Menu

थोडक्यात महत्वाचे

राज्यातील १४ हजार ७८३ शाळा गोत्यात व १ लाख ८५ हजार विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीवर संकुल आणि क्लस्टरच्या माध्यमातून दहा किलोमीटर अंतरावर एक शाळासंकुल उभारण्याच्या सरकारच्या भूमिकेमुळे गावातील शाळा बंद होण्याची भीती असून राज्यभरातील १४ हजार ७८३ शाळा समायोजित (बंद) होण्याची शक्यता आहे. या निर्णयाचा परिणाम १ लाख ८५ हजार विद्यार्थी आणि ३० हजार शिक्षकांवरही होणार आहे. हे विद्यार्थी ग्रामीण, आदिवासी पाडे, दुर्गम भाग व शहरी झोपडपट्टी यातील असणार आहेत. शिक्षण कायमचे बंद होण्याची शक्यता……ज्या गावची शाळा बंद होईल त्या गावच्या विद्यार्थ्यांचे शिक्षण कायमचे बंद होण्याची शक्यता यामुळे निर्माण झाली आहे. कमी पटसंख्येच्या शाळा चालविणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही तसेच तेथील गुणवत्ता टिकवता येत नाही. त्यामुळे राष्ट्रीय शिक्षण धोरणात कमी पटसंख्येच्या शाळा समायोजित करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
शिक्षणावरील खर्च कमी…. मागील चार वर्षात राज्य सरकारचे उत्पन्न वाढले. परंतु, शिक्षणावरील खर्च १८.९ टक्क्यांवरून १६.३ टक्क्यांपर्यंत कमी खाली आला. सतत खर्च कपातीमुळे शाळांची अवस्था बिकट झाली आहे. शिक्षकांची रिक्त पदे, भौतिक सुविधांचा अभाव, अशैक्षणिक कामातून सुटका खेळाचे मैदान व साहित्य त्यासाठी प्रशिक्षित शिक्षक आदींची पूर्तता होऊ शकली नाही. त्यामुळे या शाळा आपसूक गुणवत्ताहीन ठरल्या आता त्या मरणासन्न अवस्थेत आहेत.
बंद होणाच्या मार्गावरील शाळांचे प्रमाण सर्वात जास्त विदर्भात आहे त त्या खालोखाल मराठवाड्यातील आहे.

गोंदिया : २१३, भंडारा: १४१, नागपूर ५५५, चंद्रपूर : ४३७, गडचिरोली : ६४१, वर्धा : ३९८, यवतमाळ ३५०, अमरावती: ३९४, अकोला: १९३, वाशीम: १३३, हिंगोली ९३, नांदेड ३९४, बुलडाणा: १५८, परभणी। १२६, लातूर: २०२, धाराशिव १७४, जालना: १८०, बीड: ५३३, सोलापूर ३४२, जळगाव १०७ छत्रपती संभाजीनगर: ३४७, नगर ६९५, नंदूरबार १८९, बुळे ९२, पुणे १०५४, ठाणे: ४४१, पालघर : ३१७, मुंबई ११७, रायगड १२९५, सातारा १०३९, सांगली : ३८५० कोल्हापूर: ५०७, सिंधुदुर्ग ८३५, रत्नागिरी १३७५, नाशिक: ३३१
या निर्णयाबाबत तज्ञांची मते..

श्री. रमेश बिजेकर– राज्य समन्वयक, शिक्षण बचात समन्वय समिती
राष्ट्रीय शिक्षण धोरणाऐवजी राज्य सरकारने स्वतंत्र धोरण तयार करावे. शिक्षण खर्चात वाढ करावी तसेच शाळांमध्ये भौतिक सुविधा उपलब्ध करून नियमित शिक्षकांची भरती करावी असे मत व्यक्त केल आहे.
श्री. अतुल सतदेवे, जिल्हा समन्वयक, शिक्षण बचाव समन्वय समिती, गोंदिया
स्वयंसेवक ही संकल्पना फार काळ टिकेल असे वाटत नाही त्यामुळे कायमस्वरूपी शिक्षकांची भरती करून शैक्षणिक दर्जा उंचवावा असे मत नोंदविले.
ट्रम्प यांनी घेतलेल्या हद्दपारीच्या निर्णयामुळे अमेरिकेतील भारतीय विद्यार्थी अडचणीत
वर्षानुवर्षांपासून शिक्षणासाठी, नोकरीसाठी अमेरिका हे भारतीय विद्यार्थ्यांचे पसंतीचे ठिकाण राहिले आहे. जागतिक दर्जाचे शिक्षण, किफायतशीर करिअरच्या संधी यांसारख्या बाबींमुळे विद्यार्थी अमेरिकेकडे वळतात. परंतु, डोनाल्ड ट्रम्प सत्तेत आल्यानंतर त्यांनी घेतलेल्या काही निर्णयांचा परिणाम या विद्यार्थ्यांवरही होत आहे. ट्रम्प प्रशासनाच्या अंतर्गत घेण्यात आलेल्या अलीकडील हद्दपारी आणि कठोर स्थलांतर धोरणांच्या अंमलबजावणीमुळे अनेक विद्यार्थी आर्थिक तणावात अडकले आहेत. त्यांना त्यांच्या भविष्याचा विचार वारंवार सतावत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *