Menu

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे शेड्युल कास्टसेडरेशनच्या जाहीरनाम्यातून व्यक्त केलेली मते

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे शेड्युल कास्टसे डरेशनच्या जाहीरनाम्यातून व्यक्त केलेली मते
त्यांच्याच शब्दात खाली देत आहाेत, ’’देशात दाेन पक्ष असणे, आवश्यक आहे. राज्याला म्हणजे सरकारला स्थिरता आणि व्यक्तीला स्वातंत्र्य देण्यासाठी द्विपक्षप्रणाली ही आदर्श आहे. असा आदर्श मात्र, आतापासून उपलब्ध हाेणा-या अल्पावधीत व येत्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रत्यक्षात येईल असे वाटत नाही. तेव्हा या क्षणी काय शक्य आहे,
ते म्हणजे विविध राजकीय पक्षांचा समावेश असलेले अखिल भारतीय फेडरेशन तयार करणे. या फेडरेशनच्या सभासद असलेल्या पक्षाचे राजकीय तत्वप्रणाली समान असेल.’’ 1948 च्या लखनऊ परिषदेनंतर वृत्तपत्रीय निवेदनात डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या परिस्थितीचे पुढील प्रमाणे स्पष्टीकरण केले. ‘‘मी काँग्रेसचा विराेधक आणि टीकाकार हाेताे, हे खरे आहे; परंतु विराेधाकरिता विराेध या तत्त्वावर माझा विश्वास नाही, हेही तितकेच खरे आहे. सहकार्याने जर आमचा लाभ हाेत असेल, तर आम्ही सहकार्य केले पाहिजे. काँग्रेसशी एकसारखे लढत राहणे काही उपयाेगाचे नाही, असे मला वाटले म्हणून मी काँग्रेसशी सहकार्य करण्याचे ठरवले आणि सहकार्यानेच घटनेत काही संरक्षक तरतुदींची कलमे मला प्रविष्ट करून घेता आली, सहकार्याशिवाय अशी कलमे घटनेत कधीही प्रविष्ट करून घेता आली नसती.‘’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *