबेडकरांनी भारतात लोकशाही यशस्वी होईल किंवा नाही ह्याविषयी दुःख व खंत व्यक्त केले. ते म्हणाले की, आपले स्वातंत्र्य हे आपणच गमवीत आहोत. त्यांनी मातृ भूमीशी गद्दारी करणा-या ‘जयचंद‘ चे उदाहरण दिले. पुढे ते म्हणाले की लोकशाहीला व स्वातंत्र्याला अशाच छुप्या अंतर्गत ‘जयचंद‘ पासून …

वाचकांचे मनोगत

-अभिजित कांबळे, मिनिया पोलीस, अमेरिका १५ ते ३० नोव्हेंबर २०२४ चा ‘मुक्ती विमर्श’ पक्षीकांचा कताच प्रसिद्ध झालेला अंक अतिशय उत्कृष्ट झाला आहे. हा अंक भारतातील महाराष्ट्र राज्याच्या होणा-या निवडणुकीवर मुख्यत: भाष्य करणारा असला तरी, भारतातील संविधान व ब्राह्मणवाद मानणा-या मानसिकतेचा संघर्ष स्पष्ट करणारा आहे. या मौलिक अंकाच्या संपादकीय लेखात प्रा. डॉ. सुखदेव थोरात यांनी आम्हा …

घटना व ब्राम्हणवाद : परस्पर विरोधी विचारधारा

मुक्तीविमर्शचा अंक महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या ताेंडावर प्रकाशित हाेत आहे. स्वाभाविकपणे हा जनतेसमाेर जे प्रश्न निर्माण झालेले त्यावर चर्चा करण्याचा हा प्रयत्न आहे. निर्माण झालेल्या प्रश्नाचा उहापाेह व विश्लेषण हा जनतेला निवडणुकीमध्ये याेग्य निर्णय घेण्यास उपयाेगी ठरेल. तथापि 2014 नंतर जी नवीन आव्हाने देशासमाेर व महाराष्ट्रा समाेर उभे झाली आहेत. नवीन आव्हानांची गंभीरता व तीव्रता लक्षात …

महाराष्ट्रातील शिक्षणामधील विषमतेचा प्रश्न

राज्य घटनेनुसार शिक्षण ही मुलभूत गरज आहे हे मान्य केले आहे. त्यामुळे सर्वांनाच शिक्षण मिळणे आवश्यक आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर महाराष्ट्र सरकारने सर्वांना शिक्षणाची संधी उपलब्ध करण्याकरिता धाेरणे वापरली. तथापि वेगवेगळे धाेरणे अंमलात आणूनही सामाजिक गटांमध्ये उच्च शिक्षणातील असमानता अजूनही कायम आहे. ही उच्च शिक्षणामधील वर्गामधील विषमता शिक्षण महाग झाल्यामुळे व उच्च शिक्षणाचे खाजगीकरण झाल्यामुळे निर्माण …

मनुस्मृतीचा आताच्या ब्राह्मणांशी काय संबंध ? विनाकारण टीका करणे थांबवा: मेधा कुलकर्णी

छत्रपती संभाजीनगरात आयोजित ब्राह्मण अधिवेशनात खा. मेधा कुलकर्णी म्हणाला, “मनुस्मृती फाडली जाते जाळली जाते. असे केल्याने काय फरक पडणार आहे? त्यातील जे चांगले आहे ते घ्या, जे वाईट आहे त्यावर सर्व मिळून टीका करू, ऊठसूठ विनाकारण ब्राह्मणांवर टीका करणे थांबवा. हे किती दिवस सहन करायचे ? हे थांबले पाहिजे. सर्व समाजांनी एकत्र यावे हिंदू म्हणजे …

डाॅ. आंबेडकरनिवडणूक युतीविषयकराजकीय तत्वज्ञान आणि धाेरण

सं | पा | द | की | य मुक्ती विमर्श’ चा हा अंक दलित व वंचीत वर्गाच्या राजकीय पक्षांच्या राजकारणाशीसंबंधित असलेल्या मुद्द्यावर चर्चा करताे. सर्वप्रथम डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे आर्थिक, राजकीय,सामाजिक तत्वज्ञान व धाेरणे ह्यांची चर्चा करताे. दुसरे म्हणजे, 1936 मध्ये स्थापन केलेल्या स्वतंत्र मजुर पक्ष; शेडूलकाष्ट फेडरेशन, 1942; आणि 1957 मध्ये स्थापन केलेला रिपब्लिकन …

आपल्या प्रगतीसाठी देशाला मिळणा-या सत्तेमध्येआपण भागीदार झालेच पाहिजेडाॅ. बाबासाहेब आंबेडकर 4 ऑक्टाेबर 1945

ऑल इंडिया शेड्युल्ड कास्टसब फेडरेशनच्या वर्किग कमिटीसमाेर डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले भाषणमी तुम्हाला वारंवार सांगत आलाे आहे की, आपल्याला राजकीय सत्ता मिळाल्याशिवाय आपला सामाजिक व धार्मिक उद्धार हाेणे अशक्य आहे. आपणास समता आणि स्वातंत्र्य मिळवावयाचे असेल, आपणास इज्जतीने जगावयाचे असेल, आपली प्रगती करूनघ्यावयाची असेल तर या देशाला मिळणा-या सत्तेमध्ये आपण भागिदार झालेच पाहिजे. राजकीय सत्ता …

डाॅ. बाबासाहेबांनी सुरु केलेल्या रविवार ता. 3 एप्रिल सन1927 ‘बहिष्कृत भारत‘ याचा पहिला अंक या अंकामध्ये बहिस्कृतांच्या प्रश्नांची चर्चा करून वर्तमान पत्राची आवश्यकता नमूद केली.

प्रस्तुतच्या लेखकानें तारीख 31।1।20 पासून ‘मूकनायक‘ या नांवाचे एक पाक्षिक वृत्तपत्त्र चालू केलें हाेतें. सदरील वृत्तपत्रासंबंधीं आपले मनाेगत व्यक्त करितानां, त्याने पहिल्या अंकांत असें म्हटलें हाेतें कीं, ‘आमच्या या बहिष्कृत लाेकांवर हाेत असलेल्या व पुढे हाेणा-या अन्यायावर उपाययाेजना सुचविण्यास तसेंच त्यांची भावी उन्नति व तिचे मार्ग याच्या ख-या स्वरुपाची चर्चा हाेण्यास वर्तमान पत्रासारखी अन्य भूमीच …

दिनांक 16/03/2024 – युवा परिषद

‘वर्तमान भारतात युवकांचे भविष्य’ या विषयावर आधारित युवा परिषदेमध्ये युवकांनी नघाबरता सत्तेविरुद्ध संघर्ष करण्यास सज्ज व्हावे असे मत प्रा. लक्ष्मण यादव यांनी व्यक्त केले.शेतक-यांचे आंदाेलन दडपून टाकल्या जात आहे. शाळांचे खाजगीकरण करून व नवीनशैक्षणिक धाेरणाद्वारे सर्वसामन्याचे शिक्षण संपवण्याचा प्रयत्न हाेताे आहे. हे थांबवायचेअसेल तर मनामध्ये काेणतीही भीती न बाळगता सरकारच्या धाेरणाविरुद्ध उघडपणे बाेलण्याचेआवाहन प्रा. लक्ष्मण …

दिनांक 11/03/2024 – राष्ट्रीय महिला परिषद

महागाई, बेराेजगारी, महिला अत्याचार व धार्मिक अंधश्रद्धा या प्रश्नांना वाचाफेडण्यासाठी दिनांक 11/ 03/2024 – राष्ट्रीय महिला परिषदे चे आयाेजन करण्यातआले. या प्रसंगी अनेक मान्यवर महिला सदस्यांनी विचार व्यक्त केले. वर्तमान सरकारनेपंचवार्षिक याेजना बंद केली आणि आता संविधानही बदलतील असा इशारा केंद्रीय नियाेजन आयाेगाच्या माजी सदस्य डाॅ. साहिदा अहमद यांनी दिला. देशात मागील काहीदिवसांपासून धर्माधर्मात प्रचंड …

26 जानेवारीला भव्य रॅलीचे आयाेजन पार पडले…

22 जानेवारीला नागपूरमध्ये भगवे वातावरण निर्माण करून दहशत निर्माण करण्याच्या प्रयत्न काही संघटनांनी केला आणि नागपूर शहरातील सगळे विवेकवादी व धर्मनिरपेक्ष लाेक एक प्रकारे चिंताग्रस्त झालेत. त्यावेळी त्यांचा आत्मविश्वास वाढवणे अत्यंत आवश्यक हाेते. म्हणून तीन दिवसाच्या कठाेर परिश्रमाने 26 जानेवारीला तिरंगा ध्वज घेऊन एक भव्य रॅली काढण्याचा विचार पुढे आला. त्यासाठी फेडरेशन ऑफ ऑर्गनायझेशनसाॅर साेशल …

विषमता वाढविणारा आर्थिक विकास : 2014 ते 2023

भारतासारख्या विकसनशील देशाला आर्थिक विकासाची आवश्यकता आहे.वाढती लाेकसंख्यासारख्या स्थितीमध्ये विकासाचे लाभ तळातल्या समाजापर्यंत समान पद्धतीनेमिळावे हा विकासाचा अर्थ लक्षात घेता ताे भारतासाठी गरजेचा झाला आहे. अमेरिकेसारख्या विकसित देशातील विकासाचे स्वरूप लक्षात घेणे आवश्यक आहे. 2008-09 मध्ये अमेरिकेत प्रगती दाखविण्यासाठी घर बांधकाम क्षेत्रात गाैण प्रकारचीकर्जे देऊन ती परत न आल्यामुळे सुमारे 200 बँका बुडल्या. त्यामुळे बँकिंग …

डॉ. आंबेडकरांचा सांप्रदायिक लोकशाहीचाइशारा खरा ठरला

ब्रिटिशांनी 1945 मध्ये भारताला राजकीय स्वातंत्र्य देण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांनी स्वतंत्रभारतासाठी नवीन संविधान सभेद्वारे नवीन संविधानतयार करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार 1947 मध्ये एक संविधानसभा स्थापन करण्यात आली. संविधानाचा मसुदा तयार करण्यासाठी मसुदा समितीही स्थापन करण्यात आली हाेती.डाॅ. आंबेडकर यांना मसुदा समितीचे अध्यक्ष करण्यात आले. यावेळी अनेक राजकीय पक्षांनी त्यांच्या संविधानाचा मसुदासंविधान सभेच्या विचारार्थ सादर …