- शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी चंद्रपूरचे ५९८ गावं तहानलेली!
जिल्हा विविध प्रदूषणांनी ग्रस्त;
एकीकडे सरकार प्रत्येक गावात स्वच्छ पाणी पोहोचवण्याचा दावा करत असली तरी वास्तवात आजही लाखो लोक शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी तहानलेले आहेत. अशा स्थितीत चंद्रपूर जिल्ह्यातील तब्बल ५९८ गावं भूगर्भातील विविध प्रकारच्या प्रदूषणांमुळे प्रभावित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. भूजल सर्वेक्षण विभागाने मार्च २०२५ मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील १५ तालुक्यांमधून २१,१६८ पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासले, ज्यामध्ये: ३९३ नमुने फ्लुराईडने प्रभावित, ७५५ नमुने नायट्रेटने प्रभावित, १०० नमुने क्षाराने प्रभावित, ६ नमुने लोहमूल्य खनिजांनी प्रभावित, ३१६ नमुने जिवाणूंनी प्रभावित असल्याचे आढळले. कूपनलिका, विहिरी अशा विविध जलस्रोतांमधून घेतलेल्या या नमुन्यांवरून चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण ५९८ गावं पाण्यातील प्रदूषणामुळे बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे.
तालुकानिहाय प्रभावित गावांची संख्या अशी आहे:
चंद्रपूर – ३९, भद्रावती – ३९, वरोरा – ७२, चिमूर – ३६, नागभीड – ५२, ब्रह्मपुरी – ७१, मूल – ४९, गोंडपिपरी – २२, राजुरा – २९, सावली – ६१, बल्लारपूर – ९, कोरपना – ४१, सिंदेवाही – ५३, पोंभुर्णा – १५ आणि जीवती तालुक्यातील १० गावांचा समावेश आहे.