Menu

शोकसंवेदना

डॉ. अशोक गायकवाड

डॉ. साहेबांचे अचानक हे निधन आंबेडकरी चळवळीसाठी अपूरणीय नुकसान ठरले आहे. ही वेदनेची, नि:शब्द होण्याची घडी आहे. ते केवळ पुस्तकनिर्माते नव्हते, तर एक प्रगल्भ विचारवंत, प्रभावी लेखक आणि सर्जनशील वक्ते होते. विविध समाजांतील, विविध स्वभावांच्या व्यक्तींना जोडून त्या सर्वांना आंबेडकरी चळवळीसाठी कार्यरत करण्याची दुर्मीळ कला त्यांच्या ठिकाणी होती. आंबेडकरी चळवळीचे ते गाढे अभ्यासक आणि अत्यंत सूक्ष्म भाष्यकार होते. त्यांनी लेखन व वाचनाच्या माध्यमातून बुद्धविचारांची ज्योत समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी अखंड प्रयत्न केले. दिवसाचे चोविसही तास त्यांनी कार्यासाठी झोकून दिले. आळस त्यांच्या स्वभावाच्या छायेतही कधी दिसला नाही. सभोवतालच्या माणसांत सर्जनशीलता निर्माण व्हावी यासाठी ते सतत प्रेरणा देत, धडपडत असत.

इतक्या वर्षांचा त्यांचा सहवास असा अचानक तुटणे हे असह्य धक्कादायक आहे. अशा वेळी शब्द अपुरे पडतात. त्यांना आम्हा नागपूरकरांकडून विनम्र भावपूर्ण आदरांजली!

 “मुक्ती विमर्श” पाक्षिक परिवार व भारतीय दलित पॅंथर कडून त्यांना भावपूर्ण आदरांजली!

      – डॉ. सुखदेव थोरात, नागपूर, डॉ. मधुकर कासारे, वैशाली नगर, वर्धा, एन जी कांबळे, नागपूर

      – डॉ. गौतम कांबळे, नागपूर, पॅंथर प्रकाश बनसोड, नागपूर, किशोर खांडेकर,नागपूर

      – डॉ. त्रिलोक हजारे, नागपूर, प्रा. डॉ. मोहन वानखडे, नागपूर, डॉ. विद्या चौरपगार, नागपूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *