‘आजकाल आंबेडकरांचे नाव सारखे सारखे घेण्याची फॅशन झाली आहे. आंबेडकर, आंबेडकर असा जप काही लोक करत असतात. पण एवढ्या वेळा देवाचे नाव घेतले तर एखाद्याला सात जन्म स्वर्गात जागा मिळेल.’ अशा शब्दात गृहमंत्री अमित शहांनी आंबेडकरांचा अपमान केला असून या घटनेने आंबेडकरी समाजात तसेच देशाच्या राजकारणात अस्वस्थता निर्माण झाली आहे. या घटनेचे पडसाद संसदेमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात उमटले. विरोधी पक्षाने या विधानाविरोधात मोठ्या प्रमाणात आवाज उठविला. संसदेचे कामकाज सुद्धा यावेळी तहकूब करण्यात आले. तसेच अनेक राज्यात याविरुद्ध निदर्शने करण्यात आली.
