Menu

वीज, कोळसा, जंगल, लोहखनिज

कालावधी २१-२२ मध्ये महाराष्ट्र राज्यात १३,१६,८२०

लाख युनिट विज तयार झाली. त्यापैकी ५६.२% खाजगी उद्योगांनी व ४१.४% सार्वजनिक उपक्रमाने निर्मित केली यातील ६० ते ६६% विज विदर्भातील ४७ विज प्रकल्यांनी निर्माण तयार केली. म्हणजे जवळपास ७,९०,११२ लाख युनिट ५.८८ ते १७.८९१ हा सरासरी दर आहे जर ६ रु. चा दर घेतला तरी या विजेची एकूण किमंत ४७४०६७२,००,००० अंदाजे ४७ हजार करोड रु यापैकी केवळ १२ ते १४% वापर विदर्भात होतो याचे महत्वाचे कारण

१) उद्योगधंदयाची वाणवा

२) अविकसीत क्षेत्र

३) घरगुती विजेचा कमी वापर.

तसेच औष्णिक विज प्रकल्पामुळे तयार होणाऱ्या राखेमुळे आसपासच्या भागातील जनतेला

श्वसन व इतर अनेक व्यक्तींना बळी पडावे लागते. शेतजमीन खराब होते व पिकांवर वाईट परिणाम होतो. CEIC ने दिलेल्या डेटा नुसार

वर्ष कोळसा उत्पादन (मिलियन टन्स)

२०१९-२० ५४.७७६

२०२०-२१ ४७.४३५

२०२१-२२ ५६.५२८

२०२२-२३ ६३.६२०

२०२३-२४ ६९.२८२

Total २९१.६९१ मि.ट

महाराष्ट्रातील चंद्रपूर, भंडारा, नागपूर वर्धा, यवतमाळ गडचिरोली येथील कोळसा उत्पादन सरासरी किमंत रु. ३८००/- नुसार रु. ११०८४२५८००००० /- एवढी किमंत होते.

जंगल

महाराष्ट्रातील एकूण ५०७७७.५६ चौ. किमी जंगलापैकी ५२% जंगल विदर्भात आहे. एकूण १९ Tiger

sanctuary आहेत. त्यापैकी ताडोबा-अंधारी, मेळघाट, नागझिरा, पेंच, बोर, नवेगाव प्रसिद्ध आहेत.

लोहखनिज

गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लोह खनिजाचे साठे आहेत. लॉयड मेटल्सच्या जाहिरातीनुसार एकूण साठा जवळपास ८५७० लाख टन आहे. ज्याची अंदाजे किमंत रु. ७७९२ प्रती टन च्या हिशोबाने रु. ६६,७७,७४,४०,००,०००/- रु. आहे. तर बंडेड हेमॅटाईट क्वार्टस चा साठा ७०१० लाख टन आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *