देशाचे भवितव्य ज्या उच्चशिक्षित तरुणांवर अवलंबून आहे त्यांच्या भविष्याशी निगडित उच्च शिक्षणाच्या प्रवेश परीक्षेत घोटाळा होणे ही कोणत्याही देशाला अभिनंदनीय बाब नाही. यावर्षी नीट च्या परीक्षेत एकूण ६७ विद्यार्थ्यांना ७२० पैकी ७२० गुण मिळाले मागचे वर्ष केवळ दोन विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळाले होते. या अस्वाभाविक निकालाबद्दल संशय निर्माण झाला काही विद्यार्थी व पालक एकत्र येऊन त्यांनी शहरांशहरांमध्ये निषेध नोंदवला व संपूर्ण देशात या विरोधात आंदोलन सुरू झाले सुरुवातीला काही झालेच नाही म्हणून कानावर हात ठेवणाऱ्या सरकारला नाईलाजास्तव सीबीआय कडे चौकशी सोपवावी लागली आणि नीट च्या कुलूप बंद कपाटातून एका मागून एक गलिच्छ सांगाडे बाहेर पडायला लागले. बिहार, हरियाणा, झारखंड, कर्नाटक, महाराष्ट्र व गुजरात येथे मोठ्या प्रमाणात आरोपींची धरपकड करण्यात आली. उघड झालेल्या घोटाळ्याचा आवाका, प्रश्न पत्रिकांची गळती, संदिग्ध चाचणी केंद्रे व संघटित फसवणूक करणाऱ्या टोळ्या हे सिद्ध करते की, हे एन.टी.ए. चे फार मोठे अपयश आहे. विद्यार्थ्यांचे कल्याण व शैक्षणिक उत्कृष्टता लक्षात न घेता केवळ काही मूठभर खाजगी संस्थांना फायदा पोहोचविण्यासाठी हे केंद्र तयार केल्याचे दिसते. पैशाची अमाप उलाढाल पाहून प्रशिक्षण केंद्रामध्ये शिक्षक व राजकारणी हा माफिया वाढत चाललेला आहे त्यांचे वाढलेले धाडस व उद्दाम पणा यावर्षीच्या नीट च्या निकालात दिसून येतो. केवळ काही मूठभर खाजगी संस्थांना फायदा पोहोचवण्यासाठी हे केंद्र तयार केल्याचे दिसते पैशाची अमाप उलाढाल पाहून प्रशिक्षण केंद्रामध्ये शिक्षक-राजकारणी हा माफिया वाढीला लागला आहे. त्यांचे वाढलेले धाडस व उदामपणा यावर्षीच्या नीट च्या निकालात दिसून येतो. एनटीए ही सोसायटी नोंदणी कायद्याअंतर्गत २०१८ मध्ये स्थापन झालेली एक स्वायत्त संस्था आहे. एकूण देशातील महत्त्वाच्या २३ प्रकारच्या परीक्षा ही संस्था घेते नीट चा चाचणी घोटाळा ही या संस्थेसाठी अत्यंत लाजिरवाणी बाब आहे शिक्षणाचा दर्जा सुधारण्यावर भर न देता राष्ट्रवादाचा कृत्रिम मुखवटा महत्त्वाच्या संस्थांना बळजबरी घालण्याचा सरकारचा हा मनसुबा तर नाही असा संशय निर्माण होतो.
एन.टी.ए. ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची चाचणी संस्था आहे. २०२२-२०२३ मध्ये अंदाजे १४ दशलक्ष विद्यार्थ्यांची चाचणी घेण्यात आली. ५ वर्षात ६ मोठ्या प्रश्नपत्रिका गळतीच्या घटना घडल्या ज्याचा परिणाम ७५ लाख विद्यार्थांवर झाला. ज्याप्रमाणे गैरसोयींचा इतिहास, गैरसोयीचे प्रतीके शालेय व महाविद्यालयीन पाठ्यक्रमातून हटवणे व सोयीच्या दंतकथा पेरणे, इतिहास बदलणे ज्यामुळे दांभिक नेतृत्वाला ते सहाय्यकारी ठरेल त्याचप्रमाणे साचेबद्ध तरुण तयार करण्यासाठी, काल्पनिक हिंदू राज्यासाठी ही संस्था काम करते की काय? असा संशय निर्माण होतो. या संदर्भात यूपीएससीचे चेअरमन यांचा राजीनामा व पूजा खेडकर प्रकरण अभ्यासणे जरुरी आहे इतिहास व विज्ञानाचे भगवीकरण करण्याचे प्रयत्न एक राष्ट्र एक परीक्षा या प्रकल्पाशी निगडित आहे. शेवटी व्यवस्थेला हा प्रश्न विचारावासा वाटतो की एकलव्याचा अंगठा किती काळ कापात राहणार?
-किशोर खांडेकर