–मिलिंद अवसरमोल, न्यू जर्सी संचालक AIM USA
आंबेडकर इंटरनॅशनल मिशन, AIM USA ची स्थापना NRI आंबेडकरी समाजाला एकत्र करण्याच्या व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मिशन जागतिक मंचावर पुढे नेण्याच्या उद्देशाने करण्यात आली. ही संस्था २५ वर्षांपासून कार्यरत आहे. ही यात्रा स्मुतिशेष राजू कांबळे सर यांच्या प्रेरणादायी आणि असाधारण नेतृत्वाखाली काही मोजक्या कुटुंबासह सुरू झाली, जी आज २०० पेक्षा अधिक कुटुंबात विस्तारली आहे. AIM द्वारे या कुटुंबांना परदेशात सामाजिक व नैतिक पाठबळ मिळते. “Payback to Society” अर्थात ‘समाजाचे ऋण फेडा‘ या उदात्त हेतूने प्रेरित, AIM विविध आघाड्यांवर सक्रीय आहे.
AIM द्वारे वर्षानुवर्षे राबविण्यात आलेले काही महत्त्वाचे उपक्रम:
१. अमेरिकेत आंबेडकरी समाजाचे एकत्रीकरण आणि संघटन तयार करणे.
२. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची शिकवण आणि तत्त्वज्ञानाचा प्रसार जागतिक स्तरावर, विशेषतः विद्यापीठांमध्ये आणि मानवाधिकार संस्थांमध्ये करणे.
३. दलित समस्यांवर चर्चा आणि उपाय शोधण्यासाठी आंतरराष्ट्रीय परिषदांचे आयोजन.
४. प्रख्यात विचारवंत प्रा. सुखदेव थोरात यांच्या नेतृत्वाखाली “Unfinished Legacy of Dr. B.R. Ambedkar ” या आंतरराष्ट्रीय व्याख्यानमालेचे सह-आयोजन.
५. भारतातील दलितांवरील अत्याचार आणि अमानवीय वागणुकीला आंतरराष्ट्रीय पातळीवर वाचा फोडणे, ज्यासाठी अनेकदा रस्त्यावरही आंदोलने केली जातात.
६. अमेरिकेत भारतीय बौद्ध संस्कृती रुजविणे व प्रसार करणे.
७. आंबेडकरवादी बौद्धांचे सोहळे व महत्वपूर्ण दिन विशेष उत्साहाने साजरे करणे.
८. अमेरिकेत आंबेडकरी समाजातील विद्यार्थ्यांना आणि इतर गरजूंना योग्य मदत करणे.
९. जागतिक दलित समस्यांवर उपाय शोधण्यासाठी संयुक्त राष्ट्राकडे (UN)) दाद मागणे.
१०. न्यूयॉर्कमध्ये पहिला ‘दलित फिल्म फेस्टिवल’ आयोजित करुन, नागराज मंजुळे आणि पा. रंजीत यांसारख्या प्रतिभावंत दलित कलाकारांचा सन्मान करून प्रोत्साहन दिले गेले.
११. आंबेडकरी समाजाच्या पुढील पीढीला घडविणे, जेणेकरून ते या आंबेडकरी चळवळीला पिढ्यानपिढ्या पुढे घेऊन जाऊ शकतील
१२. भारतामधील शोषित समुदायांना आर्थिक मदत आणि मार्गदर्शन प्रदान करुन त्यांना प्रगती पथावर आणणे
१३. कोविडच्या काळात भारतातील दलित व पिडीत समुदायांना आर्थिक सहाय्य व साधनसामुग्री प्रदान करणे.
AIM USA च्या या उपक्रमांद्वारे आम्ही डॉ. आंबेडकरांच्या ध्येयाच्या पूर्ततेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत.