Menu

महाराष्ट्रातील शालेय शिक्षणात कोणता समाज मागे आहे?

भारतात २००९ चा शिक्षण हक्क कायदा शालेय शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचा समान आणि सार्वत्रिक प्रवेश सुनिश्चित करतो. हे उद्धिष्ट पूर्ण करण्याकरिता सामाजिक-आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश, दुपारचे जेवण आणि शिष्यवृत्ती प्रदान करून शालेय शिक्षणाचा दर वाढवण्याच्या प्रयत्न करतो. तथापि हे धोरणे असूनही विविध सामाजिक गटांमध्ये शिक्षणाचा दर व गळती दर ह्यामध्ये अंतर दिसून येते. ह्या लेखामध्ये आपण २०१७-१८ ह्या वर्षाकरिता शालेय शिक्षण समूहामधील विषमता याचे विश्लेषण करतो आहे. प्रथम आपण उच्च शिक्षणाचा दर व नंतर गळतीचे प्रमाण ह्यावर चर्चा करू. ६  ते १७  वयोगटातील मुलांमधील शालेय शिक्षणाचा प्रवेश सकल नोंदणी दर आणि गळती दर याद्वारे मोजला जाऊ शकतो. २०१७-१८ या कालावधीत नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑर्गनायझेशनने शिक्षणावरील नवीनतम सर्वेक्षण केले आहे. या डेटाचा वापर महाराष्ट्र राज्यातील उच्च शिक्षणाच्या असमान प्रवेशाचे विश्लेषण करण्यासाठी केला जाऊ शकतो.

शालेय शिक्षण दरातील सामाजिक गटांमधील असमानता :  महाराष्ट्राचे शालेय नोंदणी दरामध्ये आपल्याला सामाजिक गटामध्ये असमानता दिसते. महाराष्ट्राचा स्तरावर शालेय शैक्षणिक दर खालच्या प्राथमिक स्तरावर (इयत्ता १ ते ५) सर्वाधिक आहे (८६.०६%) परंतु उच्च प्राथमिक स्तरावर (इयत्ता ६ ते ८) (६९.५%) मध्ये घट झाली आहे; एकूण प्राथमिक स्तर (इयत्ता १ ते ८) शालेय शैक्षणिक दर ८७.३ टक्के आहे. दुय्यम पातळीवर (इयत्ता ९ ते १०) ७४.३ टक्के इतका आहे. भारतात प्राथमिक स्तरावरील शिक्षण मोफत आणि सक्तीचे आहे. तथापि, या स्तरावर देखील ST आणि SC ने हिंदू उच्च जाती आणि हिंदू OBC’S पेक्षा कमी शालेय शैक्षणिक दर नोंदवले आहे. कनिष्ठ प्राथमिक स्तरावर, अनुसूचित जाती (८६.५%) हिंदू उच्च जाती (८६.८%) पेक्षा जास्त मागे नाहीत, परंतु उच्च प्राथमिक स्तरावर SC चा ६५.१७ टक्के आणि हिंदू उच्च जाती ७१.०३ टक्के इतका शालेय शैक्षणिक दर नोंदवला गेली. एकूणच प्राथमिक स्तरावरील शालेय शैक्षणिक दराने हे देखील उघड केले की SC (८६.५ %) मध्ये हिंदू उच्च जाती (८८ %) शालेय शैक्षणिक दरापेक्षा कमी आहे.

माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावर SC/ST च्या शालेय शैक्षणिक दरामध्ये अधिक घट झाली आहे.

मुस्लिमांचा प्राथमिक स्तरावर शालेय शैक्षणिक दर प्रभावी आहे, परंतु माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावर त्यांचा शालेय शैक्षणिक दर मोठ्या प्रमाणात कमी आहे. दुय्यम स्तरावर, मुस्लिमांमध्ये शालेय शैक्षणिक दर (५७.१ %) सर्वात कमी आहे, त्यानंतर कमी दरामध्ये अनुसूचित  जाती SC (७४.८ %), व अनुसूचित जमाती ST (५७.५ %) ह्यांच्या क्रमांक लागतो. उच्च माध्यमिक स्तरावर मुस्लिम आणि अनुसूचित जमाती च्या शालेय शैक्षणिक दरामध्ये कमी आहे.

ह्या विश्लेषनावरून हे स्पष्ट होते कि मुस्लिम (५३.९ %), ST (५७.५%) आणि SC (७४.४%) यांच्या उच्च माध्यमिक शिक्षणाचा दर हिंदू उच्च जाती (८३.६%) पेक्षा कमी आहे. त्यामुळे, उच्च स्तरावर शिक्षणाच्या प्रवेशामध्ये असमानता वाढते, परंतु ST/SC चा खालच्या स्तरावर देखील शैक्षणिक दर कमी आहे. (तक्ता १).

तक्ता : सामाजिक गटांमधील शिक्षणाच्या विविध स्तरावर एकूण नोंदणी प्रमाण, २०१७-१८

 खालचा प्राथमिक (इयत्ता पहिली ते पाचवी)उच्च प्राथमिक/ मधला (इयत्ता सहावी-आठवी)प्राथमिक (वर्ग I-VIII)दुय्यम (इयत्ता नववी-दहावी)उच्च माध्यमिक (इयत्ता अकरावी-बारावी)
एस.टी७९.२२५५.७०७८.७७५.५५७.५
अनुसूचित जाती८६.५१६५.१७८६.५७४.८७४.४
हिंदू ओबीसी८८.३४७२.७३८९.०१००.०७७.७
हिंदू उच्च जात८६.८१७१.०३८८.०७७.२८३.६
मुसलमान८३.४४७४.७२८९.६५७.१५३.९
या व्यतिरिक्त९६.५५५१.८४८६.८८६.०१६५.७
एकूण८६.०६६९.५०८७.३२८२.३०७४.३०

स्रोत: भारत – घरगुती सामाजिक उपभोग: शिक्षण, NSS ७५  व्या फेरीचे वेळापत्रक- २५.२ : जुलै २०१७ -जून २०१८

शालेय शिक्षण दरातील उत्पन्न गटांमधील असमानता :

शालेय शिक्षण दरातील सामाजिक गटातील विषमतेशिवाय उत्पन्नाचा गटाच्या आधारावरसुद्धा विषमता पाहायला मिळते. २०१७-१८ तक्ता क्रमांक २ मध्ये व्यवसायाच्या आधारावर विषमता स्पष्ट दिसते. उच्च माध्यमिक स्तरावर स्वयंरोजगार करणाऱ्या कुटुंबांच्या उच्च माध्यमिक शिक्षणाचा दर ७१.४ % तर नियमित नोकऱ्या करणाऱ्या कुटुंबांच्या शिक्षणाचा दर ६९ % आहे. त्या तुलनेने प्रासंगिक कामगारांचा शैक्षणिक दर ६४.४ % आहे. अशीच विषमता प्राथमिक स्तरावर सुद्धा पाहायला मिळते. प्राथमिक स्तरावर स्वयंरोजगार करणाऱ्या कुटुंबांच्या प्राथमिक  शिक्षणाचा दर ८८.६  % तर नियमित नोकऱ्या करणाऱ्या कुटुंबांच्या प्राथमिक शिक्षणाचा दर ८७.५  % आहे. त्या तुलनेने प्रासंगिक कामगारांचा प्राथमिक शैक्षणिक दर ८३.६ % आहे.

अशाप्रकारे आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या प्रासंगिक कामगारांचा शालेय शिक्षणामधील दर इतरांचा तुलनेमध्ये कमी आहे.

तक्ता २   : व्यवसाय गटातील एकूण नोंदणी प्रमाण, २०१७-१८

 निम्न प्राथमिकउच्च प्राथमिकप्राथमिक
स्वयंरोजगार१०१.१७१.४८८.६
नियमित पगारदार१०२.५६८.९८७.५
प्रासंगिक कामगार१००.०६४.४८३.६
इतर९६.४९७.७९७.०

गळतीमधील असमानता

शालेय शिक्षणामधील शिक्षणाचा दरामधील सामाजिक व आर्थिक गटांमधील विषमता आपण पाहिली आहे. हि विषमता प्रामुख्याने माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावरील आहे. ह्या विषमतेचे कारण आपल्याला प्रामुख्याने शालेय गळतीमध्ये (drop out) असलेल्या असमानतेमध्ये आहे. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावर गळतीचे प्रमाण हे जास्त आहे.

६ ते १७ वर्षांच्या विद्यार्थ्यातील शैक्षणिक गळती दर ST मध्ये सर्वाधिक (७.८१ %), त्यानंतर मुस्लिम (४.८५%), SC (२.८०%), आणि हिंदू OBC (२.११%) असल्याचे दिसून येते. हिंदू उच्च जातीमध्ये गळतीचे प्रमाण सर्वात कमी आहे (०.८२ ).

तक्ता ३   : महाराष्ट्रातील सामाजिक गटनिहाय गळतीचे प्रमाण, 2017-18

सामाजिक गटनिम्न प्राथमिक गळती (चौथा वर्ग)उच्च प्राथमिक गळती (इयत्ता सहावी-आठवी)प्राथमिक (वर्ग I-VIII)दुय्यम (इयत्ता नववी-दहावी)उच्च दुय्यम (इयत्ता अकरावी-बारावी)एकूण बाहेर पडणे शालेय स्तर (६ ते १७ वर्षे लोकसंख्या)
एस.टी२.३६७.९१४.९३१५.६८२६.३२७.८१
अनुसूचित जाती०.०३१.५३०.७४.६११६.७५२.८०
हिंदू ओबीसी०.१०.६०.७१३.८६९.७१२.११
हिंदू उच्च जात०.२२०.०७०.७७४.०८०.८२
मुसलमान०.१७३.०६१.५३१३.४४१४.१४४.८५

स्रोत: भारत – घरगुती सामाजिक उपभोग: शिक्षण, NSS ७५ व्या फेरीचे वेळापत्रक- २५.२ : जुलै २०१७ -जून २०१८

सामाजिक गटानुसार गळतीचे प्रमाण असे दर्शविते की सर्व स्तरांवर एसटीने सर्वाधिक गळती दर नोंदविला आहे, त्यानंतर मुस्लिम, अनुसूचित जाती आणि हिंदू ओबीसींचा क्रमांक लागतो. कनिष्ठ प्राथमिक स्तरावर, एसटी विद्यार्थ्यांचे गळतीचे प्रमाण २.३६ % आणि अनुसूचित जातीचे ०.०३% होते; मुस्लिम ०.१७ % आणि हिंदू ओबीसी ०.१%.

उच्च प्राथमिक स्तरावर, एसटी गळती दर ७.९१% पर्यंत वाढला, त्यानंतर मुस्लिम ३.०६% , आणि अनुसूचित जाती १.५३%, आणि हिंदू ओबीसी ०.६%.

प्राथमिक स्तरावर (वर्ग I-VIII), अनुसूचित जातींमध्ये सर्वाधिक गळतीची नोंद (४.९३%) झाली , त्यानंतर मुस्लिम (१.५३%) यांच्या क्रमाक लागतो. अनुसूचित जाती आणि हिंदू ओबीसींचे गळतीचे प्रमाण जवळजवळ समान आहे (०.७%) तर हिंदू उच्च जातीमध्ये गळतीचे प्रमाण सर्वात कमी आहे. (०.०७%).

माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावर विशेषतः ST/SC आणि मुस्लिमांचे गळतीचे प्रमाण जास्त आहे. माध्यमिक (१५.६८%) स्तरावर ST गळतीचे प्रमाण सर्वाधिक आहे, त्यानंतर अनुक्रमे मुस्लिम (१३.४४%), SC (४.६१%), हिंदू OBC (३.८६%) यांच्या क्रम आहे.

उच्च माध्यमिक स्तरावर, एसटी ची गळती २६.३२ टक्के आहे, त्यानंतर अनुसूचित जाती (१६.७५%), मुस्लिम (१४.१४%), आणि हिंदू ओबीसी (९.७१%) आहेत. या स्तरावर, अनुसूचित जातीने दुसऱ्या क्रमांकावर गळती दर जास्त नोंदवली आहे. म्हणून, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावर SC/ST आणि मुस्लिम विद्यार्थ्यांची गळती जास्त आहे. (तक्ता १).

विविध उत्पन्न गटातील गळतीतील विषमता

महाराष्ट्रात उच्च शिक्षण मिळवण्याच्या बाबतीत उत्पन्न गटांमध्ये असमानता आहे. एकूण लोकसंख्येला पाच समान उत्पन्न श्रेणींमध्ये विभागून उत्पन्नामधील विषमता मोजली जाऊ शकते. शाळेत जाणाऱ्या सर्व स्तरावर ( ६-१७ वर्ष) सर्वात कमी उत्पन्न गटात (०-२०) गळतीचे दर (४.६५%) सर्वाधिक आहे, त्या तुलनेमध्ये उच्च गटांमध्ये गळतीचे प्रमाण सर्वात कमी आहे. (०.३१%)  

तक्ता : उत्पन्न गटातील ६.१७ वर्षांच्या लोकसंख्येचा गळती दर, २०१७-१८

उत्पन्न गट (हजार रु.)६-१४  वर्षे (प्राथमिक स्तर)१५-१६  वर्षे (माध्यमिक)१६-१७  वर्षे (उच्च माध्यमिक)६-१७  वर्षे (शाळेत जाणाऱ्या सर्व स्तरावर )
८०-१०००.०१.४६०.१२०.३१
६०-८००.४४५.३९८.५०१.९५
४०-६०१.५९४.५९६.८०२.७८
२०-४०१.१२१०.५५८.४३३.४५
०-२०१.६७११.४९१५.१०४.६५

स्रोत: भारत – घरगुती सामाजिक उपभोग: शिक्षण, NSS ७५  व्या फेरीचे वेळापत्रक- २५.२  : जुलै २०१७ -जून २०१८

उत्पन्नामधील गळतीची विषमता हि व्यवसायानुसार सुद्धा बघितली जाऊ शकते. शाळेत जाणाऱ्या सर्व स्तरावर ( ६-१७ वर्ष) प्रासंगिक कामगार कुटुंबांमध्ये (५.०९%) गळतीचे प्रमाण सर्वाधिक आहे, त्यानंतर नियमित पगारदार (२.३७%) आणि स्वयंरोजगार (२.०३%) यांच्या क्रम लागतो. प्राथमिक स्तरावर (वर्ग I-VIII) प्रासंगिक कामगार कुटुंबांमध्ये स्वयंरोजगार आणि नियमित पगारदार कुटुंबांपेक्षा सर्वाधिक गळती (२%) आहे. ही असमानता माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावर वाढते, जेथे प्रासंगिक कामगार कुटुंबातील विद्यार्थ्यांचा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावर १३.७९ टक्के आणि १२.१५ टक्के गळती दर नोंदवले (तक्ता ५).

तक्ता : व्यवसाय गटांमधील गळती दर

 ६-१४  वर्षे (प्राथमिक स्तर)१५-१६  वर्षे (माध्यमिक)१६-१७  वर्षे (उच्च माध्यमिक)६-१७ वर्षे (शाळेत जाणाऱ्या सर्व मुलांवर)
स्वयंरोजगार०.४७५.३१६.६३२.०३
नियमित पगारदार१.५४३.५२७.६२२.३७
प्रासंगिक कामगार१३.७९१२.१५५.०९
इतर०.०५०.०२

स्रोत: भारत – घरगुती सामाजिक उपभोग: शिक्षण, NSS ७५  व्या फेरीचे वेळापत्रक- २५.२ : जुलै २०१७ -जून २०१८

निष्कर्ष

ह्या विश्लेषनावरून हे दिसते कि महाराष्ट्रामध्ये शालेय शिक्षणामधील दरामध्ये सामाजिक गटामध्ये आणि उत्पन्न गटामध्ये विषमता आहे. सामाजिक गटामध्ये हे स्पष्ट होते कि मुस्लिम,अनुसूचित जाती अनुसूचित जमाती यांच्या उच्च माध्यमिक शिक्षणाचा दर हिंदू उच्च जाती पेक्षा कमी आहे. त्यामुळे, उच्च स्तरावर शिक्षणाच्या प्रवेशामध्ये असमानता वाढते, परंतु अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यांचा खालच्या स्तरावर देखील त्यांचा शैक्षणिक दर कमी आहे. तसाच प्रकारची शैक्षणिक दरामधील विषमता उत्पन्नाच्या गटामध्ये सुद्धा दिसते. उत्पन्न कमी असलेल्या वर्गाचा शालेय शिक्षणाचा दर हा जास्त उत्पन्न असलेल्या गटापेक्षा कमी आहे. हि सामाजिक व उत्पन्न गटामधील विषमता प्रामुख्याने उच्च माध्यमिक (Higher Secondary) स्तरावर जास्त आहे. उच्च माध्यमिक स्तरावर असमानता असण्याचे प्रमुख कारण म्हणजे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती मुस्लीम व कमी उत्पन्न असलेल्या गटामधील गळतीचे जास्त प्रमाण आहे. ह्या विश्लेषणावरून स्पष्ट होते कि सामाजिक व आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या  वर्गाकरिता शासकीय धोरणे असूनही इतरांचा तुलनेमध्ये हे गट अजूनही मागे आहे. त्याकरिता सध्याचा धोरणामध्ये अमुलाग्र बदल करणे आवश्यक आहे.

डॉ. माला मुखर्जी
प्राध्यापक, भारतीय दलित संशोधन संस्था , दिल्ली