Menu

“विदर्भात सर्वात मागास कोण?” गरिब व कुपोषित कोण?

प्रा. सुखदेव थोरात

या ‘मुक्ती विमर्श’च्या विशेषांकात महाराष्ट्रातील प्रादेशिक असमतोलांचा विचार करण्यात आला आहे. यात विदर्भ हा इतर काही भागांच्या तुलनेत मागे असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच स्वतंत्र विदर्भाची मागणी आणि त्याच्या अनुषंगाने दिलेल्या व तोडलेल्या आश्वासनांचा आढावा घेतला आहे. डॉ. खांदेवाले यांचा लेख, जे स्वतंत्र विदर्भाच्या मागणीचे पुरस्कर्ते आहेत, त्यांनी याबाबत दिलेली आश्वासने व ती कशी पाळली गेली नाहीत याचे विवेचन केले आहे. त्याच प्रमाणे डॉ. खांदेवाले, अॅड. वामनराव चटप आणि इतर लेखकांचे लेख विदर्भातील मागासलेपण विविध पातळ्यांवर अधोरेखित करतात आणि पुन्हा एकदा स्वतंत्र विदर्भाची मागणी बलवत्तर करतात.

तथ्य असे आहे की, संपूर्ण राज्याच्या व काही विभागाचा तुलनेत विदर्भ हा भाग मागासलेला आहे. पण विदर्भातील कोणते सामाजिक गट सर्वात जास्त मागे आहेत ? जागेच्या मर्यादेमुळे, इथे विशेषतः अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) या दोन गटांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. कारण ते गट सर्वात मागासलेले आहेत.

अनुसूचित जाती-जमातींच्या विकासातील प्रादेशिक विषमता

अनुसूचित जमाती (ST) – या प्रामुख्याने खान्देशमध्ये, त्यानंतर विदर्भात, किनारपट्टी कोंकणात व कमी प्रमाणात मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रात आढळतात. अनुसूचित जाती (SC) – (बौद्ध धर्म स्वीकारलेल्या गटाशिवाय) या पश्चिम महाराष्ट्र व विदर्भात तुलनेने अधिक प्रमाणात आहेत (प्रत्येकी सुमारे १/३), त्यानंतर मराठवाडा आणि सर्वात कमी कोंकण व खान्देशमध्ये विदर्भ हा भाग तुलनेने कमी नागरीकृत आहे, आणि विशेषतः पूर्व विदर्भ हा पश्चिम विदर्भाच्या तुलनेत अधिक ग्रामीण आहे.

आर्थिक व सामाजिक विकासाचे दोन मुख्य निर्देशांक म्हणजे प्रति व्यक्ती उत्पन्न आणि गरीबी.

प्रती व्यक्ती उत्पन्नाचा बाबतीत खालील निष्कर्ष निघतात.

उत्पन्न:

  • SC वर्गाचे प्रति व्यक्ती उत्पन्न तुलनेने कोंकणात अधिक आहे (मुंबईमुळे), मात्र ग्रामीण कोंकणात गरीबी मोठ्या प्रमाणात आहे.
  • SC वर्गाचे प्रती व्यक्ती उत्पन्न पश्चिम महाराष्ट्र, खान्देश आणि विदर्भ उत्पन्न साधारणतः सारखे आहे.
  • मराठवाड्यात SC वर्गाचे उत्पन्न सर्वात कमी आहे, तर विदर्भ दुसऱ्या क्रमांकावर आहे.
  • ST वर्गासाठी खान्देशमध्ये उत्पन्न सर्वात कमी, त्यानंतर पूर्व विदर्भ, आणि मग पश्चिम महाराष्ट्र येतो.
  • मराठवाडा व पश्चिम विदर्भात ST चे उत्पन्न तुलनेने अधिक आहे, परंतु तिथे त्यांची लोकसंख्या कमी आहे.

गरीबी :

गरिबीचा बाबतीत खालील वैशिष्टे दिसतात.

१. SC वर्गात गरीबी सर्वाधिक पश्चिम विदर्भात, त्यानंतर पूर्व विदर्भ व मराठवाडा.

२. कोंकण आणि पश्चिम महाराष्ट्रात गरीबी तुलनेने कमी आहे.

३. ST वर्गात गरीबी सर्वाधिक कोंकण, खान्देश, आणि त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र.

४. तुलनेत पूर्व विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात कमी गरीबी आहे.

थोडक्यात – SC वर्गात पश्चिम विदर्भात सर्वाधिक गरीबी, तर ST वर्गात पूर्व विदर्भात गरीबी अधिक आहे.

विदर्भ अंतर्गत SC / ST मधील विकासातील विषमता गरिबी

पूर्व आणि पश्चिम विदर्भातल्या गरिबीची तुलना केली असता, खालील वैशिष्टे बघायला मिळतात.

१. दोन्ही भागात गरीबी राज्याच्या सरासरीपेक्षा जास्त आहे.

२. ग्रामीण भागात – पूर्व विदर्भात गरीबी अधिक आहे. नागरी भागात – पश्चिम विदर्भात गरीबी अधिक आहे.

३. दोन्ही भागात SC / ST यांची गरीबी OBC च्या तुलनेत जास्त आहे.

४. पूर्व विदर्भात ग्रामीण भागात ST वर्गात गरीबी जास्त आहेत.

तर शहरी भागात SC वर्गात गरीबी अधिक.

५. मुस्लिमांची गरीबीही पश्चिम विदर्भात जास्त आहे, जिथे त्यांची लोकसंख्या ११% आहे.

कुपोषण आणि आरोग्यः

उत्पन्न कमी असल्यामुळे व गरिबी जास्त असल्यामुळे आवश्यक अन्न खायला मिळत नाही. त्यामुळे कुपोषण वाढते.

५ वर्षांखालील बालकांमध्ये वजन कमी असणे हा कुपोषणाचा प्रमुख सूचक आहे. यामध्ये पुढील गोष्टी आढळतात:

१. पश्चिम विदर्भात वजन कमी, सुकलेली व ठेंगणी वाढ नसलेली मुले जास्त आहेत.

२. पश्चिम विदर्भात ST/SC/OBC या गटात कुपोषण अधिक आहे. उच्च जात व मुस्लिमांमध्ये हे प्रमाण कमी आहे.

३. पूर्व विदर्भातही ST/SC मध्ये कुपोषणाचे प्रमाण OBC आणि उच्च जातींच्या तुलनेत अधिक आहे.

४. सर्वात चिंताजनक बाब म्हणजे दोन्ही भागात ST व SC मध्ये गंभीर कुपोषण जास्त आहे.

SC/ST मधील गरीबी व कुपोषणाचे कारणेः

लोक गरीब राहतात कारण त्यांच्याकडे उत्पन्न निर्माण करणारी साधने (जसे की शेती, व्यवसाय, शिक्षण, रोजगार) नसतात. याशिवाय त्यांना पिण्याचे पाणी, घरे, वीज आदी सुविधांचा अभाव असतो.

१. ST/SC यांचे प्रति व्यक्ती उत्पन्न OBC व उच्च जात आणि मुस्लिमांपेक्षा कमी आहे.

२. शेती, व्यवसाय, नियमित नोकरी यांचा अभाव व अल्प शिक्षण हे मुख्य कारणे आहेत.

३. SC / ST चे जमीनधारक शेतकरी असण्याचे प्रमाण इतर गटांच्या तुलनेत खूपच कमी आहे.

४. व्यवसायातील सहभागही त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात नाही.

५. त्यामुळे ते मुख्यतः मजुरीवर अवलंबून असतात. तसेच SC/ST ना शिक्षण, रोजगार, सरकारी योजनांमध्ये (उदा. NREGA, मध्यान्ह भोजन योजना, आरोग्य सेवा) जास्त भेदभाव सहन करावा लागतो. SC/ST च्या शेतजमिनीवरील मालकी, पाणी, बियाणे, खत, आधुनिक साधने, व्यवसायामधील सहभाग यावर लक्ष देणे गरजेचे आहे. त्यांना रोजगार, शिक्षण आणि सरकारी सेवा भेदभावाशिवाय मिळायला हव्यात.

Comments 1

  • विदर्भा तिल येवढी सखोल माहिती व त्यात Sc St ची येवढी भ
    यानक परिस्थिती कसा बनेल भारत Maha satta?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *