Menu

आघाड्यांची भरमार

राज्यातील विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. सध्या विविध पक्ष व आघाड्यांचे एकीकरण याबाबतच्या चर्चा माेठ्या प्रमाणात हाेताना दिसतात. अशातच एक माेठा निर्णय आंबेडकरी पक्षाच्या प्रमुखांनी घेतलेला आहे. ज्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे. आंबेडकरी विचारांचे तब्बल सहा पक्ष आघाडी विधानसभेच्या मैदानात उतरले असून एकूण 674 अशी सर्वाधिक संख्या या सहा पक्षांची मिळून आहे. सर्वाधिक जागा बहुजन समाज पक्ष बसप व वंचित बहुजन आघाडी लढवत आहे. उत्तर प्रदेशच्या मायावती यांच्या बसपने सर्व 288 मतदार संघात उमेदवार दिले आहेत. त्यानंतर अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने 208 उमेदवार उभे केले आहे. आरक्षणवादी आघाडी 125 जागा लढवत आहे. तर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची रिपाई 1 जागा, आनंदराज आंबेडकर यांची रिपब्लिकन सेना 40 आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चुलत पणतू राजरत्न आंबेडकर अनुसूचित जातीसाठी राखीव 20 विधानसभा जागा लढवत आहे. आंबेडकरी विचारांच्या राजकीय पक्षांशिवाय विविध आंबेडकरी गट आंबेडकर पक्ष माविआ आणि
महायुती या दाेन्ही आघाड्यात आहेत. महाविकास आघाडीला प्राेग्रेसिव्ह रिपब्लिकन पार्टीचा तर महायुतीला जाेगेंद्र कवाडे यांचा पाठिंबा आहे.


बरेलीच्या नीरजने ‘अनुसूचित जातीत जन्म घेणं गुन्हा आहे का? असे म्हणत केली आत्महत्या……
अत्यंत हृदय हेलावणारी घटना बरेली (उत्तरप्रदेश) येथे घडली आहे. माझा जन्म अनुसूचित जातीच्या कुटुंबात झाला, माझा काय दाेष? काही लाेक जातीवाचक शिवीगाळ करून अपमान करतात. अनुसूचित जातीत जन्म घेणं गुन्हा आहे का? असा व्हिडिओ नीरजने बनवल्यानंतर जीवन संपविले.
बरेली येथील जिल्हा रुग्णालयातील चतुर्थश्रेणी कर्मचारी नीरज साेबत जे घडले ते अत्यंत लाजिरवाणे हाेते. केवळ 20.50 लाख रुपयांचे घर विकत घेतल्यापासून त्याचा वेगवेगळ्या प्रकारे शेजा-यांकडून छळ सुरु हाेता. नवीन घर घेतल्यामुळे छळ, घरात राहू देणार नाही असे म्हणून छळ, अशा अपमानामुळे घर विकावे असे नीरजने ठरविले तेव्हा, घर काेणाला दाखवायचे नाही आणि विकायचेही नाही असे दडपण शेजा-्यांनी नीरजवर आणले हाेते. शेजा-्यांना अशी भीती हाेती की नीरजला विकू दिले तर ताे अनुसूचित जातीच्या लाेकांनाच घर विकेल, त्यापेक्षा नीरजला ते घर विकण्यापासून थांबवावे असा प्रयत्न शेजारी करत हाेते. या अपमानाला कंटाळून नीरजने गळास घेऊन आत्महत्या केली.

मतांची विभागणी राेखण्यासाठी विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन एकता आघाडी महाविकास आघाडीसाेबत….…..
विधानसभा निवडणुकीत भाजपची भिस्त ही प्रामुख्याने मित्र पक्षांपेक्षा मतविभागणीवर अधिक आहे. यामुळे रिपब्लिक आणि धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी हाेऊ नये यासाठी छाेट्या-माेठ्या आंबेडकरवादी संघटना आणि गटांनी रिपब्लिकन एकता आघाडीच्या माध्यमातून एकत्र येत विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीसाेबत एकजुटीने उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे.

अमेरिकेत वंशवादानंतर आता जातीयवाद फोफावताे आहे-
डाॅ. केवनि ब्राऊन

अमेरिका आणि आफ्रिकेतील कृष्णवर्णीय आणि गाेरे यांच्यातील संघर्ष आणि भारतातील जातीयवाद यात बरेच साम्य असल्याचे मत साऊथ कॅराेलिना स्कूल ऑफ लाॅ चे शिक्षक डाॅ. केविन ब्राऊन यांनी व्यक्त केले आहे.
भारत आणि आफ्रिकन-अमेरिकेत झालेल्या संघर्षांमधील साम्यांचीं उदाहरण देताना डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी गाेलमेज परिषदेत केलेल्या अस्पृश्यांच्या वकिलीला आफ्रिकन-अमेरिकेतील कृष्णवर्णीय लाेकांच्या संघर्षाशी जाेडले. तसेच भारताप्रमाणे आता अमेरिकेतही जातींनी आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यास सुरुवात केली असून अमेरिकेत जातीवादाच्या विराेधात कायदा करण्याची मागणी हाेत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. केंद्रीय
सामाजिक न्याय विभागाअंतर्गत असलेल्या डाॅ. बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशनच्या तसेच राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डाॅ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यास व विचारधारा विभागाच्या वतीने आयाेजित डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती व्याख्यानमाला प्रसंगी ‘अमेरिकन
समुदाय आणि भारतीय उपखंडावरील दडपशाही यांच्यातील ऐतिहासिक संबंध’ या विषयावर केविन ब्राऊन यांनी वरील प्रमाणे विचार व्यक्त केले आहे.


डाॅ. विजयकुमार माहुरे यांना लाईफटाईम अचिव्हमेंट अवाॅर्ड
सामाजिक, साहित्यिक व सांस्कृतिक क्षेत्रात गेल्या 35 वर्षांपासून सातत्याने करीत असलेल्या अविरत कार्याबद्दल
डाॅ. विजयकुमार माहुरे यांना लाईफटाईम अचिव्हमेंट अवाॅर्ड प्रदान करण्यात आला. धन्वंतरी जयंती समाराेह समिती नांदेड,
राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज विद्यापीठ नागपूर, डाॅ. सुभाष वाघे हेल्थ फाउंडेशन, डाॅक्टर असाेसिएशन, राेगनिदान विकृती विज्ञान, पीजी असाेसिएशन, इंटरनॅशनल जनरल ऑफ डायग्नाेस्टिक अँड रिसर्च नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आयुर्वेद नॅशनल डे’ चे औचित्य साधून डाॅ. विजयकुमार माहुरे यांना महाराष्ट शासनाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांच्या हस्ते लाईफटाईम अचिव्हमेंट अवाॅर्ड प्रदान करण्यात आला. या पुरस्काराबद्दल डाॅ. विजयकुमार माहुरे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन हाेत आहे.

संकलन….. डॉ. विद्या चौरपगार
***


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *