Menu

संपुर्ण विश्वात उमटले महाबोधी विहार मुक्ती संघर्षाचे पडसाद

डॉ. मिलिंद अवसरमोल, न्युजर्सी अमेरिका

जसे की सर्वज्ञात आहे, सुमारे २५०० वर्षांपूर्वी भगवान बुद्धांनी महाबोधी वृक्षाखाली ज्ञानप्राप्तीनंतर त्यांच्या धम्मोप देशांनी संपूर्ण मानवजातीला प्रकाशित केले. महाबोधी वृक्षाच्या छायेत वसलेले, सम्राट अशोकांनी सुमारे २३०० वर्षांपूर्वी बांधलेले हे पवित्र महाबोधी विहार, आज विरोधकांच्या कटकारस्थानांनी आणि विघातक प्रवृत्तीमुळे संकटात सापडले आहे. बौद्ध भिक्षुवर्ग तसेच सामान्य बौद्ध समाज, बी.टी. १९४९ कायदा बदलण्याच्या मागणीसाठी आंदोलन करित आहेत. या कायद्यामुळे या पवित्र स्थळाचे प्रशासन गैर-बौद्ध आणि असंवेदनशील बहुसंख्याकांकडे आहे. याच महाबोधी विहारांचे व्यवस्थापन बौद्धधर्मियांकडे असावे या मागणी करिता गेले अनेक दशके संघर्ष सुरु आहे. या संघर्षात आता भारतातील असंख्य भिक्षु, उपासक, उपासिका बोधगया येथे आंदोलनात सहभाग घेत आहे. या आंदोलनाची दखल शासन व मेनस्ट्रीम मिडीयाला ही घ्यावी लागत आहे. या आंदोलनाचे पडसाद आता जगभरात उमटत आहे.

विशेषतः ज्या ज्या देशात आंबेडकरी समाज आहे तेथे या आंदोलनाच्या समर्थनार्थ प्रदर्शने व शांती यात्रा निघत आहेत. अन्य बौद्ध राष्ट्रांशी संपर्क प्रस्थापित करत त्यांचाही सहभाग या आंदोलनात वाढत आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्याकरिता जगभरात होत असलेल्या महत्वाच्या घडामोडींच्या नोंदी खालील प्रमाणे

*इंग्लंडः ३० मार्च ला लंडन येथे महाबोधी आंदोलनाच्या समर्थनार्थ शांतीमार्चचे आयोजन करण्यात आले. विविध राष्ट्रांचे धम्म अनुयायी या शांती यात्रे मध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हाईड पार्क येथून सुरु झालेली ही शांती यात्रा लंडन शहराच्या ऐतिहासिक व महत्त्वापुर्ण स्थळांजवळुन मार्गक्रमण करित भारतीय दूतावास जवळ संपन्न झाली. यु.के. चे पंतप्रधान मा. किर स्टारमर यांना या आंदोलच्या संदर्भात निवेदन देण्यात आले ज्यामध्ये त्यांनी भारतीय सरकारशी या संदर्भात बोलणी करावी ही विनंती करण्यात आली. *अमेरिका: २२ मार्च रोजी अमेरिकेची राजधानी वॉशिंगटन डि. सी. येथे AANA च्या पुढाकाराने देशभरातुन बौद्धधर्मीय बहुसंख्येने एकत्र आले व या आंदोलनाच्या संदर्भात रस्त्यावर निदर्शने केली. अनेक सिनेटर यांना निवेदने देण्यात आली. या आंदोलनात विविध राष्ट्रातील भंते व उपासक समाविष्ट होते. याचबरोबर, बोधगया येथील आंदोलनाला बळकटी देण्यासाठी आर्थिक मदत ही पुरवण्यात आली.

*न्यु यॉर्क – AIM USA तर्फे येत्या बौद्ध पोर्णिमेच्या पावन प्रसंगी

शांती यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. बौधगयेच्या पवित्र स्थळी शांततामय मार्गाने सातत्याने आणि खडतर परिस्थितीत आंदोलन करणाऱ्या आमच्या बौद्ध बांधवांप्रती ऐक्य दर्शवण्यासाठी, ट्राय-स्टेट (न्यू यॉर्क, न्यू जर्सी व पेन्सिल्वेनिया) परिसरातील बौद्ध समाज एकत्र येऊन १७ मे रोजी ब्रुकलिन ब्रिजवरून शांती यात्रा काढण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय बौद्ध समुदाय एकसंघ आहे आणि महाबोधी विहाराचे नियंत्रण बौद्ध प्रशासनाकडे सुपूर्द करावे, या मागणीला पूर्ण पाठिंबा असल्याचे दर्शवण्याचा आमचा हेतू आहे.

राष्ट्र, संप्रदाय किंवा अन्य कोणत्याही निकषापेक्षा पुढे जाऊन, सर्व बौद्ध बांधवांनी या घटनात्मक आणि शांततामय यात्रेत सहभागी होतील, ज्यामध्ये जापानी, कंबोडीयन, व्हियतनामी, थायलँड, चीन, श्री लंकन, भारतीय, बंगलादेशी, इंडोनेशीया, नेपाळ, ताइवान, बर्मीज, ई. मोठ्या संख्येने सहभागी होतील.

स्थळ – बुकलिन ब्रिज (ब्रुकलिन बाजू) दिनांक आणि वेळ: १७ मे २०२५, सकाळी ११:०० ते दुपारी १:००

*बेल्जियम: AIM (Europe) यांच्या पुढाकाराने विविध बौद्ध संस्थाना एकत्रित करत महाबोधी आंदोलनास समर्थन देण्यात येत आहे.

*नेदरलैंड: तुलनेने लहान असलेल्या नेदरलँड येथे २२ मार्च २०२५ रोजी महाबोधी आंदोलनाच्या समर्थनात शांतीमार्चचे आयोजन करण्यात आले.

  • जपान*: AIM (Japan) तर्फे संयुक्त राष्ट्रसंघ (जपान) च्या कार्यालया समोर धरणे देण्यात येणार आहे. यामध्ये स्थानिक जपान बौद्ध संघाचे सहकार्य असणार आहे.

*ऑस्ट्रेलिया: सिडनी येथिल ऑपेरा हाऊस येथे शांती मार्च चे आयोजन करण्याची तयारी सुरू आहे.

  • बहरिन: येथील AIM (Bahrain) तर्फे रु ७०००० चे संघ दान करण्यात आले, ज्याचा वापर सिसिटिव्ही, कॅमेरे

तसेच आंदोलनकर्त्यांना इतर आवश्यक वस्तुंसाठी करण्यात येईल. तसेच मा. आकाश लामांमार्फत आंदोलनकर्त्यांना पाठिंबा दर्शविणारा संदेश देण्यात आला.

  • ओमान: AIM(Oman) द्वारे या आंदोलनास पाठिंबा देणारे निवेदन भारतीय दूतावासास सादर करण्यात येणार आहे, तसेच आर्थिक सहाय्यते साठी निधी संकलन सुरु आहे. *कुवेत : येथुन आर्थिक मदत देण्यात येत आहे.
  • तळटीप – बहुतांशी आखाती राष्ट्रांमध्ये व काही ईतर देशांमध्ये जमावाची परवानगी नसल्यामुळे तेथील आंबेडकरवादी बौद्धजन आर्थिक योगदानाने या आंदोलनास बळकट करित आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *