येत्या निवडणुकीत प्रत्येक नागरिकाच्या जगण्या- मरणाचा प्रश्नाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. शिक्षण, राेजगार, आराेग्य, वाढती महागाई त्यामुळे जनसामान्याचे माेडलेले कंबरडे याची चिंता सत्ताधा-यांनी व जे सत्तेवर निवडून येतील अश्या सर्वांची नैतिक जबाबदारी आहे. हि जबाबदारी ते नाकारीत असतील त्यांचे मनसुबे फक्त भांडवलदारांचे कर्ज माफ करणे, त्यांना विशिष्ट
साेयीसवलती पुरविणे व जनसामान्याचे शाेषण करून संविधानाने दिलेल्या जगण्याचा अधिकार व स्वातंत्र्य पायदळी तुडवीणे असे असेल तर जनतेने अशा व्यक्ती किंवा पक्षाला आपले अमुल्य मत देऊन स्वतःच व आपल्या पिढ्यांचे भविष्य बर्बाद करून आपल्याच लेकरांच्या भविष्याशी खेळ करू नये. त्यासाठी सर्व बहुजनांनी संघटीत हाेऊन सत्ताधारी व शासनकर्ती जमात हाेण्यासाठी कंबर कसली पाहिजे. त्यासाठी खालील बाबींकडे लक्ष दिले पाहिजे.
- सर्वांसाठी शिक्षण व आराेग्य यासारख्या मुलभूत सुविधांचे राष्ट्रीयीकरण झाले पाहिजे
- शेतीचे राष्ट्रीयीकरण झाले पाहिजे
- जातनिहाय जनगणना झाली पाहिजे
- शेतक-यांना बिनव्याजी पतपुरवठा केला पाहिजे
- खते, बियाणे व शेतीची अवजारे व इतर संसाधने ऋण मुक्त झाले पाहिजे
- काळ्याधनावर सरकारने श्वेत पत्रिका जारीकरून काळे धन भारतात आणावे
- EVM बँन करून निवडणुका मतपत्रिकेव्दारे घेतले पाहिजे
- वीज, पाणी, घर हे नागरिकांचा मुलभूत हक्क मानून सर्वांना परवडेल अशा मा\क दरात उपलब्ध करावेत
- प्रत्येक गावातील विकास कामे ग्रामसभेच्या परवानगीने व्हावीत आणि गाव स्वयंपूर्ण करावे
- सर्व शेतकरी विराेधी कायदे रद्द झाले पाहिजे
- कामाचा कालावधी फक्त 8 तास असला पाहिजे
- शेतक-याच्या मालाला हमीभाव मिळालाच पाहिजे
- गाव तिथे शाळा असलीच पाहिजे
- नवीन शैक्षणिक धाेरण रद्द करून जनसामान्याच्या हिताचे सर्व गाेरगरीब, वंचित, शाेषित, पिडीत यांना दर्जेदार शिक्षण मिळालेच पाहिजे
- महिलांना 50 % उमेदवारी प्रत्येक पक्षाने दिली पाहिजे
- बेराेजगारांना शासकीय व खाजगी क्षेत्रात नाैकरी मिळाली पाहिजे व कंत्राटीकरण पूर्णतः बंद केले पाहिजे
- लाडकी बहिण सारख्या याेजना ऐन निवडणुकीच्या ताेंडावर घाेषित करून जनतेच्या पैश्याची अवास्तव लुट थांबविली पाहिजे. व बहिणींसाठी शाेशत विकासाचा याेजना राबविल्या पाहिजे
- अवाजवी सिमेंटीकरण करून पर्यावरणाचे प्रदूषण वाढवू नये व जीवसृष्टीचे संरक्षण करण्यासाठी उपाययाेजना केल्या पाहिजे जाे पक्ष लाेकशाही सुदृढ करेल व सार्वजनिक उद्याेगांचे खाजगीकरण करणार नाही, गरीब बेराेजगारांच्या हाताला काम मिळवून देईल, तसेच लाेकशाहीचा चाैथा स्तंभ माध्यमे व सरकारी यंत्रणा यांचा दुरुपयाेग करणार नाही. महागाईवर नियंत्रण करेल. अशा पक्षाला मत दिले पाहिजे.
ॲड. सुषमा भड
अध्यक्ष: राष्ट्रीय ओबीसी महिला