2 मे 2024 ला नागपुरातील संघटनेची एक बैठक..

रविवार, दिनांक 2 मे 2024 लाफेडरेशन ऑफ असाेसिएशन फोर सेक्युलॅरिझम साेशल जस्टिस , सेक्युलॅरिझम एंड डेमाेक्रेसी
नागपुरातील संघटनेची एक बैठक इंजि. मा. प्रदीप नगरारे यांच्या यांच्या अध्यक्षतेखाली आयाेजित करण्यात आली. त्यात म
हाराष्ट— शासनाच्या शिक्षण विषयक धाेरणावर चर्चा करण्यात आली. तसेच डाॅ. सुखदेव थाेरात यांनी लिहिलेले निवेदनावर
विस्तृत चर्चा झाली. या चर्चेमध्ये विद्यार्थ्यांना देण्यात येणारे मूल्यशिक्षण हे धर्माच्या नावावर वैदिक ब्राह्मणीझम ची मूल्ये
प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या विद्यार्थ्यांच्या मनावर बालपणापासून रुजावेत, या दृष्टिकाेनावर टीका करण्यात आली. आणि याम
ध्ये निष्कर्षाच्या रूपात शालेय शिक्षण व माध्यमिक शिक्षण या स्तरावर विद्यार्थ्यांना घटनेमधील न्याय, समता, स्वातंत्र्य,
बंधुत्व, धर्मनिरपेक्ष राज्ये ही तत्वे शिकविण्यात यावी. त्याचबराेबर घटनेमध्ये नमूद केलेली नागरिकांची कर्तव्य
सुद्धा शिकवावी अशा निर्णय घेण्यात आला. या सभेत मराठा सेवा संघ, आदिवासी, बाैद्ध संघटना, जमात-ऐ- इस्लाम व
शीख धर्मीयांच्या त्याचप्रमाणे ओबीसी समाजाच्या ब-याच संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित हाेते. सभेमध्ये मराठा सेवा
संघाचे इंजि. दिलीप खाेडके, दक्षिणांयनचे इंजि. अमिताभ पावडे, गुरुदेव सेवा मंडळाचे मा. ज्ञानेश्वर रक्षक, अंधश्रद्धा
निर्मूलनचे मा. जगजीत सिंग, डाॅ. चंदू मस्के इंजि. विजय ओरके, बानाईचे इंजि. अरविंद गेडाम सामाजिक व आर्थिक
समता संघाचे डाॅ. त्रिलाेक हजारे, किशाेर खांडेकर, इंजि.प्रदीप नगरारे, प्रदीप शेंडे, डाॅ. अन्वर सिद्दिकी, आर. म
ाेहम्मद, गाैतम कांबळे व इतर मान्यवर प्रतिनिधी उपस्थित हाेते. या बैठकीमध्ये सरकारला यासंबंधीचे एक निवेदन जिल्हा
पातळीवर तसेच राज्य पातळीवर देण्यात यावे. त्याचप्रमाणे या विषयावर गंभीर चर्चा करण्यासाठी एका राज्यस्तरीय
परिषदेचे आयाेजन सुद्धा नागपुरात व्हावे व याकरिता एक प्रेस काॅन्\रन्स सुद्धा घेण्यात यावी आणि या सगळ्यांचा गाेषवारा
सर्व संघटनांपुढे सादर करून जनमत तयार करावे असे ठरले.
-डाॅ. त्रिलाेक हजारे, नागपूर