Menu

डॉ. आंबेडकर यांचे निवडणूक युतीव आघाडी विषयीचे मत:

डॉ.आंबेडकरांनी शेड्यूल्ड कास्टस फेडरेशनचे राजकीय पक्षाबराेबर सहकार्य व निवडणूक युती करण्यासाठी
खालीलपैकी शर्ती मांडल्या –

  1. अशा युतीतील प्रत्येक पक्षाने आपली तत्वे स्पष्ट शब्दात मांडलेली असली पाहिजेत;
  2. अशा पक्षाच्या तत्वांच्या शेडूल्ड कास्टस फेडरेशनच्या तत्वांना विराेध नसावा;
  3. युती करणाऱ्या पक्षाने अनुसूचित जातींच्या सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठी पाठिंबा देण्याचे वचन दिले पाहिजे;
  4. पक्षाने शेड्युल्ड कास्टस फेडरेशनला त्याच्या अंतर्गत बाबींच्या बाबतीत फेडरल ऑर्गनायझेशन मध्ये स्थापत्य एकक म्हणून कार्य करण्यास सहमती देणे आवश्यक आहे; आणि

५.पक्ष अशा काेणत्याही पक्षाशी संलग्न नसावा 25 एप्रिल 1948 राेजी लखनऊ येथे भरलेल्या अखिल भारतीय शेड्युल्ड कास्टस फेडरेशनच्या परिषदेत भाषण करताना डाॅ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, राजकीय सत्ताही सर्व प्रगतीची गुरुकिल्ली आहे आणि आपला एक तिसरा पक्ष संघटित करून व प्रतिस्पर्धी राजकीय पक्षां धल्या समताेलपनाच्या तराजूची दांडी आपल्या हातात ठेवून शेड्युल कास्टस फेडरेशनने सत्ता काबीज केली, तरच आपण आपली मुक्ती मिळू शकू.
मी काँग्रेस मंत्रिमंडळात सहकार्य केल्याने पददलित समाजाच्या पुष्कळ गाेंधळ झालेला आहे आणि त्यांच्या शंकांचे व
संशयाचे निरसन मला करायचे आहे. सतत 25 वर्षे काँग्रेस विरुद्ध लढा दिल्यावर अशा आणीबाणीच्या वेळी मी मौन का पत्करले असे मला विचारण्यात येते. खरे पाहता सतत लढा देत राहणे ही काही सर्वाेत्तम युद्धनीती नाही. इतर नीतिंचा सुद्धा अवलंब करणे व अगत्याचे आहे. आम्ही मैत्रीच्या हात पुढे करून पाहिला व त्यात आम्हाला बरेचसे यश आले. काँग्रेसशी विराेधी भूमीका ही घेण्याची वेळ नाही. काँग्रेसशी सख्य व सहकार्य करून जेवढे पदरात पाडून घेता येईल, तेवढे पाडून घेतले पाहिजे. मी केंद्र सरकारात सामील झालाे आहे; परंतु मी, काँग्रेसने मला निमंत्रण दिले आणि मी काेणतीही अट न घालता शामिल झालाे.तेथे राहणे निरर्थक आहे. असे मला ज्यावेळी वाटेल त्यावेळी मी तिथून बाहेर पडेल.
आमची परिस्थिती अशी आहे की राज्य कारभार नियंत्रणेत आमची माणसे असणे आवश्यक आहे.

    डॉ. आंबेडकर

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *