‘वर्तमान भारतात युवकांचे भविष्य’ या विषयावर आधारित युवा परिषदेमध्ये युवकांनी न
घाबरता सत्तेविरुद्ध संघर्ष करण्यास सज्ज व्हावे असे मत प्रा. लक्ष्मण यादव यांनी व्यक्त केले.
शेतक-यांचे आंदाेलन दडपून टाकल्या जात आहे. शाळांचे खाजगीकरण करून व नवीन
शैक्षणिक धाेरणाद्वारे सर्वसामन्याचे शिक्षण संपवण्याचा प्रयत्न हाेताे आहे. हे थांबवायचे
असेल तर मनामध्ये काेणतीही भीती न बाळगता सरकारच्या धाेरणाविरुद्ध उघडपणे बाेलण्याचे
आवाहन प्रा. लक्ष्मण यादव यांनी केले. उमेश काेराम, माे. सैफ उल इस्लाम, कृतला
आकरे, आशिष ुलझेले, श्रुती सालवणकर, राहुल डाेंगरे इत्यादी युवा वक्त्यांनी देशातील
बेराेजगारी, महागाई, हुकुमशाही व सामाजिक माध्यमांचा सत्तेच्या अनुषंगाने हाेत असलेला
गैरवापर याविषयी बेधडक मत व्यक्त केले. युवा परिषदेच्या अध्यक्षस्थानी जगजीत सिंह हाेते.
संकलक
-विद्या चंद्रा