नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांचे निकाल ४ जून २०२४ रोजी जाहीर झाले. या निवडणुकांच्या निकालावरून हे निश्चित झाले की, ‘भारत हे हिंदू राष्ट्र नाही’ असे प्रतिपादन प्रसिद्ध अर्थतज्ञ डॉ. अमर्त्य सेन यांनी केले. अयोध्यामध्ये राम मंदिराची स्थापना केल्या नंतर फैजाबादची लोकसभेतील जागा गमावणे हे त्याचे द्दोतक आहे. प्रत्येक निवडणुकीनंतर बदलाची आशा असते त्यानुसार २०२४ च्या निवडणुका ह्या पूर्वीच्या तुलनेत अधिक प्रमाणात बदल घडवून आणणाऱ्या ठरल्या. ज्याप्रमाणे इंग्रजांच्या राजवटीत विनाखटला लोकांना तुरुंगात डांबण्यात येत असे त्याप्रमाणे भाजपधारित केंद्र सरकारच्या काळात नागरिकांचे स्वातंत्र्य हिरावून खटल्याविना तुरुंगात टाकण्याचे प्रकार सर्रास सुरू होते. श्रीमंत गरीब अशी दरी वाढत आहे, ती थांबवायला पाहिजे. भ्रष्टाचार, महागाई, बेरोजगारी, हिंसाचार सारख्या समस्या उफाळल्या होत्या. अशा स्थितीत सत्ताबदल होण्यासाठी अपेक्षित निकालाची वाट नागरिकांना होती. या निवडणुकांमधून अपेक्षित बदल दिसून आला. भारत हा धर्मनिरपेक्ष व लोकशाहीवादी देश आहे त्यामुळे राजकीयदृष्ट्या मुक्त विचारांची येथे गरज आहे. भारताला हिंदू राष्ट्र घोषित करण्याची कल्पना योग्य नाही. अशी स्पष्ट भूमिका डॉ. अमर्त्य सेन यांनी मांडली.