Menu

वाचकांचे मनाेगत

10 एप्रिल चा विशेषांक हा ’मुक्ती विमर्श’चा निवडणूक विशेषांक हाेता. ताे देशातील सामान्य मतदारांसाठी दिशादर्शक
असा विशेषांक हाेता. मागील दहा वर्षात आर्थिक व राजकीय व्यवस्थेचा -हास झाल्याचे निरीक्षण संपादक डाॅ. सुखदेव
थाेरात यांनी नाेंदविले. त्याचबराेबर डाॅ. आंबेडकर यांचा सांप्रदायिक लाेकशाहीचा इशारा खरा ठरला, हे डाॅ. थाेरात
यांनी नमूद केले. देशात ‘एक देश एक निवडणूक‘ ही देशावर सांप्रदायिक लाेकशाही थाेपण्याचा अंतस्थ हेतू आहे,
असा डाॅ. जाेगेंद्र गवई यांचा लेख अत्यंत महत्त्वाचा वाटला. त्याचप्रमाणे डाॅ. गाेविंद पाल, नवी दिल्ली यांनी मागील दहा वर्षात
दलित, आदिवासी व महिलांवरील वाढते अत्याचार, यावर आपल्या लेखात अत्यंत मार्मिक प्रकाश टाकला. डाॅ. श्रीनिवास खांदेवाले यांनी 2014 ते 2023 हा काळ आर्थिक विषमता वाढवणारा आहे, हे व्यक्त केलेले मत अत्यंत महत्त्वाचे व
वस्तुस्थिती दर्शविणारे आहे. मच्छिमार समाजाच्या वाढत्या समस्या संघर्ष वाहिनीचे संघटक दिनानाथजी वाघमारे यांनी समाजासमाेर आणल्यात तसेच डाॅ. राम देशपांडे यांनी ’बळीराजाची हाक’ हा लेख लिहून मागील दहा वर्षात शेतक-यांवर राजकीय व्यवस्थेने कसा अन्याय केला, हे आकडेवारीसह स्पष्ट केले आणि डाॅ. खालील मुसाशाह यांनी दहा वर्षातील बेराेजगारी व महागाई वाढवणारा आर्थिक विकास वाचकांसमाेर आकडेवारीसह ार कुशलतेने मांडला. एकूणच हा अंक अतिशय महत्त्वाचा व देशातील मागील दहा वर्षाची वस्तुस्थिती दर्शविणारा आहे. मुक्ती विमर्श चे संपादक डाॅ. सुखदेव थाेरात सरांचे हार्दिक आभार आणि अभिनंदन !

-डाॅ. विजयकुमार माहुरे, नांदेड

‘मुक्ती विमर्श ‘या 26 मार्च ते 10 एप्रिल 2024 च्या अंकाम धील सर्वच लेख अत्यंत अभ्यासपूर्ण व आंबेडकरी
समाजासाेबतच इतर बहुजन व अल्पसंख्याक समाजाला सुद्धा याेग्य दिशा देणारे व क्रियाशील ठेवणारे आहेत. अंकांच्या
शेवटच्या पानावरील जानेवारी महिन्यापासून तर मार्च महन्यापर्यंत नागपूर शहरातील ’फेडरेशन ऑफ ऑर्गनायझेशनाॅ फोर साेशल जस्टिस सेक्युलरिझम व डेमाॅक्रॅसी या सामाजिक संघटनेने निराळे चार कार्यक्रम शहरात करण्यात महत्त्वाचा
पुढाकार घेतला व त्यामुळे धर्मनिरपेक्ष भारताच्या दिशेने याेग्य वाटचाल या शहराने केली हे विविध कार्यक्रमाचे आयाेजन
झाल्याची प्रसिद्धी दिली. यासाठी मुक्ती विमर्श चे विशेष आभार.

-राजेंद्र रामटेके, मुक्काम पाेस्ट चापर्डा,
जिल्हा यवतमाळ

मुक्ती विमर्श हे पाक्षिक वंचित समाजाचे वर्तमान काळातील प्रश्न स्पष्टपणे मांडते. समाजातील ज्वलंत
प्रश्नांना वाचा फोडून त्या प्रश्नांचे निवारण कसे हाेईल? अश्या पद्धतीचे लेख या पाक्षिकेत वाचायला मिळतात. ह्यात शेतक-यांची दारूण अवस्था त्याकडे सरकारचे सातत्याने दुर्लक्ष व त्यामुळे निर्माण झालेली भीषण परिस्थिती ह्याचा
उहापाेह ‘बळीराजाची हक’ या लेखात आढळून येताे. मागील दहा वर्षात दलित आदिवासी व महिलांवरील वाढते अत्याचार व
त्यासंबंधात हाेणारी प्रशासकीय व न्यायालयीन दिरंगाई ह्यामुळे हा प्रश्न दिवसेंदिवस भेसूर
हाेत आहे. अश्या विविध सामाजिक प्रश्नांची या पाक्षिकेत मुलभूत चर्चा हाेते. हे पाक्षिक विद्यार्थांनी जरूर वाचले
पाहिजे. मी संपादक मंडळाचे आभार मानताे की, मला समा जातील ज्वलंत प्रश्नांची ओळख हे पाक्षिक देत आहे.


-स.प्राध्यापक फुला रंगराव खांडेकर,
जी.टी. पाटील महाविद्यालय, नंदुरबार


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *