Menu

देशाची भूक भागवणारा किसान – न्यायाच्या प्रतिक्षेत

सवंग लाेकप्रियतेसाठी सामाजिक/धार्मिक साैहार्द नष्ट करुन समाजा-समाजात व व्यक्ती-व्यक्ती मधे द्वेष निर्माण करणारी
विषारी शक्ती पासुन राज्य व्यवस्था वाचवणे प्रत्येक भारतीयांचे आद्य कर्तव्य आहे.
त्यामुळे सर्वप्रथम जातीय/सामाजिक/धार्मिक विद्वेष पसरवणार्या विचार धारेला राजकीय व्यवस्थे पासुन दुर ठेवणे.
2) संविधानिक प्रावधानांची अंमलबजावणी करुन संविधान रचयितांना अपेक्षित आर्थिक व सामाजिक समतेचा आग्रह करणे.तसेच शाश्वत राेजगारांतून सन्मानाने आपली भाकरी कमावणे. अगतिकता व लाचारीने सरकारी ‘‘फुकट‘‘ धान्य इत्यादीं याेजनेचा धिक्कार करणे व भारतीयां च्या स्वाभिमान जपणे.
3) श्रृंगारिक विकास जसे मेट्रो ,बुलेट ट्रेन ,उड्डाणपूल, पुतळे व शहरी सुशाेभीकरणा ऐवजी जनतेच्या मुलभूत गरजां जसे
स्वच्छ पेयजल,सिंचन, वीज, राेजगारक्षम शिक्षण , राेजगार संधी, आराेग्य या प्रश्नाकडे लक्ष द्यावे.
4) भारत कृषिप्रधान देश आहे व कृषक व शेतमजूर आत्महत्या करत आहेत कारण सरकारी नीती मुळे
शेतर्क-यांचे शाेषण.त्यामुळे कृषीनीतीमधे अमुलाग्र बदल करुन देशासाठी संपत्ती निर्माण करणारी, 50%
राेजगार निर्माण करणारी व संपूर्ण देशाची भूक मिळविणारी कृषी अर्थव्यवस्था अधिक मजबुत हाेईल.
5) अनुत्पादक शहरी सुशाेभीकरण म्हणजेच ‘स्मार्ट सिटी‘ ऐवजी ग्रामीण भागात उत्पादक याेजना जसे ‘गाव तिथे तलाव‘ व कृषि आधारित उद्याेग सारख्या याेजना राबवून अगतिक ग्रामीण भागातून शहराकडे हाेणारे स्थलांतर थांबवावे.या साठी सरकार ने माेठी गुंतवणूक करावी.
6) भारतीय संस्कृतीत महिला व कष्टकर्यांचे नेहमीच ‘‘शुद्र‘‘ आर्थिक, मानसिक व सामाजिक शाेषण करण्यात आलेले आहे. या दाेन्हीत वर्गात आज संविधानिक प्रावधानांचा न्याय पाेचलेला नाही. सरकार कडून संविधानात नमूद राज्य निदेशक तत्त्वांची ( 38 व 39) अंमलबजावणी करून ताबडताेब न्याय द्यावा.
7) भारतीय राजकीय व्यवस्थेत पक्षीय राजकारणात भ्रष्टाचार बाेकाळलेला आहे, त्याची प्रचिती प्रत्येक निवडणुकीत येते मात्र जनतेने ‘कायद्याच्या राज्या‘ साठी आग्रही लाेकांनाच मतदान करावे.
8) संविधानिक न्याया साठी सातत्याने लढा देणारे उमेदवार निवडुन द्यावेत व संविधानिक मुल्य जपावेत.
9) निवडणुकीत भ्रष्टाचाराचा पैश्याने जातीय/धार्मिक/भाषिक/ लैंगिक/प्रादेशिकते वर द्वेष पसरवणार्यां पासुन सावध राहुन सामाजिक साैहार्द , सामाजिक सन्मान व आर्थिक स्वावलंबनासाठी काम करणार्या व्यक्ती/विचार सरणीला निवडुन द्यावे…

-अमिताभ पावडे
( पूर्व परियोजना प्रबंधक भारतीय विममविानपत्तन प्राधिकरण )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *