22 जानेवारीला नागपूरमध्ये भगवे वातावरण निर्माण करून दहशत निर्माण करण्याच्या प्रयत्न काही संघटनांनी केला आणि नागपूर शहरातील सगळे विवेकवादी व धर्मनिरपेक्ष लाेक एक प्रकारे चिंताग्रस्त झालेत. त्यावेळी त्यांचा आत्मविश्वास वाढवणे अत्यंत आवश्यक हाेते. म्हणून तीन दिवसाच्या कठाेर परिश्रमाने 26 जानेवारीला तिरंगा ध्वज घेऊन एक भव्य रॅली काढण्याचा विचार पुढे आला. त्यासाठी फेडरेशन ऑफ ऑर्गनायझेशनसाॅर साेशल जस्टिस, सेक्युलरिझम एंड डेमाॅक्रॅसी या 80 सामाजिक संस्थांचे व संघटनांचे प्रतिनिधित्व करणा-या सामाजिक संघटनेने पुढाकार घेतला आणि एका भव्यरॅलीचे

आयाेजन 26 जानेवारीला केले. ड्राेनने घेतलेल्या छायाचित्रानुसार, या रॅलीमध्ये सुमारे 400 कार्स, 250 रिक्षा व 800 माेटर बाईक व स्कूटर समाविष्ट हाेत्या. आणि ही भव्य रॅली सुमारे पाच किलाेमीटर लांब हाेती. ती नागपूर शहरातून 35 किलाेमीटर परिघाने
परिक्रमा करत राहिली. या रॅलीत राष्टध्वज म्हणजे तिरंगा हा प्रत्येकाजवळ हाेता. या रॅलीचे आणखी वैशिष्ट्य असे की या रॅलीमध्ये शीख, मुस्लिम, ख्रिश्चन, ओबीसी, मराठा, दलित व आदिवासी या सगळ्या समुदायांचा उत्स्ूर्त प्रतिसाद हाेता. हजाराे तिरंगा घेऊन लाेक या रॅलीत सहभागी असल्यामुळे सगळीकडे एक प्रकारे चैतन्य व उत्साह निर्माण झाला.
संविधान वाचविणे हा रॅलीचा मानस असून लाेकशाही काेणत्याही परिस्थितीत टिकवून
ठेवणे हा विचार नागपूरमध्ये या रॅलीच्या माध्यमाने स्थापित झाला.
संकलक
-विद्या चंद्रा