अनुसूचित जातींचे १४,१९८ कोटी अखर्चित आनंद डेकाटे
नागपूर : मागील पाच वर्षात राज्याच्या अर्थसंकल्पा मध्ये अनुसूचित जातीच्या विकासासाठी तरतूद केलेल्या निधीपैकी तब्बल १४,१९८ कोटी रुपये खर्चच केले नाहीत, अशी माहिती पुढे आली आहे.
राज्याच्या अर्थसंकल्पात २०१४-१५ ते २०१८-१९ या काळात अनुसूचित जातीसाठी एकूण ३६,४६६ कोटी रुपयांची तरतूष करण्यात आली यापैकी २२,२६८ कोटी रुपये खर्च करण्यात आले. तब्बल १४,१९८ कोटी रुपये खर्चच झाले नाहीत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ६७टक्के कपातीचा निर्णय घेण्यात आला आहे. या परिस्थितीत आधीच कमी मिळत असलेल्या निधीत ६७ टक्के कपात झाली त्यामुळे सामाजिक व्यायाच्या योजना कसा राबवल्या नाणार, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.